प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 6000 रु - लाभ मिळवण्यासाठी स्वत:च अशाप्रकारे करा नोंदणी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीपासूनच खूप लोकप्रिय आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 6,000 ट्रांसफर करते.
सरकार हे पैसे शेतकऱ्यांना 3 हप्त्यांत सोडते. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
आपणसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असेल आणि या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छित असाल तर आपल्याला ते सहजपणे कळू शकेल.
असे चेक करा या योजनेतील आपले नाव आणि सद्यस्थिती :-
- https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल .
- मेन्यू मध्ये जावून फार्मर कॉर्नर वर जावे. लाभार्थी सूची च्या लिंकवर क्लिक करावी.
- आपले राज्य, जिल्हा उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी.
- यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळेल. ज्या शेतकर्यांना या योजनेचा लाभ सरकारकडून दिला गेला आहे, त्यांचेही नाव राज्य/जिल्हावार/तहसील/गावागप्रमाणे पाहू शकता. यामध्ये सरकारने सर्व लाभार्थ्यांची पुर्ण सूची अपलोड केली आहे.
असे रजिस्टर करा आपले नाव :-
- सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलच्या या लिंकवर भेट द्या.
- येथे 'Farmers Corner' वर जा आणि 'New Farmer Registration' वर क्लिक करा.
- नवीन टॅबमध्ये आधार क्रमांक आणि इमेज कोड घाला आणि ''Click here to continue' ' वर क्लिक करा.
- यानंतर, आपल्यासमोर आलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये, राज्य, जिल्हा, गाव, गट, उपजिल्हा, लिंग, नाव, श्रेणी इत्यादींकडून मागविलेली माहिती प्रविष्ट करा.
- जमिनीबद्दल माहिती देण्यासाठी सर्वेक्षण किंवा खाते क्रमांक, खसरा क्रमांक आणि क्षेत्राचा आकार प्रविष्ट करा
- ते भरल्यानंतर 'सेव्ह' वर क्लिक करा. अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन होईल.
तुमच्या गावात कोणाला मिळतायेत हे पैसे , असे जाणून घ्या :-
- प्रथम आपण https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवर जा.
- येथे पेमेंट सक्सेस टॅबखाली भारताचा नकाशा येईल.
- त्या खाली डॅशबोर्ड लिहिले जाईल, त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यास आपणास एक नवीन पृष्ठ मिळेल.
- त्यात प्रथम राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तहसील आणि त्यानंतर आपले गाव.
- हे व्हिलेज डॅशबोर्डचे पृष्ठ आहे, येथे आपण आपल्या गावाची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
- व्हिलेज डॅशबोर्डच्या खाली चार बटणे असतील, किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास डेटा रिसीव्हड वर क्लिक करा.
येथून मिळवा मदत किंवा माहिती :-
- पीएम किसान हेल्पलाइन
- 155261
पीएम किसान टोल फ्री
- 1800115526
पीएम किसान लँडलाइन नंबर:
011-23381092, 23382401
मेल आईडी
- pmkisan-ict@gov.in
----------------------------------------------------------
*श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे उदगीर*
----------------------------------------------------------
No comments:
Post a Comment