*जिल्हा सत्र न्यायाधीश मा. सुभेदार साहेब यांची तिवटग्याळ शाळेस भौतिक सुविधा पाहणीसाठीभेट*
*तिवटग्याळ - आज दिनांक 20/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर येथे.जिल्हा न्यायाधीश मा.सुभेदार साहेब, जिल्हा परिषद लातूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. मापारी साहेब व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून शाळेतील भौतिक सुविधा व शाळेच्या शैक्षणिक कार्य पद्धती बाबत समाधान व्यक्त केले. शाळेतील विविध बाबींवर व विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती पाहून शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचा न्यायाधीश मा. सुभेदार साहेब यांच्या उपस्थितीत माध्यमिक शिक्षणाधिकारी जि. प. लातूर मा. मापारी साहेबांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान तिवटग्याळ येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षीका अंजली लोहारकर , पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावचे सरपंच प्रशांत पाटील व समस्त गावकरांचा आहे असे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मनोगत व्यक्त केले*
No comments:
Post a Comment