*श्रीराम प्राण प्रतिष्ठा अयोध्या निमित्ताने तिवटग्याळ नगरीत शोभायात्रा*
*तिवटग्याळ - आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी तिवटग्याळ ग्रामस्थांनी श्रीराम प्राण प्रतिष्ठा अयोध्या या निमित्ताने मौजे तिवटग्याळ ता.उदगीर येथे शोभा यात्रेत गावातील सर्व लहान थोर मंडळी व शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व रामभक्त बंधूंनी शोभायात्रेत सहभागी झाले. दुपारी 12.00 गावातील महादेव मंदिरावर शोभायात्रेनंतर महाआरती करण्यात आली. तद्नंतर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर रथयात्रेत आंदोलनात सहमागी झालेल्या तिवटग्याळ येथील कारसेवकांचा सत्कार गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. छगनसिंग बिरादार यांच्या वतीने देविदास बबनराव पाटील, बालाजी रंगराव पाटील, जनार्दन सोपानराव पाटील, श्यामराव शेषराव पाटील, विठ्ठल पांडुरंग पाटील व अमर ग्यानोबा गायकवाड यांचा सत्कार गावचे सरपंच मा. प्रशांत पाटील, छगनसिंग बिरादार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर गावातील सर्व नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रा साठी सरपंच प्रशांत पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष मा. कैलास तवर, जनार्दन पाटील, छगनसिंग बिरादार, रामचंद्र पाटील, गोविंदराव बिरादार, बालाजी पाटील, भास्कर पाटील, रतन बिरादार, नवनाथ कच्छवे, प्रभाकर पाटील, भिमराव पाटील, जयसिंग पाटील शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व गावातील प्रतिष्ठित नागरिक व लहान थोर मंडळी शोभायात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले*
No comments:
Post a Comment