*selfie with success या उपक्रमां अंतर्गत तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुतन वर्षाच्या निमित्ताने ग्रिटींग कार्ड स्पर्धा आयोजित*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज 1/1/2024 रोजी शालेय परीपाठा नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. नवीन वर्ष सर्वांना सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्यदायी तसेच शालेय अभ्यासात खूप प्रगती व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज आपणास नुतन वर्षाच्या निमित्ताने ग्रिटींग कार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन तुमचा फोटो selfie with success म्हणून काढण्यात येणार आहे असे सविस्तर सांगीतले तद्नंतर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले व अतिशय सुंदर व देखणे नुतन वर्षाचे ग्रिटींग कार्ड काढले. विजेतांचे अभिनंदन करुन selfie with success या उपक्रमांत फोटो काढण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*
No comments:
Post a Comment