*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
तिवटग्याळ - आज दिनांक 14/4/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे 14 एप्रिल 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, रमेश वाघमारे लोहारकर, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थ्यांनी कु. प्रांजली शंकर कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली व आपले मनोगतपत भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, रमेश वाघमारे लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते
No comments:
Post a Comment