Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, October 22, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप

*तिवटग्याळ .......‌दिनांक 21/10/2022 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  वर्गातील सर्व  विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका  देण्यात आले तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील  सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास स्वाध्याय हे 20 दिवसासाठी आहे. तो नियमित सोडवण्यासाडी दिपावली सुट्टी अभ्यास उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे सांगितले व 22 आॅक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2022 पर्यत  नियमितपणे अभ्यास करावा, नियमित अभ्यास केल्यावर स्वाध्याय पुस्तिका वर आई व वडील दोघांचेही स्वाक्षऱ्या घ्याव्यात असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 22/10/2022 पासून नियमित  आँनलाईन सुध्दा  दैनंदिन अभ्यासमाला दिले जाणार आहे असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार व श्रीमती वर्षा श्रीमंगले  आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले*









No comments:

Post a Comment