रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर व सृजन सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीस वितरण समारंभ आयोजित
-------------------------------------
उदगीर - आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर व सृजन सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे 3 रे लोकसंस्कृती साहित्य संमेलन 2025 अतिशय सुंदर व देखणा दिंडी सोहळास उत्कृष्ट योगदानाबद्दल व रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठान उदगीर यांच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला, रंगभरण, निबंध स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.मा.बस्वराज पाटील नागराळकर साहेब, प्राचार्य मा. राजकुमार मस्के, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर साहेब, मा. तहसीलदार राम बोरगावकर साहेब, प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा बिभीषण मद्देवाड, सचिव ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी, ज्ञानेश्वर बडगे तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व मनःपुर्वक अभिनंदन करुन बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक तथा साहित्यीक, पत्रकार रसुल पठाण यांनी व आभार मा. बिभीषण मद्देवाड यांनी मानले
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment