Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 23, 2021

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी*

🛑🛑 *मोठी बातमी..!* 

💫  *दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी*

▪️ एप्रिल – मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

▪️ 40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवणार आहे. यानुसार बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

👉🏻 *'या' आहेत मार्गदर्शक सूचना? :*

▪️ सकाळ सत्रात साडेदहा वाजता तर दुपार सत्रात 3 वाजता लेखी परीक्षा होणार सुरु.

▪️ निर्धारित वेळेच्या 1 ते दीड तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे.

▪️ परीक्षाकेंद्रात प्रवेशापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचे थर्मल स्क्रिनिंग होणार

▪️ यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे

▪️ परीक्षा सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी देणार.

▪️ विशेष परीक्षा ही मूळ परीक्षेचाच भाग असणार, त्यासाठी वेगळे परीक्षा शुल्क नाही.

▪️ विशेष परीक्षेतील 2 विषयांमध्ये सार्वजनिक सुट्टी वगळता खंड ठेवला जाणार नाही.

▪️ परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर, पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

▪️ परीक्षा पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे सक्तीचे असेल.

▪️ विद्यार्थ्यांनी शक्यतो स्वतःचे लेखन साहित्य वापरावे.

👉🏻 दरम्यान, परीक्षेचे सुधारित वेळापत्रक mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
--------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
➖➖➖➖➖➖➖➖
# *संगमेश्वर न्यूज नेटवर्क* 
    _बातमी विश्वासाची_
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर* 
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment