" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे




दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे
-----------------------------

शिक्षणाचे महत्त्व आता पुन्हा समाजाला समजू लागले आहे. गावातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालक वर्ग मराठी माध्यमाच्या शाळा ऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देत आहेत. देशाची आर्थिक प्रगती, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, राजकीय सामाजिक व औद्योगिक यासारख्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या निर्मितीसाठी, रोजगारांच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी दारिद्र निर्मुलनासाठी देशाला शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाची गरज दर्जेदार शिक्षण पूर्ण करू शकते. याकरिता कालबाह्य शिक्षण पद्धतीला दूर सारून नवनवीन शिक्षण पद्धती अवलंबून देश हिताकरिता सक्षम पिढी उभी करणे काळाची गरज झाली आहे. याकरिता गरज आहे ती कसदार शिक्षणाची. शासनाने ठरवून दिला अभ्यासक्रम मुलांना शिकवणे, त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा घेणे इतकेच आजच्या बदलत्या जीवनशैलीत पुरेसे नाही. शिक्षणामुळे माणसाची अस्मिता जागृत होते. "मी कोण आहे"? याची जाणीव माणसाला शिक्षणामधून होते. शिक्षणामुळे माणसाला आत्मभान येते. त्याची आकलन शक्ती वाढते .दरवर्षी प्रशिक्षित इंजिनियर्स,डॉक्टर्स निर्माण करण्याच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी भारतीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचे आहे. जगात बौद्धिक भांडवलाच्या उपलब्ध बाबत भारताचे नाव आवर्जून घेतले जात असले तरी या देशातील एक तृतीयांश लोकसंख्या निरक्षर आहे. भारतात अति वेगाने वाढणाऱ्या खाजगी शाळांमध्ये विविध खेळांच्या दर्जेदार सुविधा  व  यासारख्या महागड्या सुविधा एकीकडे आहेत तर त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा खाजगी शाळा पासून अगदी जवळच असलेल्या सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये खडू आणि फळा यासारख्या शिक्षणाच्या मूलभूत सुविधाची वाणवा आहे. शिक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रातील अशा विसंगतीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. शिक्षणाइतके देशाच्या अर्थव्यवस्थेवर सर्वव्यापी परिणाम करणारे महत्त्वाचे घटक फारच कमी आहेत. भारतातील शालेय शिक्षण व्यवस्थेचे अपयश म्हणजे देश बांधणीच्या कार्यातील सर्वात मोठा अडथळा होय. शिक्षण व्यवस्थेच्या अपयश अपयशाचे पुरावे आपल्याला आपल्या आजूबाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहज फेरफटका मारल्यास सह दिसून येतात. यातही ग्रामीण भारताची शिक्षणाबाबतची परिस्थिती फारच वाईट अवस्थेत दिसून येते. या राष्ट्रीय धोक्याकडे वेळीच लक्ष देणे तितकेच गरजेचे झाले आहे.
-----------------------------
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर*
-----------------------------

No comments:

Post a Comment