Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, July 28, 2022

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी
-------------------------------------------
     परीक्षा जवळ आल्या की ,विद्यार्थ्यांच्या  डोक्यावर ताण पडतो. तेव्हा आपल्या पाल्यांच्या डोक्यावर ताण येऊ देऊ नये यासाठी पालकांनी काही काळजी घेणे व विद्यार्थ्यांनीही संयमाने घेणे गरजेचे असून त्यामुळे परीक्षा सुरळीत देता येतील. त्यासाठी पालक व पाल्यानी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
         परीक्षा जवळ आल्या की, वर्षभर शाळेतून शिकवलेला अभ्यासक्रम व क्लासेसमधून पूर्ण झालेला अभ्यासक्रम यचो उजळणी करून न जमलेला अभ्यास परत शिक्षकाकडून करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित रित्या सांभाळली तर विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. विशेष म्हणजे या काळात पालकांनी आपल्या पाल्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या काळात आपली पाल्य बाहेर पडणार नाहीत याची काळजी पालकांनी व गुरुजींनी घेणे गरजेचे आहे. बाहेर कोण्या पाहुण्याकडे व मित्रमंडळी कडे फिरकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.बाहेरच्या वातावरणात आपला मुलगा गेला की, त्याचे परत अभ्यासात मन रमत नाही.या काळात पालकांनी आपल्या पाल्यांना मर्यादित जेवण द्यावे.बाहेरचे खाण्यापासून दूर ठेवावे.या कालावधीत त्याचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घेताना घरचे जेवण पण माफक द्यावे.अन्यता या कालावधीत आपले  पाल्य आजारी पडल्यास त्याचे वर्ष वाया जाईल किंवा निकालावर परिणाम होईल.त्यासाठी आपल्या पाल्याचे जेवण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.परीक्षेच्या काळात पालकांनी म्हणजे आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे.त्यांना या कालावधीत रागावू नये.किंवा कामाचे ओझे लादू नये.परीक्षेत इतकी गुण मिळालीच पाहिजेत असा दबाव आणू नये. या सर्व बाबीसाठी थोडा वेळ पालकांनी पाल्यासाठी काढावा.आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या विषयाचे पुस्तक नोट्स शिक्षकाकडून किंवा क्लासेसमधील शिक्षकाकडून चौकशी करून उपलब्ध करून द्यावीत.या कालावधीत आपल्या पाल्यांना किमान पाच तास तरी झोप घेवू द्यावे.तशी त्यांची व्यवस्था करावी जास्तीचे झोपणे किंवा जागरण करणे हे आरोग्यासाठी योग्य राहणार नाहीत.याच कालावधीत आपली पाल्य बाहेर कुठे फिरतात ? कोणासोबत फिरतात यावरही लक्ष ठेवावे.या कालावधीत आपली पाल्य अभ्यासू मुलांव्यतिरिक्त इतर मित्रांसोबत राहता कामा नये.यासाठी काळजी घ्यावी. कारण याकाळात अभ्यासाच्या दडपणाखाली आपली पाल्य वाईट मुलांच्या संगतीत राहिले तर त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.आणि इतर गोष्टीकडे त्याचे लक्ष केंद्रित होईल म्हणून अशा मुलापासून आपली पाल्य दूर ठेवावीत ही पालकांची जबाबदारी आहे.याकाळात परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर घरातला टी. व्ही. बंदच ठेवावा आणि आपल्या पाल्यांना मोबाइल पासून दूर ठेवावे.आपली पाल्य टी. व्ही.पाहात बसली तर वेळ वाया जातो आणि मोबाईलमुळे इतरांना बोलण्यात वेळ जातो, युट्युब, गाणे पाहणे, गेम खेळणे यात बराचसा वेळ वाया जातो.त्यासाठी मोबाईल देऊ नये आणि काही काळ टी. व्ही.बंद ठेवावा.कारण याच्या वापराने वेळेचा अपव्यय होतो.
        पालकाएवढीच विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे.शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे.प्रत्येक विषयाची परत उजळणी करून घ्यावी.विद्यार्थ्यांना न जमलेला अभ्यास पुन्हा करून घ्यावा.अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात.प्रत्येक विषयाचा आराखडा तयार करून अभ्यास पूर्ण करावा. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस नेण्यासाठी शिक्षक हा प्रयत्नशील असावा.विद्यार्थ्यांनीही शाळेतील शिकवणी, क्लासेसमधील शिकवणी पूर्ण झाल्यावर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अवघड धडे पुन्हा पुन्हा उजळणी करून घ्यावेत.संबंधित शिक्षकाला विचारून ते नीट समजून घेवून परिक्षेसाठी सज्ज व्हावे व भरघोस यश संपादन करावे.

       सुतार संतोष काशीनाथ
        स.शि. जि.प.प्रा.शा.डिगोळ
        ता.शिरूर अनंतपाळ
         जि.लातूर

सध्याचे युग स्पर्धेचे, स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही

सध्याचे युग स्पर्धेचे, स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही
-------------------------------------------
     काळ जसा बदलत चालला आहे तसे प्रत्येक क्षेत्रात बदल होताना दिसतात.शिक्षण क्षेत्रात पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात तुलना केली तर बरीच तफावत आढळून येते. शिक्षण क्षेत्रात शाळा महाविद्यालयात बराच बदल झालेला आढळून येतो.बदलत्या काळानुसार शिक्षणाचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वी शाळा महाविद्यालय अनुदानित होती. नंतरच्या काळात अनेक शाळा महाविद्यालय कायम विनाअनुदानित झाली.वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे शिक्षण निघाले.प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी विषयाची प्रकर्षाने जाणीव भासू लागली.मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या.पूर्वी शिष्यवृत्ती नंतर नवोदय आणि आता विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा निघाल्या. पूर्वी शाळा महाविद्यालय कमी होती.आता पावलो पावली शाळा महाविद्यालय सुरू केली.त्यामुळे हजारो लाखो विद्यार्थी पदव्या घेवून बाहेर पडू लागली.त्यामुळे शासनाने दहावीनंतर चे डी. एड.आता बारावी नंतर केले.बारावी उतीर्ण झाल्यावर पूर्वी वैद्यकीय, अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळायचा पण या अभ्यासक्रमासाठी आता बारावीनंतर वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा, डी. एड.प्रवेशपूर्व परीक्षा शासनाने लागू केल्या.त्यामुळे हजारो विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करूनही या ठिकाणी वरील शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. त्यांचे एकमेव कारण म्हणजे प्राथमिक शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेत सहभागी न झाल्यामुळे याठिकाणी अपयश मिळते आहे.त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेताना पासूनच स्पर्धा परीक्षेत सहभाग, स्पर्धा परीक्षेची गोडी लावणे आवश्यक आहे. या स्पर्धा परीक्षेमुळे वरील परिक्षेशिवाय एम.पी.एस.सी. , यु.पी.एस.सी. ,वर्ग -१, वर्ग-२ ,व इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा सहज सोप्या जातात.त्यामुळे स्पर्धा परीक्षा काळाची गरज बनली आहे.
         शालेय अभ्यासक्रमात विस्ताराने त्या त्या विषयाची परीक्षा असते पण स्पर्धा परीक्षेत अब्जेटिव्ह पध्दतीने परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे शालेय अभ्यासक्रमात काही ओळीत उत्तर द्या अन स्पर्धा परीक्षेत एका वाक्यात उत्तरे द्या अशी पध्दत असते असे म्हणायला हरकत नाही. स्पर्धा परिक्षेमुळे तात्काळ उत्तरे देण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढते. संगणक, इतिहास, विज्ञान ,गणित अशा वेगवेगळ्या विषयात विद्यार्थी आपली आवड आपण ओळखू शकतो.त्यानुसारच आपले ध्येय समोर ठेवून त्या त्या पध्दतीने वाटचाल करीत तो एखाद्या विषयात (क्षेत्रात ) यशस्वी होवू शकतो. स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थी आपला विषय व आपली क्षमता ओळखून पुढे जातो. जर एखादा विद्यार्थी केवळ शालेय अभ्यासक्रमानुसार परीक्षा देत गुणवत्ता प्राप्त करीत पुढे गेला तर बारावी नंतर डी. एड., वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षेत यशस्वी झाला नाही तर गुणवत्ता प्राप्त करूनही नाविलाजाने कुठलातरी मार्ग पत्करावा लागतो.प्राथमिक शिक्षण घेत असतानापासून स्पर्धा परीक्षेत भाग घेतला तर पुढे शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर किंवा उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून तशी वाटचाल करता येते.आणि जीवनात यशस्वी होता येते.त्यामुळे आता उच्च शिक्षण व एखाद्या क्षेत्रात मोठा अधिकारी पदावर जायचे असेल तर सद्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात स्पर्धा परीक्षेला पर्याय राहिला नाही. आणि स्पर्धा परीक्षेत भाग घेणारा प्रत्येक विद्यार्थी जगात कुठल्याही पातळीपर्यंत पोहचू शकतो.म्हणून प्राथमिक शिक्षणापासूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे.आपली आवड आपले भविष्य स्वतःच तयार करावे... यशस्वी व्हावे! ही सदिच्छा !!
     
      सुतार संतोष काशिनाथ
       स.शि. जि.प.प्रा.शा. डिगोळ
        ता.शिरूर अनंतपाळ
         जि.लातूर

Wednesday, July 27, 2022

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्रस्ताव मागविण्यात आले आहे

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्रस्ताव मागविण्यात आले आहे

⬆️👆

सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी निकाल पत्रक

सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी निकाल पत्रक
Download here सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी निकाल पत्रक साठी येथे क्लिक करा

⬆️👆

Tuesday, July 26, 2022

मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न

*मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*

बोळेगाव (बु) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांचा आज दिनांक 26/7/2022 रोजी सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त  होणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय व्यक्तिमत्व श्री माधवराव पारशेटटे दिनांक 31/7/2022 रोजी सेवा निवृत्त होत असल्याने बोळेगाव बु.शाळेच्या  वतीने आज दिनांक 26/7/2022 रोजी शाळेचे मुख्याध्यापक साहेबांचा गेल्या दोन वर्षातील कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही. सकारात्मक वृत्ती असलेला त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील मुख्याध्यापक,समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची असलेली मृदू व अविट भाषा,निःस्वार्थ सेवावृत्ती,अशा  अनेक सद्गअशा सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. सभागृहात शिक्षक बांधवांकडून  संपन्न झाला. प्रथम प्रास्ताविकात शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सुदर्शन पाटील यांनी मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रविण खटके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री अनिल जी पागे, विस्तार अधिकारी मा. शिवाजीराव एरंडे, केंद्रप्रमुख श्री विठ्ठल वाघमारे, मुख्याध्यापक विरेंद्र उस्तुर्गे तसेच मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेटटे यांच्या सुविज्ञ पत्नी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षीका श्रीमती विजया धुमाळे, सरांच्या मातोश्री श्रीमती शशीकला पारशेटटे आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष व्यंकटराव खटके, पोलिस पाटील व्यंकटराव गौंड, श्री ज्ञानेश्वर तेलंग, सेवा निवृत्त शिक्षक तथा शिक्षण प्रेमी एम. एम. पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच यांचाही भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे निमित्ताने सत्कार  करण्यात आला. 
साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून सर्वांनी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक होते असे व्यक केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीश्रम घेतले.  या निरोप समारंभात  जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा बोळेगाव बु. येथील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, ज्ञानोबा कंजे, श्री ज्ञानेश्वर बडगे, सुर्यनारायण सुरवशे, विजयकुमार सिंदाळकर श्रीमती  मजलसा पुठ्ठेवाड, श्रीमती आशा मुळे आदी जण उपस्थित होते. तसेच साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून सर्वांनी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक होते असे व्यक केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी  शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे व आभार शाळेतील शिक्षक श्री सुर्यनारायण सुरवशे यांनी मानले.
























































राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार लिंक

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार लिंक 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqaxbBlkjZWn5MPrg38-CFN0pUObdtPdc5ErQeMb6aSrmyEw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

Monday, July 25, 2022

इयत्ता पहिली ते दहावी सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी साठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करून download करून घ्या

🌈🍁🍃
*इयत्ता पहिली ते दहावी सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी साठी खालील दिलेल्या लिंक चा वापर करून download करून घ्या 👇*
*सेतू उत्तर चाचणी डाऊनलोड*
https://www.minishala.com/2022/07/2022-23.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Saturday, July 23, 2022

हिंदी बालगीते

हिंदी बालगीते 

लोरी और बालगीत

1. लल्ला लल्ला लोरी

2. चंदनिया छुप जाना रे

3. छोटी-सी, प्यारी-सी

4. आ चल के तुझे

5. सुरमई अंखियों में

6. चंदा है तू


1. अक्कर बक्कर बॉम्बे बो

2. मछली जल की रानी है

3. आलू कचालू बेटा

4. चंदामामा दूर के

5. चंदामामा आओ ना

6. बदल राजा

7. नानी तेरी मोरनी को मोर ले गये

8. लकड़ी की काठी

1. लल्ला लल्ला लोरी

लला लला लोरी
दूध की कटोरी
दूध में बताशा
मुन्नी करे तमाशा

2. चंदनिया 

लोरी लोरी लोरी
लोरी लोरी लोरी
लोरी लोरी लोरी
लोरी लोरी लोरी
चंदनिया छुप जाना रे
छन भर को लुक जाना रे
निंदिया आँखों में आए
बिटिया मेरी मेरी सो जाए
हुम्म.. निंदिया आँखों में आए
बिटिया मेरी मेरी सो जाए
लेके गोद में सुलाऊँ
गाऊँ रात भर सुनाऊँ
मैं लोरी लोरी
हो मैं लोरी लोरी..
3. छोटी-सी, प्यारी-सी 

छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी
छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी
भोली सी, न्यारी सी, अच्छी सी, आई कोई परी
पालने में ऐसे ही झूलती रहे
खुशियों की बहारों झूमती रहे
गाते मुस्कुराते संगीत की तरह
ये तो लगे रामा की गीत की तरह
रा रा रु.. रा रा रा रा रा रु..
रा रा रु.. रा रा रा रा रा रु.. 

4. आ चल के तुझे 

आ चल के तुझे, मैं ले के चलूँ
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले
सूरज की पहली किरण से
आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुल कर
घनघोर अंधेरा भागे
कभी धूप खिले, कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले
जहाँ ग़म भी नो हो..
जहाँ दूर नज़र दौड़ाएँ
आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग-बिरंगे पंछी
आशा का संदेसा लाएँ
सपनों में पली
हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले
जहाँ ग़म भी न हो..
सपनों के ऐसे जहां में
जहाँ प्यार ही प्यार खिला हो
हम जा के वहाँ खो जाएँ
शिकवा न कोई गिला हो
कहीं बैर न हो, कोई गैर न हो
सब मिलके यूँ चलते चलें
जहाँ गम भी न हो..

5. सुरमई अंखियों में 
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
निंदिया के उड़ते पाख़ी रे
अँखियों में आजा साथी रे
रा री रा रूम ओ रा री रूम
रा री रा रूम ओ रा री रूम
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
सच्चा कोई सपना दे जा
मुझको कोई अपना दे जा
अंजाना सा, मगर कुछ पहचाना सा
हल्का-फुल्का शबनमी
रेशम से भी रेशमी
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
निंदिया के उड़ते पाख़ी रे
अँखियों में आजा साथी रे
रा री रा रूम ओ रा री रूम
रा री रा रूम ओ रा री रूम 

6. चंदा है तू

चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
जीती हूँ मैं बस तुझे देखकर
इस टूटे दिल का सहारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आँखों का तारा है तू
तू खेले खेल कई, मेरा खिलोना है तू
तू खेले खेल कई, मेरा खिलोना है तू
जिससे बँधी हर आशा मेरी
मेरा वो सपना सलोना है तू
नन्हां सा है, कितना सुंदर है तू
छोटा सा है, कितना प्यारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है 

1. अक्कड़ बक्कड़

अक्कर बक्कर बॉम्बे बो
८०, ९० पुरे १००
सौ पे लगा धागा
चौर निकल के भागा
अक्कर बक्कर बॉम्बे बो
अस्सी, नब्बे पुरे सौ
सौ पे लगा धागा
चौर निकल के भागा

2. मछली जल की रानी है Machhli Jal Ki Rani Hai Hindi Rhymes

मछली जल की रानी है
जीवन उसका पानी है
हाथ लगाओ तो डर जाएगी
बहार निकालो तो मर जायेगी
पानी में डालो तो तैर जायेगी

3. आलू कचालू बेटा Aalu Kachalu Beta Rhymes in Hindi

आलू कचालू बेटा कहाँ गए थे
बैगन की टोकरी में सो रहे थे
बैगन ने लात मरी रो रहे थे
मम्मी ने प्यार किया हंस रहे थे

4. चंदा मामा दूर के Chanda Mama Due Ke Rhymes Lyrics

Movie: Vachan; Music & Lyrics: Ravi; Singer: Asha Bhosle
चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के
आप खाएं थाली में, मुन्ने को दें प्याली में
प्याली गई टूट मुन्ना गया रूठ
लाएंगे नई प्यालियाँ बजा बजा के तालियाँ
मुन्ने को मनाएंगे हम दूध मलाई खाएंगे,
चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के
आप खाएं थाली में, मुन्ने को दें प्याली में
उड़नखटोले बैठ के मुन्ना चंदा के घर जाएगा
तारों के संग आँख मिचौली खेल के दिल बहलाएगा
खेल कूद से जब मेरे मुन्ने का दिल भर जाएगा
ठुमक ठुमक मेरा मुन्ना वापस घर को आएगा,
चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के
आप खाएं थाली में, मुन्ने को दें प्याली में

5. चंदा मामा आओ ना Chanda Mama Rhymes in Hindi

चंदा मामा आओ ना
दूध बताशा खाओ ना
मीठी लोरी गाओ ना
बिस्तर में सो जाओ ना

6. बदल राजा Badal Raja Rhymes in Hindi

बादल राजा बादल राजा
जल्दी से पानी बरसाजा
नन्हें मुन्ने झुलस रहे हैं
धरती की तू प्यास बुझा जा

7. नानी तेरी मोरनी

नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये
खाके पीके मोटे होके चोरे बैठे रेल में
चोरों वाला डब्बा कटके पहुंचा सीधे जेल में
खाके पीके मोटे होके चोरे बैठे रेल में
चोरों वाला डब्बा कटके पहुंचा सीधे जेल में
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये
उन चोरों को खूब ख़बर ली मोटे धनेदार ने
मोरों को भी खूब नचाया जंगल की सरकार ने
उन चोरों को खूब ख़बर ली मोटे धनेदार ने
मोरों को भी खूब नचाया जंगल की सरकार ने
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये
अच्छी नानी प्यारी नानी रूसा रुसी छोड़ दे
जल्दी दे एक पैसा दे दे तू कंजूसी छोड़ दे
अच्छी नानी प्यारी नानी रूसा रुसी छोड़ दे
जल्दी दे एक पैसा दे दे तू कंजूसी छोड़ दे
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गयेRead full song of Nani Teri Morni Ko Mor Le Gaye

8. लकड़ी की काठी Lakdi Ki Kaathi Lyrics in Hindi

लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा
घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
घोड़ा पहुंचा चौक में
चौक में था नाई
घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई
टग-बग, टग-बग
टग-बग, टग-बग
घोड़ा पहुंचा चौक में
चौक में था नाई
घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई
दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा
---------------------------------------------------------------------
पर्चे पढ़कर नाचे दादा,

दादी बापू अम्मा। 
पर्चों में यह लिखा हुआ था,

खुशियां रोज मनाओ। 
 झोलक- झोलक, झम्मा-झम्मा,

उइ अम्मा, उइ अम्मा। 

तोता-मैना नाच रहे हैं,

छत पर छम्मा-छम्मा। 
नाच देखकर कोयल दीदी,

दौड़ी-दौड़ी आई। 

हाथ पकड़ कर कौए का भी,

खींच-खींच कर लाई। 

फिर दोनों ही लगे नाचने,

धुम्मा-धुम्मा-धुम्मा। 
शोर हुआ छत पर तो सारे,
पंछी दौड़े आए। 
 ढोल-मंजीरा तबला-टिमकी,

बांध गले में लाए। 

खूब बजा संगीत नाच पर,

ढमर-ढमर, ढम ढम्मा। 
 कुत्ते-बिल्ली गाय-बैल भी,

बीच सड़क पर नाचे। 

खुशियों वाले पर्चे लेकर,

सब घर-घर में बांटे|
पर्चे पढ़कर नाचे दादा,

दादी बापू अम्मा। 

पर्चों में यह लिखा हुआ था,

खुशियां रोज मनाओ। 

छोडो दुःख का रोना-धोना,

नाचो कूदो गाओ। 

धूम मची तो लगे नाचने,

सोनू मोनू पम्मा। 

प्राथमिक वर्गासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त भाषणे

प्राथमिक वर्गासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त भाषणे
👆⬆️

Friday, July 22, 2022

शाळा स्तरावरील विविध समित्या



















30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ देण्यात आले याबाबत शासन निर्णय



तिवटग्याळ गावात व जि.प.प्रा.शाळेत "एक मुल एक झाड " महावृक्ष लागवड उपक्रम!

तिवटग्याळ गावात व जि.प.प्रा.शाळेत "एक मुल एक झाड " महावृक्ष लागवड उपक्रम!                           ——————————
*उदगीर - उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे आज दिनांक 22/7/2022 रोजी तिवटग्याळ गावात व जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत महावृक्ष लागवड उपक्रमांतर्गत "एक मुल एक झाड" या प्रमाणे लिंब, चिंच, सागवान , कंरजी या झाडाची रोपे असे एकूण 400 झाडे शाळेतील विद्यार्थ्यांना व प्रत्येक घरी वाटप करण्यात आले व लागवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, उपसरपंच प्रशांत पाटील, सरपंच पुत्र गजानन नरहरे,ग्राम सेवक प्रशांत ढगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, ऑपरेटर विनोद बिरादार व गावातील प्रतिष्ठित नागरिक देविदास पाटील, जयशिंग पाटील, उमाकांत पाटील, गंगाराम पाटील, भिमराव पाटील,अंकुश कांबळे, प्रवीण कांबळे, शंकर कांबळे, करण कांबळे, नवनाथ कच्छवे वैभव नरहरे तसेच हैबतपुर चे सरपंच दंडीमे आदी जण उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी जि.प.प्रा.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परीसरातील परिसरात वृक्ष लावुन  झाडे लावा झाडे जगवा असा संदेश ग्रामस्थांना दिला.  या महालक्ष वृक्ष लागवड साठी गावचे सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, उपसरपंच प्रशांत पाटील, सरपंच पुत्र गजानन नरहरे,ग्राम सेवक प्रशांत ढगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व गावातील प्रतिष्ठित नागरिक देविदास पाटील, जयशिंग पाटील, उमाकांत पाटील, गंगाराम पाटील, भिमराव पाटील,अंकुश कांबळे, प्रवीण कांबळे, शंकर कांबळे, करण कांबळे, नवनाथ कच्छवे वैभव नरहरे तसेच हैबतपुर चे सरपंच दंडीमे आदींनी परिश्रम घेऊन महालक्ष वृक्ष लागवड उपक्रम यशस्वीपणे राबविला*