Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, October 21, 2023

जिल्हा सत्र न्यायाधीश मा. सुभेदार साहेब यांची तिवटग्याळ शाळेस भौतिक सुविधा पाहणीसाठीभेट

*जिल्हा सत्र न्यायाधीश मा. सुभेदार साहेब यांची तिवटग्याळ शाळेस भौतिक सुविधा पाहणीसाठीभेट*

*तिवटग्याळ - आज दिनांक 20/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ  ता.उदगीर येथे.जिल्हा न्यायाधीश मा.सुभेदार साहेब, जिल्हा परिषद लातूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. मापारी साहेब व त्यांच्या पथकाने  प्रत्यक्ष पाहणी करून शाळेतील भौतिक सुविधा व शाळेच्या शैक्षणिक  कार्य पद्धती बाबत समाधान व्यक्त केले. शाळेतील विविध बाबींवर व विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती पाहून शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचा न्यायाधीश मा. सुभेदार साहेब यांच्या उपस्थितीत माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. लातूर मा. मापारी साहेबांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान तिवटग्याळ येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षीका अंजली लोहारकर , पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावचे सरपंच प्रशांत पाटील व समस्त गावकरांचा आहे असे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मनोगत व्यक्त केले*








Wednesday, October 18, 2023

निपुण भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीच्या माता पालक यांच्या करिता.... 15-08-2023 पासून या वर्षातील आलेले आता पर्यंत ची मराठी आयडिया व्हिडिओ.(आठवडा 1 ते आठवडा 9 )

*आज पर्यंत चे idea video*

निपुण भारत अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीच्या माता पालक यांच्या करिता....
15-08-2023 पासून या वर्षातील आलेले आता पर्यंत ची मराठी आयडिया व्हिडिओ.(आठवडा 1 ते आठवडा 8 )(०९-१०-२३ ) 

आठवडा 1
https://youtu.be/sRV9FuCE8gw

आठवडा 2
https://youtu.be/i8GxAIlzJQk

आठवडा 3
https://youtu.be/oUgnTv7d66g
  
आठवडा 4
https://youtu.be/bhf5iFHLML0

आठवडा 5
https://youtu.be/3EzOqba8CWo

आठवडा 6
https://youtu.be/2x4mS4LJCIQ

आठवडा 7
https://youtu.be/epyfR1jemhA

आठवडा 8
https://youtu.be/0Eok4_P5-bU

आठवडा 9

https://youtu.be/3bCtz-NYslA?feature=shared

तिवटग्याळ येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, जागतिक हातधुवा दिन साजरा

*तिवटग्याळ येथे  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन, जागतिक हातधुवा दिन साजरा*           

*तिवटग्याळ - आज दिनांक 15/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे मोठ्या उत्साहात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली.  तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक वाचण्यास दिले. शाळेत पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.  तसेच जागतिक हातधुवा दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्च्छता, वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याच्या सहा पायरी प्रात्यक्षिक शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी करून दाखवले तसेच सविस्तर माहिती देऊन हा  हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*














































Saturday, October 14, 2023

MDM app link

MDM app link


Download here to click 

⬇️⬇️





MDM दैनंदिन हिशोब calculater

MDM दैनंदिन हिशोब calculater
सौजन्य - learning with Smartness 

Udise Plus 2023 मध्ये नव्याने विद्यार्थ्यांचे रक्तगट, वजन व उंची माहिती अपडेट करणे

प्रति,
सर्व मुख्याध्यापक  
Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत MPSP राज्य प्रकल्प संचालकांच्या महत्त्वपूर्ण सूचना दोन दिवसापासून यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी अपडेट करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती मध्ये विद्यार्थ्यांचा रक्तगट वजन उंची शाळा प्रवेश दिनांक हजेरी क्रमांक व माध्यम या अधिकच्या गोष्टी नवीन आल्या आहेत.  यापैकी विद्यार्थी रक्तगट हा तपासणी करणे अडचणीचे किंवा वेळ घेणारे काम असल्यामुळे राज्य प्रकल्प संचालकांनी त्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 
Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत आताच Mpsp, कार्यालय मुंबई, यांच्या  प्राप्त सूचनानुसार Udise Plus मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट भरताना अडचण येत होती, तरी ज्या विद्यार्थ्याचे रक्तगट मिळवण्यास अडचण येत आहे. त्यांनी सध्या Under Investigation - Result will be updated soon हा ऑप्शन निवडून माहिती पुढे भरावी तसेच रक्तगट माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा रक्तगट निवडून माहिती Update करून घ्यावी. त्यानंतर Facility Profile मध्ये प्रत्येक विद्यार्थी बाबत उंची व वजन ही माहिती सुध्दा Update करून घ्यावी. ज्या मुख्याध्यापक यांनी अगोदरच काम केलेले आहे व विद्यार्थी Green दिसत आहे अश्या शाळांना सुद्धा रक्तगट, वजन व उंची हा पर्याय उपलब्ध असून त्यांनी देखील प्रत्येक विद्यार्थी Update करून घ्यावा. मा. प्रकल्प संचालक
MPSP, मुंबई यांच्या सूचनानुसार





Tuesday, October 10, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता- पालक गट अंतर्गत निपुण उत्सव साजरा


























































तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता- पालक गट अंतर्गत निपुण उत्सव साजरा*

*तिवटग्याळ - आज दिनांक 10/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गट बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या माता - पालक गट व लिडर माता यांना पुर्व सुचना देऊन निपुण उत्सवासाठी बोलावण्यात आले. प्रथम लिडर माता गीता कच्छवे, संगीता बिरादार, वर्षा श्रीमंगले, पुजा बिरादार, भागाबाई बिरादार व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, रामचंद्र पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्सवासाठी सुरुवात करण्यात आली. तद्नंतर या निपुण उत्सवासाठी प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रामचंद्र पाटील, लिडर माता गीता कच्छवे, संगीता बिरादार, वर्षा श्रीमंगले, पूजा बिरादार, भागाबाई बिरादार व शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर आदी पुरुष व महीलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तद्नंतर या निपुण भारत अभियान ची सविस्तर माहिती प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितली. तसेच या निपुण उत्सवात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी माता - पालक गटाची उध्दीटे, निकष, कार्य, नवे शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर सविस्तर माहिती दिली. माता - पालक गटाला दर आठवड्याला एक Idea Video शैक्षणिक उपक्रम आपणांस दिला जाणार आहे तो उपक्रम आपल्या वार्डातील इयत्ता पहिली ते तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे असे सांगितले व प्रत्यक्षात प्रात्यक्षिक रुपात या आठवड्यातील आठवा Idea Video. या idea video तील उपक्रम माता - पालक गट सदस्य व लिडर मातांना  मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी इंग्रजी अंक 8 या उपक्रमातून लक्ष पुर्ण करणे हा खेळ घेण्यात आला. तसेच सरळ रांगेत उभे राहून एकाने डोळ्याला रुमाल बांधून रस्ता पार करणे हा देखील उपक्रम सादर करण्यात आला. तसेच या आठवड्यातील work sheet मराठी अक्षर व चित्रे रंगवून जोड्या लावणे हा देखील उपक्रम सोडून घेण्यात आला. अशा विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती देउन निपुण उत्सव साजरा केला. शासनाने दर आठवड्याला एक Idea Video देणार आहेत. आतापर्यंत आठ Idea Video दिलेले आहेत ते लिडर मातांनी आपल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना दाखवून सविस्तर मार्गदर्शन करावे असे सांगितले. या निपुण महोत्सव कार्यमाचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर तसेच प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. चहापानानंतर निपुण उत्सवासाठी सांगता करण्यात आली.  निपुण उत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी परीश्रम घेतले*