Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, October 23, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक दीप महोत्सव साजरा

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक दीप महोत्सव साजरा

*तिवटग्याळ - आज दिनांक 20/10/2022 रोजी जिल्हा परिषद शाळा तिवटग्याळ येथे शैक्षणिक दीप महोत्सव साजरा करण्यात. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी आदल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत दीप महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आकाश कंदिल, किल्ले, विविध मुर्ती, मातीच्या पणत्या, रांगोळ्या चे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे व या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आकाश कंदील, किल्ले, मातीच्या पणत्या, मुर्ती, रांगोळ्या या मधील विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले. या प्रमाणे शैक्षणिक दीपमहोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेत किल्ला बनवला होता,आकाश कंदिल, मुर्ती, पणत्या व  विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला स्पर्धा, घेण्यात आली. तसेच मुलांना  मुलांनी शाळेत मातीच्या पणत्या आकाश कंदील केले होते. तसेच मातीचे दिवे पण त्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व विविध स्पर्धाचे प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यासाठी परीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या दीप महोत्सव सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी दिली. दीप महोत्सव चा आनंद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थी खुपच आनंददायी व उत्साही दिसत होते. या दीप महोत्सव पाहणी नंतर विविध स्पर्धामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक विजेतांचे अभिनंदन करुन बक्षीस वाटप करण्यात आले. आकाश कंदील या स्पर्धेत कु. मंदीरा रमेश साळुंके(प्रथम) , इंद्रजीत नवनाथ कच्छवे(द्वितीय) , रांगोळी स्पर्धेत समीक्षा दयानंद नरहरे(प्रथम) ,गंगाधर छगनसिंह बिरादार(द्वितीय) , किल्ले बनवणे स्पर्धेत सुमीत मधुकर पाटील(प्रथम) , रितीका शिवराज पाटील(द्वितीय) , पणत्या व मुर्ती बनवणे स्पर्धेत मंदिरा रमेश साळुंके(प्रथम) , गंगा संभाजी बिरादार(द्वितीय) या विजेतांचे बक्षीस देऊन अभिनंदन केले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना या दीप महोत्सव व दिवाळी सणा विषयी सविस्तर माहिती तसेच दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. या दीप महोत्सवसाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

































































No comments:

Post a Comment