Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, September 1, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त शैक्षणिक भुलई चा जागर.*

तिवटग्याळ .....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 9/8/2024 रोजी मोठ्या उत्साहात नागपंचमी  निमित्त  शाळेत शैक्षणिक भुलई   जागर आयोजित करण्यात आला. प्रथम शाळेत परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थीनी ना साडी हा  पोशाख व सिव्हिल रंगीत ड्रेस परिधान करून शाळेत  नागपंचमी या सणा निमित्ताने यावे असे सांगितले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी नागपंचमी सणांविषया वर आधारित सविस्तर माहिती सांगितली व विविध शालेय गीते, बडबड गीते, कविता,  भक्ती गीते शाळेतील सर्व मुलींनी अतिशय सुंदर गीते भुलई रूपात सादर केली. या गीतांना उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर दाद दिली. . या गीतांच्या सराव शाळेचे मुख्याध्यापक शज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व गीताताई कच्छवे यांनी परीश्रम घेतले*

































































































No comments:

Post a Comment