जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 चे आयोजन
तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 19/4/2023 रोजी शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावयाचे आहे या बद्दल आज शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके,स्मिता पाटील, नंदीनी नरहरे, प्रियंका तोमर पाटील, कमल तवर, जयदेवी बिरादार, आशा पाटील, वर्षा श्रीमंगले शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सन 2024 - 25 शैक्षणिक वर्ष इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील पहिले पाऊल व विकास पत्र अशा दोन पुस्तीका देऊन स्वागत करण्यात आले.सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या या शाळा पूर्व मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या शाळा पूर्व तयारी मेळावा चे अतिशय सुंदर व सूरेख नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर,शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार यांनी केले. सर्व प्रवेशपात्र मुलांचे पूष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळा पूर्व तयारी मेळावा क्र. 1 या विषयावर सविस्तर माहिती दिली. मुलांचे नाव नोंदणी केली. शारीरिक विकास बौध्दिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी समुपदेशन मार्गदर्शन वरील टेबल क्रमांक 1 ते 7 नुसार मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपसरपंच सौ. आरती तवर, सत्यभामा साळुंके,स्मिता पाटील, नंदीनी नरहरे, प्रियंका तोमर पाटील, कमल तवर, जयदेवी बिरादार, आशा पाटील, वर्षा श्रीमंगले शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर आदी जण उपस्थित होते. या शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment