तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे 15 आॅगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन संपन्न*
-------------------------------------
*तिवटग्याळ- तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे दिनांक 15/8/2025 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून आज दिनांक 15 आॅगस्ट 2025 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व मा.सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन करण्यात आले. अतिशय उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने विविध उपक्रम राबविले व आज दिनांक 18 आगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . या वेळी सरपंच प्रशांत पाटील, पोलीस पाटील, उपसरपंच जयसिंग पाटील, धनराज पाटील, ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, आकाश पाटील, सरुबाई कांबळे,तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील, अनिल पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे,अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, राजकुमार श्रीमंगले, मदतनीस वर्षा श्रीमंगले, आॅपरेटर विनोद बिरादार, प्रवीण कांबळे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण नंतर इयत्ता पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थांचे विविध नेतांचे वेशभूषा सह भाषण व देशभक्ती गीते नृत्य, माय मराठी व वल्हवा रे वल्हेवा कविता साभिनय सादरीकरण घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*























































No comments:
Post a Comment