Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 11, 2021

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे Part-2


☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--132*
             ╭════●●●════╮
              *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

*कुर्डुगड (विश्रामगड)*

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: ताम्हणी घाट
*जिल्हा* : रायगड
*श्रेणी* : मध्यम

सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हणी घाटाचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता.
*पहाण्याची ठिकाणे* :कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्याहून कोकणात उतरणार्‍या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच टाक आहे. कातळात खोदलेल्या पाय‍र्‍या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर १ मीटर उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. या हनुमानाने आपल्या पायाखाली पनवतीला जखडून ठेवलेले आहे. मुर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मीत घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील.

किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते, पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. गुहे पासून सुळका उजव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी बांधुन संरक्षित केलेला दिसतो. आजही तेथिल तटबंदी शाबूत आहे. तटबंदी पाहून सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर एक प्रचंड दरड कोसळलेली दिसते. या दरडीमुळे पुढे जाण्याची वाट अडवलेली आहे. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्या मधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. पुढेही अरूंद पायवाटेवरून बाजूच्या दगडाला पकडत पुढे जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने बरोबर रोप असल्यास हा भाग पार करावा. अन्यथा आल्या मार्गाने परत जाऊन हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच दरड कोसळलेली पाहायला मिळते. हे टाक पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली दुर्गफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :मुंबई -पनवेल - पेण मार्गे मुंबई- गोवा महामार्गावरील कोलाड गाव (१२० किमी) गाठावे. कोलाड गावाच्या पुढे डाव्याबाजुला ताम्हणी घाटमार्गे पुण्याला जाणारा रस्ता आहे तो पकडावा. ताम्हणी घाटाच्या अगोदर वरचीवाडी गाव आहे. तेथे मुख्य रस्ता सोडुन उजव्या बाजुला बागड गावाला जाणारा रस्ता पकडावा. हा रस्ता बागड एम आय डी सी - तासगाव - कांदळगाव- बामणवाडी मार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या जिते गावात जातो. जिते गावातून साधारणपणे २ ते २.३० तास चालल्यावर आपण चार सहा घरांच्या वाडी जवळ पोहोचतो. येथे शाळा आहे. वाडीतून ३० मिनिटात आपण गडाच्या प्रवेशव्दारात दाखल होतो.

*राहाण्याची सोय* :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
*जेवणाची सोय* :
जेवणाची सोय स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
जिते गावातून अडीच ते तीन तास लागतात.
*जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
सप्टेंबर ते मार्च.
*सूचना* :
रोप(४० फ़ुटी)बरोबर बाळगावा.
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--131*
             ╭════●●●════╮
              *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯
*कुंजरगड (कोंबडगड)* 


*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: बालाघाट रांग
*श्रेणी* : मध्यम

कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चढून आल्यावर अजून एक डोंगररांग आडवी येते तीला बालाघाट रांग म्हणतात. हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्‍या या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. "कुंज" या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन "कुजंरगड" असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.

सुचना
१) खाजगी वाहानाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलालगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात.सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी सकाळी उन तापण्या अगोदर कलालगड करावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. त्याची साईट वरील माहिती वाचुन घ्यावी) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड करुन परतीचा प्रवास करावा.
२)वरील सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर लिहीलेली आहे
*पहाण्याची ठिकाणे* :विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत. त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात. या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून दुसर्‍या मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन मंदिर बांधण्याचा गावकर्‍यांचा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात.

या मुर्ती पाहून मागे न जाता कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे. पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत असावा. हि गुहा पाहुन पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द (डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात. पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्‍या डोंगरावर जावे. या डोंगरावर ३ नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.
*पोहोचण्याच्या वाटा* :कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१) विहिर गावातून :- विहिर गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाव गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने (१६ किमी) ब्राम्हणगाव - (१६ किमी) कोतूळ -(१६ किमी) विहिर गाव आहे.विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
(अ) कुंजरगड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यामधील खिंडीतून गडावर जाता येते.
(ब) कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते.
त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या खिंडीतून जाणार्‍या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो.
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गड चढतांना खिंदी मार्गे चढावा तर उतरतांना बाजूच्या डोंगरवरून उतरावा म्हणजे सर्व अबषेश पाहून होतात.

२) फोफसंडी गावाकडून :- फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. गावातून एकच वाट कुंजर गडावर जाते. या मार्गाने गडावर आल्यास हनुमानाची व काळोबाची मुर्ती पहायला मिळत नाही. त्यासाठी डोंगराला वळसा घालून विहिर गावाच्या बाजूस जाऊन परत फिरावे लागते. तसेच नैसर्गिक गुहा पहाण्यासाठी वेगळा फेरा पडतो.
फोफसंडी गावाकडून गड चढून विहिर गावात उतरता येईल. परंतु या भागात एसटीची सेवा मर्यादीत आहे. त्यामुळे स्वत:चे खाजगी वहान असल्यास उत्तम.

*राहाण्याची सोय* :
गडावर राहण्याची सोय नाही. विहिर गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
*जेवणाची सोय* :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :
पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
१) विहिर गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात. २) फोफसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास
*जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
जुलै ते फेब्रुवारी

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--130*
             ╭════●●●════╮
              *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

*कुलंग किल्ला*

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: कळसूबाई
*जिल्हा* : नाशिक
*श्रेणी* : कठीण

सह्याद्री मधील अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट चढायला सर्वात कठीण आहे. यातील कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. कळसुबाईच्या रांगेमध्ये कुलंग गडाच्या जोडीला अलंग, मदन, पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले ठाण मांडुन बसलेले आहेत.
*पहाण्याची ठिकाणे* :कुलंगचा दुसर्‍या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळ कड्यामध्येच दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत.
गुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्‍यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते. समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. आता कुलंगचा पश्चिम कडा पाहून दरवाजापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची. पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. टाकी पाहून समोरची दिशा धरायची २० मिनीटात आपण कुलंगवरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. कुलंगच्या या घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. किल्ल्यावर रहाणार्‍यांच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका दिसतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :१) घोटीहून १० किमी वर कळसुथे नावाचे गाव आहे. इथेपर्यंत जाण्यासाठी खाजगी जीप, ऑटो ची सुध्दा सोय होते. इथे पाय उतार होऊन आपली पायगाडी चालू करायची. येथुन दोन तासांवर कुलंगवाडी नावाचे गाव लागते.कुलंगवाडी गाव जरी किल्ल्याच्या पायथ्याशी असले तरी किल्ल्यावर जाण्याचा मुख्य रस्ता कुलंगवाडीपासून दोन तासांच्या अंतरावर चालू होतो. वाट जंगलामधुन असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नाही. मध्येच एका ओढ्याच्या काठी जंगलामध्ये आंबेवाडी मधून येणारी वाट येऊन मिळते. येथून सर्व वाटा एकत्र होऊन किल्ल्यावर जातात. वाट मधुनच जंगलातून तर कधी उघड्या पठारावरुन जाणारी आहे. डिसेंबर पर्यंत वाटेत असणार्‍या ओढ्यामध्ये पाणी मिळते. साधारण दोन तासांच्या चढाईनंतर आपण एका पठारावर पोहोचतो. डोक्याच्या वर पाहिल्यावर कुलंगचा खडा पहाड अजुनही ताठ मानेने उभा असतो.
येथुन चालू होते ती खरी कातळ चढाई. ही वाट म्हणजे कातळामधुन कोरलेल्या पायर्‍याच आहेत. एका बाजूला कुलंगची दरी आणि उजव्या बाजूस कातळ, मध्येच थोडासा मातीचा घसारा अशा तर्‍हेने साधारण दोन तासाने आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्यावर थोडा जीवात जीव आल्या सारखा वाटतो. तरी शेवटच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजुन १०० पायर्‍या चढून जाव्या लागतात. पहिल्या दरवाज्यापाशी छोटीशी गुहा आहे. इथुन अलंग, मदन आणि कुलंग मधील दरीचे सुंदर दर्शन होते.

२) किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आंबेवाडी गावातून जाते. घोटी मार्गे आंबेवाडी गाव गाठण्यास सुमारे एक तास लागतो. घोटीवरुन आंबेवाडीसाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे. आंबेवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आधी दोन तासांची रपेट करावी लागते आणि मग वाट मध्येच एके ठिकाणी डावीकडे जंगलामध्ये वळते. लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे इथे एका माणसाच्या आकाराचे मोठे वारुळ आहे. तिथेच कुलंग वाडी वरुन येणारी वाट येऊन मिळते. वाट चुकलो नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर वर पहायचे म्हणजे आपण मदन किल्ल्याच्या नेढ्याच्या बरोबर खाली उभे असल्याचे समजते. इथून पुढची वाट वर दिल्याप्रमाणे आहे.

*राहाण्याची सोय* :किल्ल्यावर रहाण्यासाठी काही गुहा आहेत. त्यामध्ये ३० ते ४० जण राहू शकतात.
*जेवणाची सोय* :जेवणाची सोय स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :किल्ल्यावर पाण्याची बारमाही टाकी आहेत.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :१) कुलंगवाडीतून ५ तास लागतात, २) आंबेवाडीतून ५ तास लागतात.

*सूचना* :
१) कुलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.
२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.
३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.
४) अलंग, मदन गडांची माहिती साईटवर दिलेली आहे.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--129*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कोर्लई किल्ला* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: डोंगररांग नाही
*जिल्हा* : रायगड
*श्रेणी* : मध्यम

अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्‍याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ८ किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. कोर्लईपर्यंत बसने जाता येते. इथून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे‘ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे व एका बाजूला जमिन आहे.
*इतिहास* :१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्‍हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत…:च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्‍या बुर्‍हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्‍या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.
*पहाण्याची ठिकाणे* :लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. इथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला दिसतो. चिंचोळ्या डोंगरमाथ्यामुळे किल्ल्याची रूंदी कमी आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे व डावीकडे प्रवेशव्दारे दिसतात. ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर २ तोफा दिसतात. पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते, याच्या माथ्यावर ४ तोफा पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला पांढर्‍या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. त्याच्या समोर पाण्याची टाकी आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून टाकी वरून बांधून काढलेली आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर माथ्यावर शिलालेख असलेल्या प्रवेशद्वारातून आपण चर्च समोर येतो. येथे एका वाड्याचे जोत आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर एक शिलालेख पडलेला आहे. प्रवेशद्वाराच्या रचनेवरून असे वाटते की, पूर्वीच्या काळी हेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असावे.चर्च वरुन पुढे गेल्यावर अजून एक प्रवेशद्वार आहे. पुढे अष्टकोनी बुरुज आहे. या बुरुजावरुन वाट दक्षिण टोका वरील बुरुजांकडे जाते. या बुरुजांवर तोफा आहेत.बुरुजांखाली खंदक खोदलेला आहे.

दक्षिण टोकावरुन परत लाईट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन आता डाव्या बाजूची २ प्रवेशद्वारे ऒलांडून गेल्यावर उतार चालू होतो. समोर अर्धगोलाकार पसरलेली तटबंदी व त्यामागे पसरलेला अथांग सागर यांचे दर्शन होते. या तटबंदीत पूर्वेला एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर समुद्रावर एक जेटी बांधलेली आहे. पश्चिमेला तटबंदीत एक दरवाजा आहे. उत्तर टोकाला एक बुरुज आहे. यावर ४ तोफा व क्रुस आहे. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रूज म्हणतात. येथे आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
*पोहोचण्याच्या वाटा* :मुरुड जंजिर्‍याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते अथवा आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने जाऊन २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो . गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो.
१) अलिबागहून मुरुड जंजिर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो , तर डावीकडचा रस्ता बिर्ला मंदिराकडे (गणपती मंदिर) जातो. उजवीकडच्या रस्त्याने कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारा व किल्ला यांच्या मधून कच्चा रस्ता लाईट हाऊस पर्यंत जातो. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण १० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
२) कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरुन डोंगर चढून गेल्यावर एक खंदक लागतो. खंदक पार केल्यावर आपण कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास ४० मिनीटे लागतात.

*राहाण्याची सोय* :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, रेवदंडा किंवा मुरूडला राहण्याची सोय होऊ शकते.
*जेवणाची सोय* :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :
गडावर पाण्याची टाकी आहे. पाणी काढण्यासाठी आपल्या बरोबर दोर आणि बादली घेऊन जावी.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
कोर्लई गावातून चालत किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून जाण्यास १५ मिनीटे लागतात.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--129*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कोर्लई किल्ला* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: डोंगररांग नाही
*जिल्हा* : रायगड
*श्रेणी* : मध्यम

अलिबाग हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इथला समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे सगळेच पाहतात. इथून दक्षिणेस, म्हणजे मुरूड-जंजिर्‍याच्या दिशेने निघालो की, १५ किमी वर रेवदंड्याचा कोट आणि पुढे ८ किमी वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. कोर्लईपर्यंत बसने जाता येते. इथून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. हा किल्ला थोडा वेगळाच आहे, कारण हा स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी म्हणूनच याला पंडित महादेवशास्त्री जोशींनी ‘कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे‘ असे म्हणून जणू गौरविलेच आहे. यास तिन्ही बाजूंनी सागराने वेढा घातला आहे व एका बाजूला जमिन आहे.
*इतिहास* :१५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडे रेवदंड्याजवळच्या चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधण्याची परवानगी मागितली आणि ते बांधले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक होते. १५९४ साली पहिला बुर्‍हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वत…:च एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला ठरले असे की, निजामाने किल्ला बांधू नये आणि पोर्तुगीजांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसर्‍या बुर्‍हाण निजामाने मात्र पोर्तुगीजांना न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला. एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीजांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला, शेवटी त्यांनी गड घेतला. गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. एका उल्लेखानुसार इथे १६०२ साली ८००० शिबंदी होती. एवढ्या सार्‍या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.
*पहाण्याची ठिकाणे* :लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. इथून आपल्याला दक्षिणोत्तर पसरलेला किल्ला दिसतो. चिंचोळ्या डोंगरमाथ्यामुळे किल्ल्याची रूंदी कमी आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे व डावीकडे प्रवेशव्दारे दिसतात. ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर २ तोफा दिसतात. पुढे दुसरे प्रवेशद्वार लागते, याच्या माथ्यावर ४ तोफा पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला पांढर्‍या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. त्याच्या समोर पाण्याची टाकी आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून टाकी वरून बांधून काढलेली आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर माथ्यावर शिलालेख असलेल्या प्रवेशद्वारातून आपण चर्च समोर येतो. येथे एका वाड्याचे जोत आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर एक शिलालेख पडलेला आहे. प्रवेशद्वाराच्या रचनेवरून असे वाटते की, पूर्वीच्या काळी हेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असावे.चर्च वरुन पुढे गेल्यावर अजून एक प्रवेशद्वार आहे. पुढे अष्टकोनी बुरुज आहे. या बुरुजावरुन वाट दक्षिण टोका वरील बुरुजांकडे जाते. या बुरुजांवर तोफा आहेत.बुरुजांखाली खंदक खोदलेला आहे.

दक्षिण टोकावरुन परत लाईट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन आता डाव्या बाजूची २ प्रवेशद्वारे ऒलांडून गेल्यावर उतार चालू होतो. समोर अर्धगोलाकार पसरलेली तटबंदी व त्यामागे पसरलेला अथांग सागर यांचे दर्शन होते. या तटबंदीत पूर्वेला एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर समुद्रावर एक जेटी बांधलेली आहे. पश्चिमेला तटबंदीत एक दरवाजा आहे. उत्तर टोकाला एक बुरुज आहे. यावर ४ तोफा व क्रुस आहे. यास क्रुसाची बातेरी किंवा सांताक्रूज म्हणतात. येथे आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
*पोहोचण्याच्या वाटा* :मुरुड जंजिर्‍याला जाणारी बस आपल्याला गावाच्या वेशीवर सोडते अथवा आपल्याला रेवदंड्याला पोहोचावे लागते. इथे राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. इथून कोर्लई गावात आपण रिक्षाने जाऊन २० मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोहोचतो . गडाच्या पायथ्याशी एक सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर आपण दोन वाटांद्वारे पोहोचू शकतो.
१) अलिबागहून मुरुड जंजिर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर रेवदंड्यानंतर कुंडलिका खाडीवरील पूल ओलांडल्यावर उजवीकडचा रस्ता कोर्लई गावात जातो , तर डावीकडचा रस्ता बिर्ला मंदिराकडे (गणपती मंदिर) जातो. उजवीकडच्या रस्त्याने कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर समुद्रकिनारा व किल्ला यांच्या मधून कच्चा रस्ता लाईट हाऊस पर्यंत जातो. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून आपण १० मिनिटांत कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो.
२) कोर्लई गावातील कोळीवाड्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरुन डोंगर चढून गेल्यावर एक खंदक लागतो. खंदक पार केल्यावर आपण कोर्लईच्या गडमाथ्यावर पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर जाण्यास ४० मिनीटे लागतात.

*राहाण्याची सोय* :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, रेवदंडा किंवा मुरूडला राहण्याची सोय होऊ शकते.
*जेवणाची सोय* :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :
गडावर पाण्याची टाकी आहे. पाणी काढण्यासाठी आपल्या बरोबर दोर आणि बादली घेऊन जावी.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
कोर्लई गावातून चालत किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात. लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायर्‍या चढून जाण्यास १५ मिनीटे लागतात.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--128*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कोरीगड कोराईगड* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: लोणावळा
*जिल्हा* : पुणे
*श्रेणी* : मध्यम

मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.पावसाळ्यानंतरचा काळ या भागात ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे.
*इतिहास* :या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही. गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात. इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग,तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला. ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला. 
*पहाण्याची ठिकाणे*:पेठशहापूरच्या वाटेने वर येतांना पायवाट संपल्यावर पायर्‍या लागतात. पायर्‍या चढतांना उजव्या बाजूला दोन खांबांवर तोललेली एक गुहा आहे. या गुहेच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तेथे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पुढे पायर्‍या चढून गेल्यावर उजव्या बाजूला एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक गुहा आहे. या गुहेच्या समोर खालच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. गुहा आणि टाक पाहून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याचा गणेश दरवाजापाशी येतो. या पश्चिमाभिमुख गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी चार बुरुजांची योजना केलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते याठिकाणी असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज उध्वस्त झालेला आहे. 

किल्ल्यात प्रवेश केल्यावर भलेमोठे पठार दिसते. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या गडाला साधारणत… दीड किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. तटबंदीत जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. गणेश दरवाजाने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराच्या अंगणात ४ ओतीव तोफ़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या मागे दोन तलाव आहेत. तलावांजवळ वाड्यांचे अवशेष आढळतात. फ़ांजी वरुन उत्तर टोका कडील बुरुजाच्या दिशेने चालत जावे. उत्तर टोका वरील या बुरुजावर झेंडा लावलेला आहे. या बुरुजावरुन दूरवरचा प्रदेश दिसतो. तसेच पेठ शिवापूर गावातून येणारी वाट दिसते.

उत्तर बुरुजा वरुन पुन्हा महादेव मंदिरापाशी येउन दक्षिणेकडे पुढे गेल्यावर हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या मागे कातळात कोरलेला छोता तलाव आहे. या तलावाच्या बाजूने तटबंदी लगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एका चौथर्‍यावर उभारलेली लक्ष्मी तोफ़ पाहायला मिळते. या तोफ़ेच्या पुढे गडाची अधिष्ठात्री देवता कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणत… चार फूट आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. त्याच्या बाजूला एक महिषासूर मर्दीनीची मुर्ती कोरलेला दगड आहे. कोराई देवी मंदिराच्या पुढे खालच्या बाजूला दोन बुरुजांच्या मध्ये गडाचा दुसरा दरवाजा आहे. आंबवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते. हे प्रवेशव्दार पाहून गणेश दरवाजाकडे चालत निघाल्यावर वाटेत एक तोफ़ आहे . जागोजागी उध्वस्त वाड्यांचे अवशेष आहेत. गणेश दरवाजापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड पाहाण्यासाठी एक तास लागतो. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, असा सर्व परिसर दिसतो.
*पोहोचण्याच्या वाटा*:सद्य…स्थितीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत.
१ पेठशहापूर मार्गे:- 
कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा (ऍम्बी व्हॆली) सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, (आयएनएस शिवाजीच्या) पुढे १६ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायर्‍यांपाशी घेऊन जाते. पायर्‍यांच्या सहाय्याने पाऊण तासात गडावर पोहोचता येते. 

पेठशहापूर गाव बाहेर मुख्य रस्त्यावर वहानतळ उभारलेला आहे. या वहानतळच्या पुढे २ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने १० मिनिटे चढल्यावर आपण सपाटीवर येतो. येथून किल्ल्याला वळसा घालून जंगलातील पायवाटेने १० मिनिटात पायर्‍यांपाशी पोहोचता येते. पायर्‍यांच्या सहाय्याने २० मिनिटात गडावर पोहोचता येते. 

दोन्ही मार्गांनी गडावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो. 


२ आंबवणे गाव मार्गे:- 
आंबवणे गाव हे पेठशहापूर गावाच्या अलिकडे आहे. कोरीगडला जाण्यासाठी आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट मात्र जरा अवघड आहे. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून एका तासात गडावर जाता येते. 

*राहाण्याची सोय* :
पेठशहापूर गावातील हनुमान मंदिरात आणि आंबवणे गावातील महादेव मंदिरात राहण्याची सोय होते.
*जेवणाची सोय* :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. पेठशहापूर गावातील हॉटेलात जेवणाची सोय आहे.
*पाण्याची सोय* :
गडावरील तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणार्‍या वाटेवर एक टाके आहे. त्यातील पसणी पिण्या योग्य आहे.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
पेठशहापूर मार्गे पाऊण तास लागतो. आंबवणे गाव मार्गे एक तास लागतो.
*जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
वर्षभर

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--127*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कोळदुर्ग*

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: शुकाचार्य
*जिल्हा* : सांगली
*श्रेणी* : मध्यम

कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे. पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे. किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन पळशी गावातील सिध्देश्वराचे मंदिर बांधलेले आहे. 

कोळदुर्ग किल्ल्याजवळ असलेले शुकाचार्यांचे मंदिर आणि परिसर या भागात प्रसिध्द आहे. वर्षभर याठिकाणी लोकांचा राबता असतो, पण त्याला लागूनच असलेला कोळदुर्ग किल्ला मात्र दुर्लक्षित राहीलेला आहे. पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात. बाणुरदुर्गाची माहिती साईटवर दिलेली आहे.
*पहाण्याची ठिकाणे*
कोळदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला पठार आहे ते पळशी - बाणूरगड रस्त्याला जोडलेले आहे. तेथून किल्ल्यापर्यंत जायला १५ मिनिटे लागतात. कोळदुर्गाच्या इतर तीन बाजूना मात्र कडे आहेत. कोळदुर्गाला येणारी दुसरी वाट शुकाचार्याकडून येते. एसटी अथवा खाजगी वहानाने शुकाचार्य पर्यंत पोहोचता येते. इथे दोन डोंगरांमधील दरीत शुकाचार्यांचे पवित्र स्थान आहे. व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची ही तपोभुमी याठिकांई त्यांनी पांडवांचे पणतू राजा परिक्षित याला सात दिवसात भागवत सांगितले होते अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. इथे जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या बांधलेल्या आहेत. शुकाचार्यांचे मंदिर दाट झाडीत आहे. बाजूला बारमाही झरा आणि कुंड आहे. मंदिराच्या बाजूला दोन गुहा आहेत. या रखरखीत प्रदेशातील निसर्गरम्य स्थानाला भेट देऊन झर्‍याचे पाणी बाटल्यात भरुन घ्यावे. आल्या वाटेने कुंडाच्या पुढे १० पायर्‍या चढल्यावर उजव्या बाजूला एक ठळक पायवाट जंगलात जाते. या पायवाटेने बाजूच्या डोंगरावर चढायला सुरुवात करावी. पुढे एक सहज पार करता येण्याजोगा कातळ टप्पा आहे तो पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. शुकाचार्य मंदिर ते पठार पोहोचण्यासठी फ़क्त १० मिनिटे लागतात.

पठारावर समोरच दत्त मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागिल पायवाटेने पुढे गेल्यावर दोन पायवाटा आहेत सरळ जाणारी वाट कुसबावडे गावात जाते. तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते. शेतातून जाणार्‍या या वाटेवरुन थोडे पुढे गेल्यावर समोर कोळदुर्ग दिसतो. त्या किल्ल्यावरील दोन घर दिसतात. त्या घरांच्या दिशेने चालत जावे. पुढे गेल्यावर पठार संपते. कोळदुर्ग आणि कुसबावडे गावाच्या पठारा मधील दरी दिसते. शुकाचार्या पासून या दरीपर्यंत येण्यासाठी २० मिनिटे लागतात. दरीत उतरायला पायवाट आहे. या बजूला दरी फ़ारशी खोल नाही त्यामुळे ती पार करायला ५ मिनिटे लागतात. दरीतून किल्ल्याच्या दक्षिण बाजूची रचीव तटबंदी दिसते. तटबंदीतून किल्ल्यावर आपला प्रवेश होतो. शुकाचार्य ते किल्ला साधारणपणे ३० मिनिटात पोहोचता येते.

किल्ल्यावर चव्हाणांची हल्ली बांधलेली घर आहेत. घराच्या मागे तटबंदी आहे. ती फ़ोडून केलेला रस्ता पळधी - बाणूरगड रस्ताकडे जातो. घरच्या समोर थोडे पुढे चालत गेल्यावर किल्ल्यावरील देवळाचे काही अवशेष, पिंड, तुटलेला नंदी, दोन वीरगळ आणि एक सतीगळ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर खालच्या बाजूला तलाव आहे. त्या तलावाचा बांध फ़ोडून तलावाच्या जागी आता शेती केली जाते. किल्ल्याच्या उत्तरेला कड्या लगत तुरळक तटबंदी आहे. किल्ल्याचा घेर फ़ार मोठा आहे पण किल्ल्यावर इतर काही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. किल्ल्यावरुन उत्तरेला बाणूरगडावरील मंदिर दिसते. 

चव्हाणांच्या घरासमोर असलेल्या किल्ल्याच्या पूर्व टोकावरून एक ठळक पायवाट खालच्या हिवतड गावात उतरते. या वाटेने हिवतड गावात उतरण्यास १० मिनिटे लागतात. वाट उतरते तेथे गोशाळा आणि आश्रम आहे. या आश्रमा जवळच शुकाचार्यच्या पायर्‍या चालू होतात. या पायर्‍यांनी ५ मिनिटात शुकाचार्य मंदिरात पोहोचता येते. अशा प्रकारे शुकाचार्य मंदिर ते कोळदुर्ग ते परत शुकाचार्य मंदिर असा १ ते दिड तासाचा सोपा ट्रेक करता येतो. 
*पोहोचण्याच्या वाटा*
 :कोळदुर्गावर जाण्यासाठी प्रथम कराड गाठावे. कराड - पंढरपूर रस्त्याने (४२ किमी वरील) विटा गाव गाठावे विटा गावातून थेट बाणूर गडावर जाण्यासाठी एसटी बसेस आहेत. या बसने शुकाचार्यला उतरावे. खाजगी वहान असल्यास विटा गावाच्या पुढे २२ किमीवरील खानापूर हे तालुक्याचे गाव गाठावे. खानापूरच्या पुढे भिवघाट गाव आहे त्यापूढे शुकाचार्य, पळशी आणि बाणूरगडाचा फ़ाटा १० किमीवर आहे. पळशीच्या सिध्देशवर मंदिराच्या गाभार्‍याच्या भिंतीत कोळदुर्ग वरुन आणलेल्या मुर्ती आणि वीरगळी बसवलेल्या आहेत. त्या पाहून ४ किमी अंतरावरील शुकाचार्य गाठावे. शुकाचार्यच्या बाजूच्या डोंगरावर कोळदुर्ग आहे. कोळदुर्गवर जाण्यासाठी वर दिल्याप्रमाणे ट्रेक करावा. एसटीचे वेळापत्रक खाली दिलेले आहे. 

खाजगी वहान असल्यास थेट हिवतड गावातील गोशाळेपर्यंत जाता येते. भिवघाट गावातून निलकरंजे गाव गाठावे. तेथून एक रस्ता गोमेवाडी मार्गे हिवतड आणि पुढे शुकाचार्यला जातो.

*राहाण्याची सोय* :
किल्ल्यावरील राहाण्याची सोय नाही.
*जेवणाची सोय* :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी. भिवघाटला हॉटेल्स आहेत 

*पाण्याची सोय* :
किल्ल्यावर पिण्याच्या पाणी नाही.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
शुकाचार्य पासून अर्धा तास लागतो.
*जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
वर्षभर

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--126*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कोहोजगड* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: पालघर
*जिल्हा* : पालघर
*श्रेणी* : मध्यम

मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा तालुका लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा - पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज ’ हा प्रमुख किल्ला वाड्यापासून अवघ्या १० ते ११ किमी वर वसलेला आहे. ‘कोहोज ’किल्ल्यावरील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा या भागातून प्रवासा करताना आपले लक्ष घेतो.
*इतिहास* :या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्‍यापैकी जुना, सातवाहनकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला होता.
*पहाण्याची ठिकाणे* :कोहोजगडाच्या माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते. माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्‌ध्वस्त अवशेष आढळतात, काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी टाक्यातले पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपर्‍यात उघड्यावर मारुतीची मूर्ती आहे. इथून तीच वाट पकडून पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. येथून पायर्‍यांनी सुमारे १५ मिनिटांत वर गडमाथ्यावर पोहोचता येते. माथ्यावर वार्‍याने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती आहे. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट, विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो. इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा - मनोर) रस्ता छान दिसतो.

या सगळयात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत.
*पोहोचण्याच्या वाटा* :मुंबई - अहमदाबाद महामार्गावर (एन.एच.८) मुंबई पासून ९० कि.मीवर मनोर गाव आहे.येथून वाड्याला जाणारा फाटा फूटतो. या मनोर - वाडा रस्त्यावर मनोर पासून १३ कि.मीवर "वाघोटे" हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून ठळक पायवाट पाझर तलावा जवळून किल्ल्यावर जाते.

*राहाण्याची सोय* :
गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.
*जेवणाची सोय* :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
*पाण्याची सोय* :
पिण्याचे पाणी गडावर आहे.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--125*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *खांदेरी* 

*किल्ल्याचा प्रकार* : जलदुर्ग
*डोंगररांग*: डोंगररांग नाही
*जिल्हा* : रायगड
*श्रेणी* : मध्यम

सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैंकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळी म्हणजेच किल्ले खांदेरी - उंदेरी. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणार्‍या खांदेरी - उंदेरीचे वैशिष्टय म्हणजे मजबूत तटबंदी, उंदेरीवर असणार्‍या १५-१६ तोफा, तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणार्‍या गाड्यासहीत असणार्‍या ३ तोफा होय.
*इतिहास* :मुंबईच्या इंग्रजांवर वचक बसविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईपासून १५ मैलावर असणार्‍या ‘खांदेरी’ बेटावर किल्ला बांधण्याचे इ.स.१६७२ मध्ये ठरविले. त्याप्रमाणे किल्ल्याची तटबंदी बांधण्यास सुरुवात झाल्यावर इंग्रज व सिद्‌दी अस्वस्थ झाले. त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवरायांनी तात्पुरती माघार घेतली व किल्ला बांधण्याचे काम थांबविले. इ.स १६७९ मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक १५० माणसे देऊन ऐन पावसाळयात खांदेरी दूर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. यामुळे अस्वस्थ झालेल्या इंग्रजांनी किल्ल्याचे बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न केला, पण किल्ल्यावरुन मायनाक भंडारी व किनार्‍यावरुन (थळच्या खुबलढा किल्ल्यावरुन) दौलतखान यांनी इंग्रजांना प्रतिकार करुन किल्ल्याला रसद पुरवठा चालू ठेवला. या कामी महाराजांच्या आरमारात असलेल्या उथळ तळाच्या छोटया होडयांनी महत्वाची भूमिका निभावली. ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून या बोटींच्या हालचाली चालू असताना इंग्रजांच्या खोल तळ असलेल्या बोटी समुद्रात खोल पाण्यात अडकून पडल्यामुळे इंग्रजांना हात चोळत बसावे लागले. शेवटी इंग्रजांनी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला.

पुढे ८ मार्च, १७०१ रोजी सिद्‌दी याकूत खानने ‘खांदेरी’ वर हल्ला केला, पण मराठयांनी तो परतावून लावला. १७१८ मध्ये इंग्रजांनी मोठा तोफखाना युध्द नौकांवर ठेवून किल्ल्यावर हल्ला केला, पण किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी याने किल्ला ५०० माणसांनीशी महिनाभर लढवला. त्यामुळे इंग्रजांना हात हलवित परत जावे लागले. पुढे १८१४ मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात गेला. १८१७ मध्ये त्याचा ताबा परत आंग्रेकडे गेला. १८१८ मध्ये ‘खांदेरी’ किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
*पहाण्याची ठिकाणे* :खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच खांदेरीची मजबूत तटबंदी ,बुलंद बुरुज आणि त्यावर असणारे ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ चे दिपगृह आपले लक्ष वेधून घेते. खांदेरीवर दक्षिणेला ३० मीटर उंचीची, तर उत्तरेला २० मीटर उंचीची टेकडी आहे. या दोन टेकडयांमध्ये बोटींसाठी धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर ज्या ठिकाणी समुदाच्या पाण्याचा स्पर्श होतो तेथे चक्क एक तोफ पुरलेली आहे. या तोफेचा मागचा भाग पाण्यातून डोकावतांना दिसतो. बाजूलाच बोटीची एक शेड बांधली आहे.

*१ वेताळाचे मंदिर :*- 
धक्क्याच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे. आत एक मोठी पाढर्‍या रंगाने रंगविलेली शिळा आहे. ही शिळा म्हणजेच वेताळ होय. ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते, अशी गावकर्‍यांची श्रध्दा आहे. होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते. 

*२ भांड्याचा आवाज येणारा खडक :- *
डावीकडे असणार्‍या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहाकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतोछोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष: भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो 

*३ गाड्यावरील असणार्‍या तोफा :- *
धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. वर पोहोचल्यावर आपल्याला दिसते ती गाडयांवर ठेवलेली तोफ. ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा बाजूला असणार्‍या लहान टेकडीच्या बुरुजावर आहेत. 

*4)दिपगृह :-*
१८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी उंचीचे असून षट्‌कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची आहे. दिपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो. 

*५ मजबूत तटबंदी :- *
दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवर जिथे हेलिपॅड आहे, तिथेच खाली एक दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडल्यावर कडेकडेने चालतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांची कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपती व मारुती ची अलिकडे बांधलेली मंदिरे पण आहेत. किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुध्दा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीध्ये एक द्वार आहे. तिथेच एक छोटी खोली आहे. 
*पोहोचण्याच्या वाटा* :१) थळ मार्गे :- 
खांदेरी - उंदेरी या जलदुर्गांवर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला जावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ किमी अंतरावर "थळ" नावाच्या गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून २ ते ३ किमी वर "थळ" गाव आहे. अलिबागहून येथपर्यंत येण्यासाठी एसटी बस उपलब्ध आहेत. थळ बाजारपेठे जवळून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. अलिबागहून थळ आगाराकडे जाणार्‍या एसटी ने ही आपण बाजारपेठेकडे जाणार्‍या फाट्यावर उतरून चालत येथ पर्यंत येऊ शकतो.थळ बाजारपेठे जवळच्या समुद्रकिनार्‍याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात. यापैंकी जवळ असणारा किल्ला म्हणजे उंदेरी व डाव्याबाजूला थोड्या लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी होय. खांदेरी किल्ला त्यावर असणार्‍या दिपगृहामुळे लगेच लक्षात येतो. थळ बाजारपेठेच्या ठिकाणी सकाळी लवकर येणे सोईस्कर अन्यथा किनार्‍यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी ६ , ६.३० च्या आत समुद्रात जायला निघतात. उशीरा पोहोचल्यास मासेमारी करून येणाया बोटी आपल्याला मिळू शकतात.

मध्यम आकाराच्या साधारणत: ५ ते ६ लोक बसू शकतील अशा होड्या खांदेरी - उंदेरी दाखवून परत आणण्याचे होडीवाले भाव सांगतांना मात्र दुप्पट सांगतात. खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे, ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर ओहटीच्या वेळेसच जाता येते.खांदेरवर कधीही गेले तरी चालते, मात्र उंदरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. भरती ओहटीची वेळ काढण्याची सोपी पध्दत म्हणजे आपण ज्या दिवशी किल्ला पाहण्यास जाऊ त्यादिवशी मराठी पंचागा प्रमाणे जी तिथी असेल, तिला ३/४ ने गुणल्यास पूर्ण भरतीची वेळ सांगणारा आकडा मिळतो. उदा. जर चतुर्थी असेल तर ४ ला ३/४ ने गुणल्यास ३ आकडा मिळतो. म्हणजेच ३ वाजता रात्री किंवा दुपारी पूर्ण भरती असेल. याचप्रमाणे पूर्ण भरतीच्या वेळेनंतर ठीक ६ तासांनी पूर्ण ओहटीची वेळ असते. तर वरील उदाहरणामध्ये ९ वाजता रात्री आणि सकाळी ओहटी असते. थळच्या समुद्रकिनार्‍याहून उंदेरी किल्ला समुद्रात साधारण अडीच किमी वर आहे, तर खांदेरी किल्ला किनार्‍यापासून तीन साडेतीन किमी वर आहे. उंदेरीहून पश्चिमेला पाऊण किमी वर खांदेरी आहे. 

*राहाण्याची सोय* :किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. 
*जेवणाची सोय* :जेवणाची सोय आपण स्वत: करावी. 
*पाण्याची सोय* :खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे. उंदेरीवर पाणी अजिबात नाही. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :अलिबाग मार्गे २ तास लागतात.
*सूचना* :
१) खांदेरी, उंदेरी व खुबलढा किल्ल्याचे अवशेष एका दिवसात पाहाता येतात.
२) खुबलढा, उंदेरीची माहिती साईटवर दिलेली आहे. तसेच भरती ओहटीचे वेळापत्रक साईटवरील कुलाबा किल्ला व सर्जेकोट किल्ल्याच्या माहितीमध्ये दिलेले आहे.
या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*


☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--124*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *केंजळगड*


*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: महाबळेश्वर
*जिल्हा* : सातारा
*श्रेणी* : मध्यम

केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
*इतिहास* :बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला. 
*पहाण्याची ठिकाणे*.:कोर्लेमार्गे सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे, तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते, म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणार्‍या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायर्‍या होत. ज्या किल्ल्याच्या पायर्‍या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत, अशा मोजक्या किल्ल्यांमध्ये केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंचच उंच पायर्‍या आहेत.

रायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायर्‍यांपाशी येऊन पोहचतो. पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पायर्‍या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.

गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :१ कोर्लेमार्गे :- 
भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्‌टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्‍या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.


२ वाईमार्गे :- 
वाईमार्गे गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एसटी थांबते तेथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्‍या वाटेवर येतो. 

३ रायरेश्वरमार्गे 
रायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे, उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीडएक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.

*राहाण्याची सोय* :गडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते, पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती, जेमतेम पाचसात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहाबारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. 
*जेवणाची सोय* :जेवणाची सोय आपणच करावी. 
*पाण्याची सोय* :गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते, या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :१) रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--123*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *रामशेज किल्ला*


रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दर्‍यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दर्‍यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.

मार्ग
इतिहास संपादन करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

दोन वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--122*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯
*केळवे किल्ला*  

*किल्ल्याचा प्रकार* : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
*डोंगररांग*: डोंगररांग नाही
*जिल्हा* : ठाणे
*श्रेणी* : सोपी

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या समुद्रकिनाराच्या उत्तरेला सुरुच्या वनात केळवे किल्ला आहे. किल्ल्याचा आकार चांदणी प्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत.
*इतिहास* :केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
*पहाण्याची ठिकाणे* :
किल्ला वाळूत गाढला गेला असल्यामूळे प्रवेशद्वारातून रांगतच आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. त्यातून वाकून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो.
*पोहोचण्याच्या वाटा*:केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन उजव्या बाजूची वाट केळवे बीच कडे जाते. या वाटेने बीचवरुन किंवा सुरुच्या वनातून उत्तरेकडे चालत गेल्यावर आपण केळवे किल्ल्यावर पोहोचतो.

*राहाण्याची सोय* :गडावर राहण्याची सोय नाही, पण केळवे गावात आहे. 
*जेवणाची सोय* :गडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे. 
*पाण्याची सोय* :गडावर पाण्याची सोय नाही. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :केळवे शितलादेवी मंदीरापासून चालत १० मिनीटे लागतात.

*सूचना* :१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.

२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.

जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे. 

ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.

भवानगड, दांडा किल्ला, केळवे पाणकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे. 
          
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--121*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कावनई*

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: इगतपुरी पश्चिम
*जिल्हा* : नाशिक
*श्रेणी* : मध्यम

इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे, पूर्वेकडे असणार्‍या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई ,अलंग, कुलंग,औंढा,पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणार्‍या रांगेत त्रिंगलवाडी,कावनई ,हरीहर,ब्रम्हगिरी,अंजनेरी हे किल्ले येतात.
*पहाण्याची ठिकाणे* :किल्ल्याचा दरवाजा आजही बर्‍यापैकी शाबूत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येईल एवढी जागा आहे. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :कावनई मार्गे :- 
कावनईला जायचे असल्यास इगतपुरीला किंवा घोटीला यावे. येथून कावनई गावाकडे जाणारी बस पकडावी. कावनई गाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. इगतपुरीहून अप्पर वैतरणाला जाणारी बस पकडून वाकी फाट्यावर उतरावे. वैतरणाकडे जाणारा रस्ता सोडून उजवकडची वाट पकडावी. या फाटयापासून १ तासाच्या चाली नंतर आपण कावनई गावात पोहचतो. गावात कपिलाधारातीर्थ नावाचा आश्रम आहे. गावात शिरल्यावर उजव्या हातालाच किल्ला दिसतो. किल्ल्याची एक सोंड गावात उतरलेली आहे, या सोंडेवरून चढत जायचे. अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाट उजवीकडे वळते आणि चिमणीपाशी येऊन थांबते. पुढची चढाई चिमणीतूनच आहे. येथे सोपे प्रस्तरारोहण करून, आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येऊन पोहचतो. गावापासून इथपर्यंत पोहचण्यास १ तास पुरतो.

*राहाण्याची सोय* :
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे यात ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होते. 
*जेवणाची सोय* :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी 
*पाण्याची सोय* :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात मार्च - एप्रिल पर्यंत पाणी असते. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
कावनई गावातून अर्धा तास लागतो.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--120*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *कात्रा* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: अजंठा सातमाळ
*जिल्हा* : नाशिक
*श्रेणी* : मध्यम

मनमाडहून औरंगाबादला रेल्वेने किंवा रस्त्याने जाताना; मनमाड सोडल्यावर लगेच आभाळात घुसलेला सुंदर सुळका आपले लक्ष वेधून घेतो ‘‘हडबीची शेंडी‘‘ किंवा ‘‘थम्स अप‘‘ या नावाने हा सुळका ओळखला जातो. या सुळक्याजवळच अजिंठा -सातमाळ रांगेतून एका बाजूला पडलेल्या डोंगरावर अपरिचीत असा ‘‘कात्रा‘‘ किल्ला आहे.


अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.

मनमाडहुन एका दिवसात कात्रा आणि मेसणा हे दोन किल्ले पाहाता येतात.त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही.
*पहाण्याची ठिकाणे* :कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी कातरवाडी हे छोट गाव आहे. गावामागील डोंगरात कपिल मुनींचा आश्रम आहे. हा आश्रम कात्रा किल्ल्याच्या बाजुच्या डोंगरात आहे. आश्रमाच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने जाताना वाटेत मारुतीच मंदिर व त्यासमोर वीरगळी पाहायला मिळतात. हे मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. या मंदिरापासुन डावीकडे वळणारा रस्ता कपिलमुनी आश्रमाकडे जातो. पायथ्यापासुन ५ मिनिटे चढल्यावर आपण आश्रमापाशी पोहोचतो. येथे एक प्रशस्त कातळकोरीव गुहा आहे. गुहा आतून वाहेरुन रंगवलेली आहे. गुहेला बाहेरुन दिलेला केशरी रंग दुरुनही उठून दिसतो, या गुहेत कपिलमुनींची मुर्ती स्थापन केलेली आहे. गुहे समोरील जागा सारवुन स्वच्छ केलेली आहे. त्यात एक धुनी कायम पेटवलेली असते. गुहेच्या बाजुला एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेतील साधु राजुबाबा १२ वर्ष मौन व्रतात आहे. पण त्याना किल्ल्याची खडानखडा माहिती आहे. 

कपिल मुनींचा आश्रम पाहुन बाजुच्या डोंगराला वळसा घालुन कात्रा किल्ल्याचा डोंगर आणि आपण चढतोय तो डोंगर यांच्या मधील खिंडींच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. गावकर्‍यांचा किल्ल्यावर वावर नसल्याने इथे ठळक अशी पायवाट नाही. सर्व ढोरवाटा आहेत. सर्वत्र घसारा (स्क्री) आहे. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या वाटेने खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण खिंडीत पोहोचतो. इथे एका अनघड दगडाला शेंदुर फासुन ठेवलेला आहे. खिंडीतुन उजवीकडे वळुन कात्रा किल्ल्याच्या कातळभिंती खालुन जाणार्‍या पायवाटेने आपण १० मिनिटात किल्ल्याचा उत्तर टोकाला पोहोचतो. येथे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या अर्ध्या चढल्यावर उजव्या बाजुला कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी कातळाच्या धारेवरुन जावे लागते. जेमतेम पाउल मावेल एवढ्या धारेवरुन गुहेपर्यंत जाउन गुहा पाहुन परत पायर्‍या चढुन वर आल्यावर दोन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती टाकी पाहुन डाव्या बाजूला वळून थोड्या पायर्‍या चढल्यावर गड माथ्यावर आपला प्रवेश होतो. गडमाथ्यावर एक टेकडी आहे. टेकडीच्या रोखाने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला आपल्याला ५ बुजलेली टाकी पाहायला मिळतात. पुढे टेकडी उजव्या हाताला ठेउन दरीच्या बाजुला जावे. तिथे एक खाच आहे. १५ फ़ुटाचा कातळटप्पा काळजीपूर्वक उतरुन गेल्यास एक कातळात कोरलेली लांबलचक गुहा पाहायला मिळते. या गुहेच तोंड झाडीने पूर्ण झाकलेल असल्यामुळे वरुन दिसत नाही. गुहा पाहुन वर येउन ५ टाक्यांपाशी जाऊन टेकडीला वळसा घालावा. आता टेकडी डाव्या हाताल ठेउन चालायला सुरुवात केल्यावर कातळात खोदलेल पाण्याच टाक पाहायला मिळत. त्या टाक्यावरुन सरळ पुढे चालत गेल्यावर कातळाच्या पोटात खोदलेली २ खांबी गुहा पाहायला मिळते. या गुहे समोर एक पाण्याच टाक आहे. गुहेच्या वरच्या बाजुस चढुन गेल्यावर अजुन एक पाण्याच टाक आहे. हे टाक पाहुन परत गुहेच्या पातळीत खाली उतरुन किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे चालत जाव. इथेही झाडोर्‍यात लपलेली गुहा आहे. ती पाहुन किल्ल्याच्या मधे असणार्‍या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. ५ मिनिटांचा खडा चढ चढुन आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. येथे साधुने अलिकडच्या काळात जमिनीत सिमेंट कॉंक्रीटने बांधलेली ध्यान गुंफा आहे. त्याच्या बाजुला ध्वज स्तंभ आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन अंकाई ,टंकाई, गोरखगड, मेसणा हे किल्ले आणि हडबीची शेंडी हा सुळका दिसतो. टेकडीवरुन विरुध्द बाजुला ५ टाक्यांजवळ उतरावे. येथुन समोर दिसणार्‍या सपाट पठारावरुन दक्षिण टोकाकडे चालायला सुरुवात करावी. वाटेत वास्तुंचे चौथरे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाउन परत येताना उजव्या बाजुस (दरीच्या बाजुला) तटबंदी आणि बुरुजाचे अवशेष दिसतात. त्यांच्या बाजुने चालत. पायर्‍यांपर्यंत आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड पूर्ण पाहाण्यास पाउण तास लागतो. गड उतरुन खिंडीत आल्यावर बाजुच्या डोंगरावर चढुन जावे त्याच्यावर शंकराचे एक लहानसे मंदिर आहे. 
*पोहोचण्याच्या वाटा* :१) मनमाड - औरंगाबाद या राज्य महामार्गावर क्र. १० वर मनमाडपासून ८ किमीवर एक रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने २ किमी अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याचे कातरवाडी गाव आहे. कातरवाडी गाव गडाच्या पूर्वेस आहे. गावा मागच्या डोंगरात कपिलमुनींचा अश्रम आहे. आश्रमाच्या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जीप सारख्या वाहानाने जाता येते. 

२) मनमाडहुन एक रस्ता थेट कातरवाडीत येतो. हे अंतर ७ किमी आहे. मनमाडहुन रिक्षाने अथवा खाजगी वाहानाने किल्ल्याच्या पायथ्याच्या कपिलमुनी आश्रमा पर्यंत पोहोचता येते. 
*राहाण्याची सोय* :गडावर रहाण्याची सोय नाही. कातरवाडीतील मारुती मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. कात्रा बरोबरच अंकाई , टंकाई, गोरखगड किल्लाही पाहाणार असल्यास; गोरखगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरा बाहेर राहाण्याची सोय होउ शकेल. कपिलमुनी आश्रमात पाणी नसल्यामुळे राहाण्यासाठी गैरसोईचा आहे.
*जेवणाची सोय* :
जेवणाची सोय स्वत: करावी. 
*पाण्याची सोय* :
गडावर पिण्याचे पाणी नाही.
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :
कातरवाडीतून ४५ मिनीटे लागतात.
*जाण्यासाठी उत्तम कालावधी* :
जुलै ते फेब्रुवारी

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*


☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--119*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

          *केंजळगड* 

*किल्ल्याचा प्रकार* : गिरीदुर्ग
*डोंगररांग*: महाबळेश्वर
*जिल्हा* : सातारा
*श्रेणी* : मध्यम

केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
*इतिहास* :बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला. 
*पहाण्याची ठिकाणे* :कोर्लेमार्गे सुमारे दोन तासांच्या आल्हाददायी निसर्गभ्रमणानंतर आपण केंजळगडाच्या खांद्यावर जाऊन पोहचतो. माचीवर पूर्वेकडच्या अंगाला सपाटीवर पाच, सात खोपटांची वस्ती आहे, तिला ओव्हरी म्हणतात. मागे केंजळचा भला मोठा खडक उभा असतो. या काळ्या पहाडाच्या माथ्यावर मजबूत झाडी व गवताचे रान माजलेले दिसते. येथे मार्गदर्शक नसेल तर झाडीत उगाच भटकत बसावे लागते, म्हणून मार्गदर्शकाच्या सहाय्याने झाडीतून जाणार्‍या वाटेने वर चढू लागले की आपण गडावर पोहचतो. माथ्यालगतच या गडाचे वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येते, ते म्हणजे एवढ्या उंचीवर उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायर्‍या होत. ज्या किल्ल्याच्या पायर्‍या फार श्रम करून अवघड जागी खडकात कोरून काढल्या आहेत, अशा मोजक्या किल्ल्यांमध्ये केंजळगड अग्रभागी आहे. डोंगर शिखरावरील कातळात पूर्ण लांबीच्या ५५ उंचच उंच पायर्‍या आहेत.

रायरेश्वरहून येतांना काळ्या कातळभिंतीपाशी येऊन पोहोचलो की, उजव्या हातास वळसा घालून पंधरा वीस मिनिटांत आपण त्या कातळ पायर्‍यांपाशी येऊन पोहचतो. पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेष आहेत. पायर्‍या संपता संपता येथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते फक्त दिसते. माथा गाठल्यावर तटाजवळ एक प्रशस्त खोदलेले तळे आहे. या तळ्याचे पाणी मोठे मधुर आहे.

गडाचा घेर हा लंबवर्तुळाकार आणि छोटाच आहे. चारही बाजूंनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. गडाच्या एका अंगास वाई प्रांताच्या दिशेस थोडी फार तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरूजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतींचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने ओसाड माळ आहे. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुन्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असले पाहिजे. पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगड्या निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत. केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळ्या नंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली असते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो.
*पोहोचण्याच्या वाटा* :१ कोर्लेमार्गे :- 
भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्‌टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्‍या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.


२ वाईमार्गे :- 
वाईमार्गे गडावर येण्यासाठी एक मार्ग आहे. वाईहून खावली गावी यावे. खावली गावी जेथे एसटी थांबते तेथून थोडे पुढे ५ ते १० मिनिटे चालल्यावर उजवीकडे गडावर जाणारा रस्ता दिसतो. अर्धा गड चढून गेल्यावर थोडी वस्ती लागते. येथपर्यंतचा रस्ता ही एक कच्ची सडक आहे. येथून पुढे पायवाटेने अर्धा - एक तासात आपण गडावर येतो. गडाच्या कातळाजवळ आल्यावर आपण डोंगरसोंडेवरुन येणार्‍या वाटेवर येतो. 
3 रायरेश्वरमार्गे                  रायरेश्वरच्या देवळाकडे पाठ करून उजवीकडील शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोर केंजळगडाचा घेरा, बालेकिल्ला आणि रायरेश्वरला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. आणखी दहा मिनिटे चालल्यावर पठार संपते. तेथून खाली उतरायला एक लोखंडी शिडी आहे. शिडीने खालच्या धारेवर उतरावे, उजवीकडे खाली खावली गाव दिसते. समोर केंजळगडाच्या पाठीमागे असलेल धोम धरणातील पाणी आणि त्याच्याच पलीकडे असलेला कमळगडाचा माथा आपल्याला खुणावत असतो. त्याच वाटेने दीडएक तास चालत राहिले की केंजळगडाच्या उभ्या कातळभिंतीशी येऊन पोहचतो.

*राहाण्याची सोय* :गडावर राहण्याची सोय नाही. तंबू ठोकून राहता येऊ शकते, पण वारा प्रचंड असतो. दुसरी सोय म्हणजे ओव्हरीची वस्ती, जेमतेम पाचसात घरांची ही आदिवासी वस्ती असली तरी तेथील केंजळाई देवळात दहाबारा जणांची रहाण्याची सोय होऊ शकते. 
*जेवणाची सोय* :जेवणाची सोय आपणच करावी. 
*पाण्याची सोय* :गडावरील तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते. कातळ पायर्‍यांच्या खाली थोडे पुढे एक गुहा लागते, या गुहेच्या जरा पुढे पाण्याचे एक छोटे टाके लागते यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :१) रायरेश्वर रस्ता ते केंजळगड ३ तास लागतात.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--118*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯
*भुईकोट किल्ला*


*1जाण्याचा मार्ग :*
मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशनाजवळच अहमदनगर शहर आहे. शहराच्या पूर्व दिशेला प्रस्तुत भुईकोट किल्ला आहे. अहमदनगरहून भिंगारला जाणार्‍या अहमदनगर पालिका परिवहनच्या बसेस किंवा शेअर ऑटोने किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्याला भिंगारचा किल्ला असेही नाव आहे.

*२) माहिती :*
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ. स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ. स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ. स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ. स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ. स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ. स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ. स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.
अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ. स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ. स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ. स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ. स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ. स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.
इ. स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला.
इ. स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.

*३) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :*
गड सैन्यदलाच्या ताब्यात आहे म्हणून तेथे फिरण्याची आणि राहण्याची सोय नाही ( इंटरनेट नुसार ).
          

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--117*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯
*रायगड किल्ला*
                                               *१) जाण्याचा रस्ता :*
मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात.
मुंबई ते रायगड २१० किलोमीटर ( By Road )

*२) माहिती :*
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजानी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे द्शगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले. तक्तास जागा हाच गड करावा’. याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४ शके १५९६ आनंद सवत्सर मागह व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७ इ.स. १६८१  १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. ता २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालुट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३.१२ फेब्रुवारी१६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि.५ एप्रिल१६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.

*३) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :*
पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
    
खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज, बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा ’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
    
नाना दरवाजा : या दरवाजाश ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडाणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठीइ खोबणी दिसतात.
    
मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. येथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
    
महादरवाजा : महादरवाजाच्या बाहेरील अम्गास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तसेच सरंक्षकासाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
    
पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
    
चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते,त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाला आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
    
हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानासाठी आनि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
    
गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्त्सागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
    
स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे. ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
    
पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्याव्र जोदरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्या बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
    
मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ-उताअ असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
    
राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब ३३ फूट रुंद आहे.
    
रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
    
राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांबव १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
    
नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हानगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
    
बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फुट रुंद रस्ता आहे.
    
शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देउळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
    
जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. 
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो , 
‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ 
या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो 
"श्री गणपतये नमः । 
प्रासादो जगदीश्वरम्य जगतामानं ददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।
शाके षण्णवबाणभूमिगणनादान्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥"
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वितिकौ स्तभेःकुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥

महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र ते शुद्ध १५ दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यानी बांधिले असून वरून फरसबंदीच्या खाली पोकळी आहे. तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकरुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे ,बारा टाकी दिसतात.
    
कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशवर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
    
वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरिता गड पाहून एक दोन -तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
    
टकमक टोक : बाजार पेठेच्या समोरिल टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
    
हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड खुबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

*४) खाण्याची सोय :*
गडावर हॉटेल्स आहेत तेथे जेवणाची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

*5) राहण्याची सोय :*
रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगाल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
               *पोष्ट क्रमांक--116*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

           *केळवे किल्ला* 

*किल्ल्याचा प्रकार* : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
*डोंगररांग*: डोंगररांग नाही
*जिल्हा* : ठाणे
*श्रेणी* : सोपी

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या समुद्रकिनाराच्या उत्तरेला सुरुच्या वनात केळवे किल्ला आहे. किल्ल्याचा आकार चांदणी प्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत.
*इतिहास* :केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
*पहाण्याची ठिकाणे* :
किल्ला वाळूत गाढला गेला असल्यामूळे प्रवेशद्वारातून रांगतच आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. त्यातून वाकून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो.
*पोहोचण्याच्या वाटा* केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन उजव्या बाजूची वाट केळवे बीच कडे जाते. या वाटेने बीचवरुन किंवा सुरुच्या वनातून उत्तरेकडे चालत गेल्यावर आपण केळवे किल्ल्यावर पोहोचतो.

*राहाण्याची सोय* :गडावर राहण्याची सोय नाही, पण केळवे गावात आहे. 
*जेवणाची सोय* :गडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे. 
*पाण्याची सोय* :गडावर पाण्याची सोय नाही. 
*जाण्यासाठी लागणारा वेळ* :केळवे शितलादेवी मंदीरापासून चालत १० मिनीटे लागतात.

*सूचना* :१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.
*2) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.

जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे. 

ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.

भवानगड, दांडा किल्ला, केळवे पाणकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.   

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--115*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

              *रतनगड*

*1 जाण्याचा मार्ग :*
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते. मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते. रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही.

*2) माहिती :*
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला. पुराणात असा उल्लेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

*3) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे*
१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
१२ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)

*4) राहण्याची सोय :*
गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.

*5) खाण्याची सोय :*
गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते. गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--114*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

              

*बहादुरगड*


*१) जाण्याचा मार्ग*
दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रेल्वे आणि गाडी रस्त्याने जोडले गेले आहे. दौंडकडून गाडीरस्त्याने देऊळगाव पर्यंत येऊन पेडगाव गाठावे लागते. अलीकडील पेडगाव मधून नावेने पलीकडील पेडगावामधील धर्मवीरगडला जावे लागते.
दुसरा मार्ग म्हणजे अहमदनगरकडून अथवा पुण्यातून श्रीगोंद्याला व तेथून पेडगावला जाता येते, हा मार्ग सोयीचा आहे.

*२) माहिती*
इतिहास - १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. " पांडे पेडगावचा भुईकोट " असे त्याचे त्यावेळचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांचेकडे हा भुईकोट मोकास ( देखभालीसाठी ) होता. त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला. औरंगजेबाचा दुधेभाऊ बहादुरखान कोकालताश हा या किल्ल्याचा त्या वेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहेनशाह समजत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरून काढायला बहादुरखानाने आपण होऊन शिवाजीराजांना संधी दिली. बहादुरखानाने गडामधे एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरवी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा केले होते. महाराजांच्या हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला होता. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर नऊ हजाराचे सैन्य बहादुरगडावर खजिना आणण्यासाठी पाठवले. या सददाराने आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्यामुळे बहादुरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी देत देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकरचाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. बहादुरखान पाठलागावरून परत आला, तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटल्याची बातमी कळाली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली. खजिना घालवून आणि कशीबशी आपली इभ्रत वाचवून या पेडगावच्या शहाण्याला गप्प बसावे लागले होते. 

*३) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे*:
पेडगावचा धर्मवीरगड हा भीमेच्या काठावर आहे. याची दक्षिणेकडील तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या धर्मवीरगडाची किल्ल्याला तीन चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेश मार्ग गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आज उद्‌ध्वस्त झालेल्या आहेत. याची तटबंदीमात्र कशीबशी उभी असून सर्वत्र काटेरी रान माजलेले आहे. नदीच्या बाजूच्या तटबंदीमधे असलेले बांधकाम पहाण्यासारखे आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भीमानदीचा देखावा सुंदर दिसतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी लक्ष्मीनारायण मंदिर बर्‍या अवस्थेमधे आहे. या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मूर्ती सुंदर आहेत.
३६५ एकरावर हा किल्ला पसरला असून किल्ल्यावर आजही अनेक अवशेष पाहता येतात. गडावर प्राचीन इ.स. च्या ५व्या शतकातली चालुक्य शैलीतील मंदिरे, हत्ती मोटा, राजदरबार, वेशी, तटबंदी असे अवशेष आजही भग्न अवस्थेत उभे आहेत.

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*
☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--100*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

              
*गाविलगड*


*१) जाण्याचा मार्ग*:
चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ किमी आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. हे दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते. चिखलदऱ्याकडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.

*2) माहिती*
महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला.

*3) गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे*:
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजूक स्थितीमधे असल्या तरी अजूनही शाबूत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो. मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे. शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--112*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

              
*विसापूर*


*१) जाण्याचा मार्ग*
मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

*२) माहिती*
मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

*३) गडावरील पाहाण्यासारखी ठिकाणे* 
पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.    

  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙
  *श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ*

*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
             
                     *पोष्ट क्रमांक--111*
             ╭════●●●════╮
               *महाराष्ट्रातील किल्ले*
             ╰════●●●════╯

              
*राजगड*


*१) जाण्याचा मार्ग*
गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. १.गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२.पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४.आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५.गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

*2) माहिती*
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराज ने हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
१)'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते शिवाजी भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो,'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.
सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला.
१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवाजीने मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजी महाराजांनी शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणते की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.' मात्र शिवाजी महाराजांनी तोरण्यापाठोपाठ हा डॊंगर जिंकून घेतला, हे नक्की. डॊंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मॊगलांना माघार घ्यावी लागली.
शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.'
शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी शिवाजीचे निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबा संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता. पुढे ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.
२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा असत.

*3) गडावरील पाहाण्यासारखी ठिकाणे*
सुवेळा माची :
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.
पद्मावती तलाव :
गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
राजवाडा :
रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
गुंजवणे दरवाजा :
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजीपूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते. राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
पद्मावती मंदिर :
२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजीने किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूरती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. तियाच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजीने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यां देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.
संजीवनी माची :
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.
सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते.
आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.
काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर :
सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
बालेकिल्ला :
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

*4) राहण्याची सोय*
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.

*५) खाण्याची सोय*
जेवण्याची सोय स्वतः करावी. गडाव‍र पिण्याच्या पाण्याची सोय नाही.           
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *श्री ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
*अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती उदगीर*
https://badgednyaneshwar.blogspot.com/
        *📱9421901611📱*
   ═══════🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

No comments:

Post a Comment