------------★--------------
_जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 21/6/2021 रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील योग शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व पालकांना social distance, sanitizer,, Handwash व mask याचा अनिवार्य वापर करून योगाचे प्रात्यक्षिक व महत्त्व समजावून सांगितले._
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालय नवि दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या योगासने व प्राणायाम यांची सर्व माहिती व कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पालकांना सकाळी योगासने व प्राणायाम घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाचे प्रात्यक्षिक उपस्थित पालकांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी करुन दाखवले यावेळी शाळेतील शिक्षक, गावचे सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, सौ. गीता कच्छवे, श्रीमती भागाबाई बिरादार व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य. गावातील नागरिक उपस्थित होते._
या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले
➖➖➖➖♦➖➖➖
No comments:
Post a Comment