Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, June 16, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात* *तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 15/6 /2021 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळा व्यवस्थापन समिती च्या सर्व सद्स्यांना व पालकांना पुर्व सुचना देऊन आज पासून सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यात करण्यात आली आहे असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व सद्स्यांना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच शाळा पुर्व तयारी, विद्यार्थी प्रवेश नियोजन, आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण, वृक्षारोपण व कोरोना आजारा वर मात करण्यासाठी Mask, sanitizer, social distance, Handwash या बाबी अनिवार्य वापर करण्यात यावे अशी सविस्तर माहिती दिली. तद्नंतर इयत्ता पहिली प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश आपल्या दारी अंतर्गत 100 % प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. प्रवेश पात्र नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. सन 2021 - 2022 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यात आली *



















No comments:

Post a Comment