*मा. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल जी केंद्रे यांच्या हस्ते बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळेत पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण.
बोळेगाव बु. - दिनांक 25/9/2020 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त बोळेगाव बु. तालुका शिरूर अनंतपाळ शाळेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.येथील शाळेच्या आवारात मा. श्री राहुल केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर व भाजपा कार्यकर्त्यां सह वृक्षारोपण करण्यात आले. तदनंतर शाळेची इमारत व शौचालय पाहणी केली. तसेच मा. जिल्हा परिषद अध्यक्षांनी शाळेतील शैक्षणिक बाबतीत सर्व शिक्षकांशी चर्चा केली.ऐकुन समाधान व्यक्त केले.तसेच छोटेखानी शाळेच्या कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल जी केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवर ऋषिकेश बद्दे जेष्ठ नेते,मा. ज्ञानेश्वर चेवले भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष लातूर, तानाजीराव बिरादार यांचा शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ऋषिकेश बद्दे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, गणेश धुमाळे, ऋषिकेश फड, तानाजी बिरादार, अमित बोळेगावकर, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद प्रा.शा. बोळेगाव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकटराव खटके व शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे, शाळेतील शिक्षक श्री सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, श्रीमती आशा मुळे व मजलसा पुठ्ठेवाड शिक्षक, शिक्षीका , ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर बडगे व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment