Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, April 27, 2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 चे आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 चे आयोजन

तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 19/4/2023 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावयाचे आहे या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला  प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके,स्मिता पाटील, नंदीनी नरहरे, प्रियंका तोमर पाटील, कमल तवर, जयदेवी बिरादार, आशा पाटील, वर्षा श्रीमंगले शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2024 - 25 शैक्षणिक वर्ष  इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील पहिले पाऊल व विकास पत्र अशा दोन पुस्तीका देऊन स्वागत करण्यात आले.सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या या शाळा पूर्व मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर व सूरेख नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर,शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार यांनी केले.  सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. 1 या विषयावर सविस्तर माहिती दिली. मुलांचे नाव नोंदणी केली. शारीरिक विकास बौध्दिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी समुपदेशन मार्गदर्शन वरील टेबल क्रमांक 1 ते 7 नुसार मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी   उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके,स्मिता पाटील, नंदीनी नरहरे, प्रियंका तोमर पाटील, कमल तवर, जयदेवी बिरादार, आशा पाटील, वर्षा श्रीमंगले शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर  आदी जण उपस्थित होते. या शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर यांनी मानले.


































































Tuesday, April 16, 2024

वाढदिवस आभार संदेश

*माझ्या सोन्या सारख्या गोड व अप्रतिम मित्राचे मनःपुर्वक खूप खूप धन्यवाद*
-------------------------
         *🙏🌹🙏*
--------------------------
मी जर आयुष्यात काही कमावले असेल तर ते म्हणजे तुमच्या सारखे गोड माणसे,मी खूप भाग्यवान आहे की माझ्या कडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र व कुटुंब आहे, खर तर वाढदिवस म्हणजे वैयक्तिक बाब पण आपल्या सोन्या सारख्या व अप्रतिम मित्रानी माझ्या पत्नीला वाढदिवस शुभेच्छा रुपी एक सणच केलाच. दिलेल्या शुभेच्छांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो. आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आपण सर्वांनी या धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार असेच आपण नेहमीच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे राहतात हे माझे भाग्य,  वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष भेटून, शोशल मिडीयातून what's up, face book, sms शुभेच्छा रुपी प्रेम दिलात आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार, आपण नेहमीच शुभेच्छा वेळोवेळी देतात या शुभेच्छा मला नेहमीच प्रेरणादायी व ऊर्जात्मक असतात. आपल्या सर्वांचे मनापासून खुप खुप धन्यवाद. 
➖➖➖➖➖➖➖➖
*आपला मित्र*
*ज्ञानेश्वर बडगे तथा जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖



Sunday, April 14, 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येणारी विविध


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येणारी विविध उपाध्या 
ते 
🖊विश्वरत्न
🖊प्रज्ञावंत 
🖊प्रज्ञासुर्य 
🖊मुत्सदी
🖊क्रांतीसुर्य
🖊प्रतिभाशाली
🖊जिद्दी
🖊कायदेपंडित
🖊बहुजन उद्धारक
🖊धर्म चिकित्सक 
🖊न्यायप्रिय
🖊प्रतिभासंपन्न
🖊दयाळू
🖊कनवाळू
🖊समाताधिष्ट 
🖊करुणाकार
🖊बुध्दीवंत
🖊प्रज्ञावंत
🖊शिलवंत
🖊गुणवंत
🖊स्वच्छ राजकारणी
🖊संसदपटटू
🖊स्त्रीमुक्तीदाता
🖊शेतकऱ्यांचे कैवारी
🖊दिनांचे कैवारी
🖊पशुपक्षी तारणहार
🖊नागवंशी
🖊मूळनिवासी
🖊मुकनायक
🖊महानायक
🖊महामानव
🖊महापुरुष
🖊जागतिक किर्तीचे अभ्यासक
🖊परिवर्तनवादी
🖊प्रेरणादायी
    जलनायक
🖊बोधिसत्त्व
🖊बोधिवंत
🖊बोधिसुर्य
🖊कायदामंत्री
🖊कामगारमंत्री
🖊अर्थतज्ञ
🖊तत्त्ववेत्ता
🖊तत्वज्ञ
🖊अर्थशास्त्रज्ञ
    घटनातज्ञ
    प्राध्यापक
    मानवंश शास्त्रज्ञ
🖊चित्रकार
🖊पत्रकार
🖊 संपादक
🖊लेखक
🖊इतिहासकार
🖊भाषातज्ज्ञ
🖊राष्ट्रउद्धारक
🖊राष्ट्रपुरुष
🖊आधुनिक भारताचे जनक
🖊रिर्जव्ह बँकेचे जनक
🖊मनुस्मृती दहनकार
🖊क्रांतिकारक
🖊युगपुरुष
🖊युगप्रवर्तक
🖊द्रष्टा
🖊दूरदृष्टी बाळगणारा
🖊घटनेचे शिल्पकार
🖊बॅरिस्टर
🖊बापांचे बाप
🖊गोरगरिबांना राजा बनविण्याचा अधिकार देणारा 

🖊 खोती पध्दत बंद करुन शेतकऱ्यांना शेतीचा मालक बनवणारा 

🖊जगातल्या सर्वउत्कृष्ट वकिलांमधील एकमेव भारतीय वकील

🖊जगातील सर्वात हुशार 100 विद्वानांमधील प्रथम क्रमांकाचे एकमेव भारतीय विद्वान

🖊 *ज्यांच्या नावाने अनेक विद्यापिठे महाविद्यालये , शाळा व संस्था आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने शहरे ,गावे , नगरे ,जिल्हे आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक ग्रंथालये , वाचनालये आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक कारखाने , कंपन्या, उदयोग आहेत*
🖊 *ज्यांच्यावर अनेक चित्रपटे , मालिका, नाटके आणि भारतातल्या सगळ्याच भाषेत लाखो गाणी आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक चौके , रस्ते , महामार्ग , स्थानके , विमानतळे , स्टेडियम आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक घरे , वास्तू , दवाखाने , स्मारके आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक पक्ष , संघटना , संस्था , प्रतिष्ठाने आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक पुरुष्कार , पारितोषिके दिली जातात*
🖊 *ज्यांच्या नावाने लाखो पुस्तके , लेख ,कविता लिहिली जातात*
🖊 *ज्यांच्या नावाने अनेक मंडळे , योजना , वसतिगृहे, विमानतळे , भवने , सभागृहे आहेत*
🖊 *ज्यांचे नाव अनेक लहान मुलांना दिले जाते*
🖊 *ज्यांचे जगभर पुतळे आहेत*
🖊 *ज्यांच्या नावाने जगभरातील जन माणसात प्रेरणा निर्माण होते*

🖊 *The greatest Indian*
🖊 *राष्ट्रनिर्माता*
🖊 *संविधान निर्माता*
      जग बदलणारा बापमाणूस

🖊 *भारतरत्न*
     जग बदलणारा बाप माणूस
🖊 *तुमचे आमचे सर्वांचे बाबासाहेब*

🖊 *डॉक्टर भिमराव रामजी आंबेडकर*

🖊 *यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !*

🖊 *यांच्या 133व्या जयंतीच्या सर्वांना*
*मंगलमय शुभेच्छा*




तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*


तिवटग्याळ - आज दिनांक 14/4/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 14 एप्रिल 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, रमेश वाघमारे लोहारकर, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थ्यांनी कु. प्रांजली शंकर कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली व आपले मनोगतपत भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले. या वेळी  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, रमेश वाघमारे लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते