रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा.
उदगीर वार्ता......... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे सय्यद जिशान- शिक्षणाधिकारी, सय्यद तैरीम- गटशिक्षणाधिकारी, गायकवाड रोहित- शिक्षण विस्तार अधिकारी, सय्यद अमन- केंद्र प्रमुख, गायकवाड प्रांजली- मुख्याध्यापक, शेख इस्माईल- शिक्षक,, सय्यद नेहा,- शिक्षिका, शेख महेबुब- शिक्षक, मनियार सिमरन- शिक्षिका.या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप मज्जा आली असे बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेस छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर स्वंयशासन दिन साजरा केला बद्दल अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं गायकवाड प्रांजली व आभारप्रदर्शन सय्यद तैरीम यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, आदी जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment