*ज्ञानेश्वर बडगे यांचा उत्कृष्ट BLO म्हणून उपजिल्हाधिकारी मा. सुशांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार*
उदगीर - आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालयात लातूर लोकसभा 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या दोन्ही वेळेला भाग क्रमांक 322 तिवटग्याळ मतदान केंद्रावर उदगीर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मध्ये लोकसभेत पहिला क्रमांक व विधानसभा निवडणुकीत दुसरा क्रमांक मतदान टक्केवारी पटकावली बद्दल उपजिल्हाधिकारी डॉ सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम पंधरासे रुपये (१५००)देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने तिवटग्याळ नगरीतील मा. सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा रमेश, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील,पोलीस पाटील धनराज पाटील, BAG सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment