Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, May 1, 2024

केंद्र प्रमुख मा. गुंडेराव जोशी यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न


*केंद्र प्रमुख मा.  गुंडेराव जोशी यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने निरोप सत्कार सोहळा संपन्न*


उदगीर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनाकवाडी ता. उदगीर जिल्हा लातूर येथे तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख मा. गुंडेराव पांडुरंग जोशी यांचा सपत्नीक सौ. सिंधुताई जोशी. आज दिनांक 25/4/2024 रोजी सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला. नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त  होणारे तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय व्यक्तिमत्व मा. गुंडेराव जोशी दिनांक 31/5/2024 रोजी सेवा निवृत्त होत असल्याने तोंडार केंद्राच्या वतीने आज दिनांक 25/4/2024 रोजी सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.  साहेबांचा गेल्या दोन महिन्यांतील कार्यकाल नक्कीच स्वप्नवत होता यात कुणालाही शंका नाही. सकारात्मक वृत्ती असलेला त्यांचा दृष्टिकोन,त्यांच्या अंगी असलेला एक उपक्रमशील केंद्रप्रमुख ,समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची असलेली मृदू व अविट भाषा,निःस्वार्थ सेवावृत्ती,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यानंतर सामाजिक क्षेत्रात भजन, किर्तन अशा बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक सद्गअशा सर्वांच्याच हृदयात स्थान मिळवले होते.अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनाकवाडी शाळेत तोंडार केंद्रातील व शंभूउमरगा केंद्रातील शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकात शाळेतील पदवीधर शिक्षक तथा केंद्र प्रमुख मधुकर मरलापल्ले यांनी गुंडेराव जोशी यांच्या एकूणच सेवा काळातील जीवनावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख खुर्शीद मुख्याध्यापक हैबतपुर,  प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी शेख शफी साहेब , विस्तार अधिकारी मा नितीन लोहकरे, वसंतराव सुर्यवंशी, शिवशंकर पाटील , केंद्रप्रमुख विजयकुमार चौव्हाण, रमेश जाधव , मुख्याध्यापक संजय बिरादार, संजय मळभागे तसेच  केंद्र प्रमुख गुंडेराव जोशी यांच्या सुविज्ञ पत्नी सिंधुताई जोशी, शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद धानुरे आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी फड , सरपंच सुग्रीव पवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच यांचाही भारतीय संस्कृती प्रमाणे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे निमित्ताने सत्कार  करण्यात आला.साहेबांच्या कामकाज, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या बाबतीत मनोगतातून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, उपक्रमशील शिक्षक पुंडलिक मुळे व प्रतिभा मुळे यांनी कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख होते असे मनोगतपत भाषणातून व्यक केले. या निरोप सत्कार सोहळ्यासाठी तोंडार केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीसाठी हकनाकवाडी शाळेतील मधुकर मरलापल्ले व सर्व शिक्षकांनी निरोप सत्कार समारंभासाठी  परीश्रम घेतले.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक तथा केंद्रप्रमुख मधुकर मरलापल्ले व आभार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत कोलेवाड यांनी मानले





























































































































No comments:

Post a Comment