*केंद्रप्रमुख मा. शेषराव राठोड यांच्या हस्ते विद्यार्थी वर्गकार्य स्वाध्याय तपासणी*
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी अचानक केंद्रप्रमुख मा. शेषराव राठोड यांनी भेट देऊन इयत्ता पहिली व दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांना वर्गकार्य देण्यात आले. या वर्ग कार्यात पाठ वाचन, संख्या वाचन लेखन, बेरीज, वजाबाकी उदाहरणे, इंग्रजी विषयात अल्फाबेट वाचन, शब्द वाचन, लेखन, एकुण 10 गुणांचा स्वाध्याय देण्यात आला. 10 पैकी 10 गुण मिळवलेल्या विद्यार्थांचे चि. अथर्व नरसिंग पाटील, चि. अर्णव गुणवंत पाटील तसेच वर्ग शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे केंद्रप्रमुख मा. शेषराव राठोड यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी केंद्र प्रमुख मा. शेषराव राठोड, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, पालक मंदाकिनी पाटील, शालेय पोषण आहार मदतनीस गीताताई कच्छवे आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment