Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 18, 2024

शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू|teacher transfer intra district|


शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू|teacher transfer intra district|
 शिक्षक  अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्ती शिक्षकांच्या बदली बाबत ...
सुधारीत अटी लागू करणे बाबत असून सदरील शासन निर्णयात २) जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी.समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना प्राप्त आहेत.उपरोक्त सर्व शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी विस्थापित झालेले तसेच शासन निर्णयातील निकषाच्या अनुषंगाने बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी विहित नमुन्यात आपल्याकडे अर्ज सादर करणे बाबत या कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्रमांक ५ अन्वये कळविण्यात आले होते. संदर्भीय पत्र क्रमांक ६ अन्वये जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. तथापी दिनांक २६/०४/२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत विनंती बदलीची माहिती मागविण्यात आली होती. आपण सादर केलेल्या माहितीच्या आधारे जिल्हांतर्गत बदली बाबत प्राप्त अर्जाची संवर्ग-१ व संवर्ग-२ निहाय तसेच सर्वसाधारण अशी यादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीत खालील बाबीची खात्री करावी.

संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये नमुद १.८ विशेष संवर्ग भाग-१ मध्ये १.८.१ ते १.८.२० या प्रमाणे संवर्ग मधील शिक्षकांच्या नोंदी घेताना यादीमध्ये बाब नमुद करुन त्या बाबत आवश्यक अभिलेख्यावरुन -१ खात्री करावी. तसेच शासन निर्णयात नमुद ४.२.८ मध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करावी. तसेच ४.२.७ मध्ये नमुद नुसार विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदली साठी अर्ज करता येणार नाही या बाबत आपल्या तालुक्यातुन प्राप्त अर्जाबाबत खात्री करावी. तसेच संवर्ग-१ मध्ये बदली पात्र असतांना नकार दिला असल्यास संबधिताने लाभ घेतला आहे असे गृहीत धरुन आवश्यक ती कार्यवाही करावी.संदर्भीय शासन निर्णय २ मध्ये ४.३ मध्ये नमुद नुसार जे शिक्षक विशेष संवर्ग भाग २ मध्ये मोडतात त्यांनी विवरण पत्र क्रमांक ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघाच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या तालुक्यातील भाग २ मध्ये अर्ज सादर करत असलेल्या शिक्षकांकडून स्वयंघोषीत प्रमाणपत्र घेण्यात यावे. तसेच मुद्या क्र ४.३.६ नुसार विशेष संवर्ग २ खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमुद आहे. तीन वर्ष कालावधी पूर्ण होण्याआधी पती किंवा पत्नीने एकत्रीकरणाचा लाभ घेतला असल्यास संबंधितास यावर्षी विनंती बदलीचा लाभ घेता येणार नाही. त्यानुसार प्राप्त अर्जाची खात्री करावी. संवर्ग १, २ इतर, विस्थापीत व न्यायप्रविष्ठ निर्णयातील शिक्षक vec 6 आंतर जिल्हा बदलीने या जिल्हा परिषदेमध्ये हजर झाल्याचा दिनांक हा प्रथम नेमणुक दिनांक गृहीत धरावा.

तसेच आपल्या तालुक्यातुन बदल्यामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या प्राप्त अर्जाची विस्थापीत असल्याबाबतची खात्री करावी व वर्षे नमुद करुन बदलीसाठी विहीत केलेला कालावधी पुर्ण केला किंवा नाही याची खातरजमा करावी.

सदंभीय शासन निर्णय २ मधील १.७ मध्ये नमुद केल्यानुसार सन २०२२ मध्ये घोपीत केलेल्या अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली असेल अशा शिक्षकांना बदल्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यानुसार अशा शिक्षकांची नोंद आपल्या यादीत सेवा कालावधीसह नमुद करावी. कार्यरत शाळेत ५ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक हे विनंती बदलीस पात्र ठरतील. 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबधिताच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत निर्णय घेण्यासाठी संबधित शिक्षकांचे नाव सदरच्या यादीत संवर्गनिहाय सेवाजेष्ठतेनुसार नाव समाविष्ट करण्यात येवून शेरा रकाना मध्ये मा. न्यायालयीन प्रकरण असे नमुद करावे. (सोबत यादी)

आपल्या तालुक्यात बदली साठी प्राप्त झालेल्या बदली विनंती अर्जाचे आपण सादर केलेले प्रपत्र मध्ये नमुद असलेले सर्व बाबी काळजीपुर्वक आवश्यक अभिलेख्या आधारे तपासणी करुन आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरीत यादी सादर करावी. यादी प्रसिध्द केल्यानंतर येणाऱ्या आक्षेप दुरुस्तीसह अदयावत यादी रिक्त पदाच्या अहवालासह दिनांक २०/०५/२०२४ रोजी दुपारी २.०० पर्यत समक्ष सादर करावी. सदरच्या यादीत काही त्रुटी राहिल्यास त्या बाबत आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment