Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 29, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य " चला चला राजा काय सांगतो - राजा सांगतो ते म्हणा म्हणा " या उपक्रमातून शिक्षण

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य " चला चला राजा काय सांगतो - राजा सांगतो ते म्हणा म्हणा " या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 27/1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  यांनी आज शनिवार निमित्ताने शैक्षणिक साहित्य"चला चला राजा काय सांगतो " या  उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  यांनी हा उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक बडगे यांनी सर्व विद्यार्थाना गोलाकार बसवुन गोलामध्ये एका ट्रे मध्ये विविध विविध सुचना पत्र चिठ्ठी ठेवले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  यांनी प्रथम डाव घेतले. मग गोलाकार फिरुन गोलाकार वर्तुळातील खोक्यातील सुचना पत्र चिठ्ठी घेतली गोलाकार फिरुन चला चला राजा काय सांगतो म्हणत फिरुन चिठ्ठीतील सुचना वाचून दाखवली, सुचनेत "30 चा पाढा म्हणा " असे म्हणत फिरत फिरत  डाव दुसर्‍याला देणे. अशा प्रकारे गोलाकार वर्तुळात विविध 100 सुचना पत्र चिठ्ठी ठेवून इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना डावात खेळात सहभागी घेऊन विविध सुचना पत्र चिठ्ठी खेळ घेण्यात आला. अशा पध्दतीने  खेळाच्या माध्यमातून, शैक्षणिक साहित्याच्या द्वारे मनोरंजनातून सर्व विषयांतील प्रश्न उत्तर, गाणे, कविता, बोधकथा, सुविचार, विविध प्राण्यांचे आवाज, वयोवृद्ध व्यक्तींच्या नकला अशा सुचना पत्र चिठ्ठी समजून घेतले. या उपक्रमांत विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील  शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले*


















































































No comments:

Post a Comment