Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, October 28, 2021

जिल्हा परिषद लातूर दिपावली सुट्टी नवीन आदेश दि. 28/10/2021 ते 10/11/2021 पर्यंत 14 दिवस सुट्टी दि. 11/11/2021 पासून पुर्ववत शाळा सुरू



महाराष्ट्र शिक्षक पॅनल सहविचार मंथन बैठक भद्रा हनुमान खुलताबाद औरंगाबाद येथील प्रसारित करण्यात आलेली बातमी







दिपावली सुट्टी शासन निर्णय सन 2021 - 2022



दिपावली सुट्टी शासन निर्णय सन 2021 - 2022



Wednesday, October 27, 2021

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना

 
१२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना.

१. १२ नोव्हेंबर २०११ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) घेण्यात येणार आहे.
२. सदर सर्वेक्षण इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.
३. यासाठी इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाते.
४. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल. निवड केलेल्या शाळांची यादी केंदाकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल.
५. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.
६. इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते.
७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु राहतील.
८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल.
९. निवडलेल्या शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, हॅन्ड सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राहील, अशी बाकांची व्यवस्था करावी.
१०. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.
११. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling – chit draw Method) निवडली जाईल.

हे वाचले का ? -  स्टुडंट पोर्टल च्या महत्त्वाच्या TAB ची संपूर्ण माहिती

१२. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.
१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.
१४. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक , क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करावे.
१५. दिवाळी सुट्टी पूर्वी पालक सभा घेण्यात यावी. जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः ३ दिवस अगोदर कळविण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेला पाठवावे अश्या सूचना पालक सभेत देण्यात याव्यात. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना /शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८:३० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः १:३० वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी येताना जेवून करून येण्यास सांगावे.

१६. दिनांक १० ते ११ नोव्हेंबर २०२१ यापैकी एक दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.
१७. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी भरून घेतील, तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.
१८. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे

हे वाचले का ? -  शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटया

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका

१९. विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत.
२०.वर्गव विषय-संबंधित वर्गाना पुढे दिलेले विषय शिकविणारे सर्व शिक्षक सर्वेक्षणादरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे.
२१. सध्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी तयार ठेवावी.
सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.

१. विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)

२. इयत्तानिहाय पट (मुले मुली)

३. शाळा UDISE कोड

४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी

५. कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी

६.शाळा माध्यम:सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :

७.शाळा व्यवस्थापन प्रकार

८.ग्रामीण/शहरी

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी- २०२१


Tuesday, October 26, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप करण्यात आले या विषयी प्रसारित करण्यात आलेली शैक्षणिक बातमी

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप  





*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप* *तिवटग्याळ .......‌आज दिनांक 24/10/2021 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका  देण्यात आले तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास स्वाध्याय हे 22 दिवसासाठी आहे. तो नियमित सोडवण्यासाडी दिपावली सुट्टी अभ्यास उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे सांगितले व 15 नोव्हेंबर 2021 पर्यत  नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 24/10/2021 पासून नियमित आँनलाईन पध्दतीने दैनंदिन अभ्यासमाला दिले जातात असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, राजकुमार श्रीमंगले, श्रीमती वर्षा श्रीमंगले व श्री रमेश वाघमारे आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले






*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका वाटप*


*तिवटग्याळ .......‌आज दिनांक 24/10/2021 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  वर्गातील सर्व  विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास पुस्तिका  देण्यात आले तसेच  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले शाळेतील  सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी अभ्यास स्वाध्याय हे 22 दिवसासाठी आहे. तो नियमित सोडवण्यासाडी दिपावली सुट्टी अभ्यास उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की बरोबर व अचूक उत्तर सोडणारे इयत्ता निहाय विद्यार्थाना प्रथम, द्वितिय व तृतीय बक्षिस दिले जाणार आहे असे सांगितले व 15 नोव्हेंबर 2021 पर्यत  नियमितपणे अभ्यास करावा असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 24/10/2021 पासून नियमित आँनलाईन पध्दतीने दैनंदिन अभ्यासमाला दिले जातात असे सांगितले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, राजकुमार श्रीमंगले, श्रीमती वर्षा श्रीमंगले व श्री रमेश वाघमारे आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले*

Monday, October 25, 2021

प्रसिद्ध व्यक्ती व टोपण नावे

*प्रसिद्ध व्यक्ती व टोपण नावे👇👇*

रविंद्रनाथ टागोर  -  गुरुदेव 

जयप्रकाश नारायण  –  लोकनायक 

भिमराव रामजी आंबेडकर  –  बाबासाहेब 

अन्नाभाऊ साठे  – साहित्यरत्न,शाहीर 

सी. एफ. अँडयुज     –     दीनबंधू 

फिरोजशहा मेहता –  मुंबईचा सिंह 

शेख मुजिबूर रहमान     –     वंगबंधू 

चित्तरंजन दास     –     देशबंधू 

पंडित जवहरलाल नेहरू –  चाचा 

वल्लभभाई पटेल –  पोलादी पुरुष 

इंदिरा गांधी     –     प्रियदर्शनी 

विठ्ठल रामजी शिंदे     –     महर्षी 

पी. टी. उषा     –     सुवर्णकन्या 

ज्योतीराव गोविंदराव फुले –  महात्मा 

सुभाषचंद्र बोस     –     नेताजी 

टिपू सुलतान     –     म्हैसूरचा वाघ 
 
विनायक नरहरी भावे  – आचार्य विनोबा भावे 

नरेंद्र दत्त     –     स्वामी विवेकानंद 

मुकुंदराव पाटील  –  दीनमित्रकार 

डेबूजी झिंगराजी जानोरकर  –  गाडगेबाबा 

सरोजिनी नायडू – भारताची कोकीळा

खान अब्दुल गफार खान  – सरहद्द गांधी 

मुरलीधर देविदास आमटे   –  बाबा आमटे 

पांडुरंग महादेव बापट  – सेनापती बापट 

रविंद्रनाथ टागोर  –  गुरुदेव,विश्वकवी 

लाला लजपतराय  –  पंजाबचा सिंह 

महात्मा गांधी – राष्ट्रपिता,महात्मा,बापू 

विनोबा भावे  –  आचार्य 

जे. बी. कृपलानी  –  आचार्य 

लता मंगेशकर  – गाण कोकीळा

बाळ गंगाधर टिळक  –  लोकमान्य 

पं. मदनमोहन मालवीय  –  महामानव 

नाना पाटील  - क्रांतीसिंह  

डॉ. राजेंद्र प्रसाद   –     बापू 

परमहंस गदाधर चट्टोपाध्याय  – रामकृष्ण 

मूळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती

डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम  –  मिसाईल मॅन 

भाऊराव पाटील –  कर्मवीर 

नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व 

पं. मदनमोहन मालवीय – शांतीदूत 

महाराणा रणजित सिंह – पंजाबचा सिंह 

दादाभाई नौरोजी – पितामह 

सम्राट समुद्रगुप्त  –भारताचा नेपोलियन 

भगतसिंग   –  शहीद-ए-आजम 

बॅ. मोहम्मद अली जीना  – कैद-ए-आजम 

अरविन्द घोष   –     योगी 

नाना पाटील     –     क्रांतीसिंह   

सी.राजगोपालाचारी – आधुनिक चाणक्य

गोपाळ हरी देशमुख  –  लोकहितवादी 
 
राममोहन रॉय     –     राजा  

प्रसिद्ध व्यक्ती व टोपण नावे

*प्रसिद्ध व्यक्ती व टोपण नावे👇👇*

रविंद्रनाथ टागोर  -  गुरुदेव 

जयप्रकाश नारायण  –  लोकनायक 

भिमराव रामजी आंबेडकर  –  बाबासाहेब 

अन्नाभाऊ साठे  – साहित्यरत्न,शाहीर 

सी. एफ. अँडयुज     –     दीनबंधू 

फिरोजशहा मेहता –  मुंबईचा सिंह 

शेख मुजिबूर रहमान     –     वंगबंधू 

चित्तरंजन दास     –     देशबंधू 

पंडित जवहरलाल नेहरू –  चाचा 

वल्लभभाई पटेल –  पोलादी पुरुष 

इंदिरा गांधी     –     प्रियदर्शनी 

विठ्ठल रामजी शिंदे     –     महर्षी 

पी. टी. उषा     –     सुवर्णकन्या 

ज्योतीराव गोविंदराव फुले –  महात्मा 

सुभाषचंद्र बोस     –     नेताजी 

टिपू सुलतान     –     म्हैसूरचा वाघ 
 
विनायक नरहरी भावे  – आचार्य विनोबा भावे 

नरेंद्र दत्त     –     स्वामी विवेकानंद 

मुकुंदराव पाटील  –  दीनमित्रकार 

डेबूजी झिंगराजी जानोरकर  –  गाडगेबाबा 

सरोजिनी नायडू – भारताची कोकीळा

खान अब्दुल गफार खान  – सरहद्द गांधी 

मुरलीधर देविदास आमटे   –  बाबा आमटे 

पांडुरंग महादेव बापट  – सेनापती बापट 

रविंद्रनाथ टागोर  –  गुरुदेव,विश्वकवी 

लाला लजपतराय  –  पंजाबचा सिंह 

महात्मा गांधी – राष्ट्रपिता,महात्मा,बापू 

विनोबा भावे  –  आचार्य 

जे. बी. कृपलानी  –  आचार्य 

लता मंगेशकर  – गाण कोकीळा

बाळ गंगाधर टिळक  –  लोकमान्य 

पं. मदनमोहन मालवीय  –  महामानव 

नाना पाटील  - क्रांतीसिंह  

डॉ. राजेंद्र प्रसाद   –     बापू 

परमहंस गदाधर चट्टोपाध्याय  – रामकृष्ण 

मूळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती

डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम  –  मिसाईल मॅन 

भाऊराव पाटील –  कर्मवीर 

नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व 

पं. मदनमोहन मालवीय – शांतीदूत 

महाराणा रणजित सिंह – पंजाबचा सिंह 

दादाभाई नौरोजी – पितामह 

सम्राट समुद्रगुप्त  –भारताचा नेपोलियन 

भगतसिंग   –  शहीद-ए-आजम 

बॅ. मोहम्मद अली जीना  – कैद-ए-आजम 

अरविन्द घोष   –     योगी 

नाना पाटील     –     क्रांतीसिंह   

सी.राजगोपालाचारी – आधुनिक चाणक्य

गोपाळ हरी देशमुख  –  लोकहितवादी 
 
राममोहन रॉय     –     राजा  

Sunday, October 24, 2021

दिवाळी सुट्टी अभ्यास पुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी लिंक

*_▶️ इयत्ता 1ली दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.2री दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.3लीरी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.4थी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.5वी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.6वी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.7वी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*
*_▶️ इ.8वी दिवाळी अभ्यास डाऊनलोड करा_*

*🔰डाऊनलोड साठी येथे क्लिक करा*👇
http://bit.ly/3E2tJQ6
___________________________________
*🔰शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट गुगल सर्च करा.➡️ www.zppstech.com*

*इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये पाठवा* ➡️➡️🙏🙏

25% कमी केलेला अभ्यासक्रम 1ली ते 12 वी

🗒️ *25% कमी केलेला अभ्यासक्रम 1ली ते 12 वी*

( *शैक्षणिक परिपूर्ण माहितीसाठी तथा शालेय अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन टेस्टस साठी google ला mission scholar .in सर्च करा* )

➡️ *25% कमी केलेला अभ्यासक्रम परिपत्रक 👇🏼👇 वाचा*
*https://www.missionscholar.in/2021/08/25-25-reduced-syllabus-circular-2021-22_17.html*

🗒️ *5 वी ते 8 वी विषय निहाय 👇👇*

5️⃣ *5 वी*
*https://www.missionscholar.in/2021/08/2021-22-5-reduced-course2021-22-5th_38.html*

6️⃣ *6 वी*
*https://www.missionscholar.in/2021/08/2021-22-6-reduced-course2021-22-6th-std_69.html*

7️⃣ *7 वी* *https://www.missionscholar.in/2021/08/2021-22-7-reduced-course2021-22-7th-std_59.html*

8️⃣ *8 वी*
*https://www.missionscholar.in/2021/08/2021-22-8-reduced-course2021-22-8th-std_91.html*

9️⃣/🔟 *9 वी व 10 वी कमी केलेला अभ्यासक्रम 👇🏼*
*https://www.missionscholar.in/2021/08/9-10-9th10th-reduced-syllabus-2021-22.html*

1️⃣1️⃣/1️⃣2️⃣ *11 वी वी 12 वी कमी केलेला अभ्यासक्रम 👇🏼👇🏼*
*https://www.missionscholar.in/2021/08/11-12-11th12th-reduced-syllabus-2021-22.html*

🔮 *1 ली ते 8 वी कमी केलेला अभ्यासक्रम 👇*
*https://www.missionscholar.in/2021/08/1-8-1st-to-8th-reduced-syllabus-2021-22.html*

*➡️FORWARD TO YOUR ALL EDUCATIONAL GROUPS➡️*

महागाई भत्ता फरक 28% काढा एका क्लिक मध्ये..

*महागाई भत्ता फरक 28% काढा एका क्लिक मध्ये...*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
🌈 *28% प्रमाणे एकूण पगार बघा.*
*https://www.rajangarud.com/2021/10/blog-post_8.html?m=1*
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
🪀

लेखक कवी व त्यांची टोपण नावे.

 लेखक कवी व त्यांची टोपण नावे.


1.    नारायण सूर्याजी ठोसर  - संत रामदास 

2.    कृष्णाजी केशव दामले – केशवसुत 

3.    त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी 

4.    नारायण मुरलीधर गुप्ते –  बी 

5.    राम गणेश गडकरी  –  गोविंदाग्रज 

6.    प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार 

7.    विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज 

8.    आत्माराम रावजी देशपांडे – अनिल 

9.    गणपती वासुदेव बेहेरे – अनिल विश्वास 

10. माणिक सीताराम गोडघाटे  –  ग्रेस 

11. केशव आत्माराम कुलकर्णी  –  केशवस्वामी 

12. रमाबाई विपिन मेघावी  - पंडिता रमाबाई 

13. माधव पंढरीनाथ शिखरे – संजय 

14. शांताराम विठ्ठल मांजरेकर – शांताराम 

15. संभाजी कदम   –  विरुपाक्ष 

16. कृष्णाजी पांडुरंग लिमये  –  राधारमन 

17. यशवंत दिनकर पेंढारकर  –  यशवंत 

18. दत्तात्रय कोंडो घाटे  –  दत्त 

19. गोपाल हरी देशमुख  –  लोकहितवादी

20. शंकर काशिनाथ गर्गे  –  दिवाकर

21. सौदागार नागनाथ गोरे – छोटा गंधर्व

22. रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित

23. यशवंत दिनकर पेंढारकर   –  महाराष्ट्र कवी 

24. ना. ची. केळकर –  साहित्यसम्राट 

25. काशिनाथ हरी मोदक – माधवानुज 
    
➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
➖➖➖➖➖➖➖➖

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दसरा विजयादशमी निमित्ताने सोने लुटणे कार्यक्रम संपन्न*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दसरा विजयादशमी निमित्ताने सोने लुटणे कार्यक्रम संपन्न*


















 तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 16/10/2021 रोजी शालेय परीपाठा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी दसरा सणा विषयी सविस्तर माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले व उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सोने म्हणजे आपट्याची पाने देऊन  दसरा सणा विषयी सविस्तर माहिती दिली. महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. स्वतः समवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा, तमोगुण आणी वाईट शक्ती यांचा नाश होणे आणि परस्परांप्रती प्रीती जागृत होणे साधारण पणे त्रेतायुगापासुन साजरा केला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण असून या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात. विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणी वधही. पण याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे .याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते. दसरा सणाला शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्या बाबत वेगळे वेगळे महत्त्व आहे प्राचीन काळापासून क्षत्रीय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धा मध्ये विजय निश्चित मिळतो.
क्षत्रीय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. दसरा ला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. आपट्यांची पाने
या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने  परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .
याच दिवशी भगवान श्री रामा ने रावणाचा वध केला होता व तेंव्हा पासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण आहे.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, आरोग्य सहाय्यक परमेश्वर खटके,आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती येलमटे एस. पी.,श्रीमती शिंदे सिस्टर , अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी  मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, आदी जण यांनी  उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे आज 'जागतिक हात धुवा दिन' साजरा

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे आज 'जागतिक हात धुवा दिन' साजरा* 










तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज 14 /10/2021 रोजी जागतिक हातधुवा दिन असल्याने शालेय परिपाठा नंतर आज जागतिक हातधुवा दिन आहे असे सांगितले व हात धुण्यासाठी सहा पायर्‍या वापर करावा असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हात कसे धुवावेत कृती करुन दाखवले व सर्व विद्यार्थ्यांनी सहा पायर्‍या सह हात धूवून जागतिक हातधुवा दिन साजरा केला. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी जागतिक हातधुवा दिन विषयावर सविस्तर विद्यार्थ्यांना माहिती दिली. हातांची स्वच्छता राखल्यास अनेक प्रकारचे आजार दूर ठेवणे शक्य होते. त्यासंदर्भात लोकजागृती व्हावी, यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. करोना साथीच्या या काळात साबण आणि पाण्याने हात धुण्याचे महत्त्व लक्षात आले आहे. या दिनानिमित्त काही महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया 
 अभ्यास होत आहे. युनिसेफच्या एका अभ्यास अहवालातील निष्कर्ष असे सांगतात, की केवळ स्वच्छता संदर्भात अनुकूल वर्तनाच्या माध्यमातून जवळपास ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. केवळ महत्त्वाच्या वेळी हात स्वच्छ धुण्यामुळे डायरियासारख्या रोगाचे प्रमाण ३० ते ४८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते आणि श्वसनसंस्था संबंधी २० टक्के आजारांवर नियंत्रण आणता येते. कॉलरा, इबोला, सार्स अशा रोगांचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते.

शौचालयाचा नियमित वापर, सर्व महत्त्वाच्या वेळी साबण आणि पाण्याने हात धुणे, पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर अशा स्वच्छता सवयींचा समाजाने स्वीकार केला, की सामान्य आजारांचे जवळपास अर्ध्याहून अधिक ओझे हलके होते. म्हणजेच माणसांचे कामाचे दिवस वाढतात, आजारामुळे उत्पन्न बुडण्याचे प्रमाण घटते, शिक्षणात सातत्य राहते, वैद्यकीय सेवांवरचा ताण कमी होऊन त्या अधिक कार्यक्षम होतात, मानसिक स्वास्थ्य सुधारते. परिणामी, समाज विकासाच्या वाटेवर दोन पावले अधिक टाकायला सिद्ध होतो. अर्थात, हे सगळे जुळून यायला गरज असते ती समाजाच्या सर्व स्तरात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनाची.

समाजात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तन वाढावे, सामाजिक मूल्याचा स्वच्छता ही अविभाज्य भाग व्हावी आणि स्वच्छता हा प्रत्येकाचा स्वभावधर्म व्हावा म्हणून अनेक जण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. प्रभावी संवाद माध्यमातून सामुदायिक इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी हे प्रयत्न असतात. अनेकदा विषय ऐरणीवर यावा म्हणून विशेष दिन आयोजित केले जातात. आज साजरा होणारा 'जागतिक हात धुवा दिन' याच भूमिकेतून गेल्या बारा वर्षांपासून साजरा केला जात आहे. हा दिन साजरा करण्यामागे प्रेरणा आहे, आरोग्य संवर्धनातील स्वच्छ हातांची भूमिका अधोरेखित करण्याची. ज्या ज्या कामात म्हणून हातावर विषाणू, जीवाणू आणि घाण स्थिरावण्याची शक्यता असते, असे प्रत्येक काम केल्यावर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले, की अनेक जीवघेण्या संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते. अगदी करोनासारख्या संसर्गाची शक्यता आपण हात नेहमी स्वच्छ ठेवून ३६ टक्क्याने कमी करू शकतो, असे संशोधनदेखील समोर आले आहे. हा स्वच्छता विचार समाजाच्या परिचयाचा करून देणे, समाजमनात रुजवणे आणि वर्तनात आणण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे, हाच या 'जागतिक हात धुवा दिना'चा मूळ उद्देश.

या पार्श्वभूमीवर, भारतात अलीकडच्या काही दशकांपासून स्वच्छताविषयक सार्वत्रिक चर्चा होत आहे, देशव्यापी कार्यक्रम राबविले जात आहेत. पर्याप्त नसल्या, तरी भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. वर्तन बदलासाठी प्रयत्नही होत आहेत. तथापि, भारताला या संदर्भात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यातही स्वच्छता विषयक अनुकूल सामाजिक वर्तनाचा प्रश्न अजूनही काळजी करावी असाच आहे. सुविधा उपलब्ध असणे एकीकडे आणि प्रत्यक्ष अनुकूल वर्तन दुसरीकडे. स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनासंबंधी ही बाजू आजही म्हणावी तितकी सशक्त नाही, हा खरा चिंतेचा विषय आहे. विविध अभ्यासातून समाजाची ही उणी बाजू वारंवार समोर आलेली आहे.

भारतातील हात स्वच्छ धुण्याच्या संदर्भात 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४'च्या निष्कर्षानुसार देशात केवळ ६० टक्के कुटुंबांकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पर्याप्त पाणी आणि साबण उपलब्ध आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण केवळ ४९ टक्के इतके आहे. संसर्ग टाळण्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे २०१८' नुसार, भारतात जेवणापूर्वी हात धुणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के असून, हे प्रमाण शहरी भागात ५६ टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्के इतकेच आहे. हातांच्या स्वच्छतेसंदर्भात, शौचाहून आल्यावर हात न धुणे अत्यंत घातक ठरते. या संदर्भात 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे'च्या याच अभ्यासात असे समोर आले आहे, की भारतातील २६ टक्के लोक अजूनही शौचाहून आल्यावर हात धुवत नाहीत. शौचाहून आल्यावर हात न धुणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील ३३ टक्के लोकांचा सहभाग आहे. 'नॅशनल अॅनिवल रुरल सॅनीटरी सर्व्हे २०१८-१९'च्या अहवालानुसार देशातील केवळ ४० टक्के शाळा आणि ४२ टक्के अंगणवाड्यांमधून हात धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध आहे. या दोन्ही ठिकाणी येणारी मुले माध्यान्ह भोजन घेतात, हे या संदर्भात लक्षात घ्यावे लागेल.

एकूणच स्वच्छता, त्यातही हातांची स्वच्छता अपेक्षित स्तरावर येण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. र नियमित वापर होण्यासाठी तशी मानसिकता विकसित करणे, हे या संदर्भातील मोठे आव्हान आहे. एकट्या शासन व्यवस्थेचे हे काम असू शकत नाही. स्वच्छतेला सामाजिक मूल्याचे परिमाण द्यायचे, तर त्यासाठी समाजाच्या व्यापक सहभागाची गरज असणार आहे. अनेक व्यवस्था आणि माणसे पुढे येण्याची गरज आहे.

यंदाच्या 'जागतिक हात धुवा दिना'च्या निमित्ताने, स्वास्थ्य निर्देशांकाला उसळी घेण्याची संधी देण्यासाठी, देशातील एकशे पस्तीस कोटी लोक आपल्या दोनशे सत्तर कोटी स्वच्छ हातांचे सामर्थ्य सोबत घेऊन पुढे येतील, ही अपेक्षा. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday, October 14, 2021

स्वच्छ हात, स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेऊ वातावरण करू आपण आरोग्याचे नंदनवन.

*स्वच्छ हात, स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेऊ वातावरण करू आपण आरोग्याचे नंदनवन.*




आज 'जागतिक हात धुवा दिन' आहे. हातांची स्वच्छता राखल्यास अनेक प्रकारचे आजार दूर ठेवणे शक्य होते. त्यासंदर्भात लोकजागृती व्हावी, यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. करोना साथीच्या या काळात साबण आणि पाण्याने हात धुण्याचे महत्त्व लक्षात आले आहे. या दिनानिमित्त काही महत्त्वाच्या बाबी समजून घेऊया 
 अभ्यास होत आहे. युनिसेफच्या एका अभ्यास अहवालातील निष्कर्ष असे सांगतात, की केवळ स्वच्छता संदर्भात अनुकूल वर्तनाच्या माध्यमातून जवळपास ५४ टक्के सामान्य आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. केवळ महत्त्वाच्या वेळी हात स्वच्छ धुण्यामुळे डायरियासारख्या रोगाचे प्रमाण ३० ते ४८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते आणि श्वसनसंस्था संबंधी २० टक्के आजारांवर नियंत्रण आणता येते. कॉलरा, इबोला, सार्स अशा रोगांचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते.

शौचालयाचा नियमित वापर, सर्व महत्त्वाच्या वेळी साबण आणि पाण्याने हात धुणे, पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर अशा स्वच्छता सवयींचा समाजाने स्वीकार केला, की सामान्य आजारांचे जवळपास अर्ध्याहून अधिक ओझे हलके होते. म्हणजेच माणसांचे कामाचे दिवस वाढतात, आजारामुळे उत्पन्न बुडण्याचे प्रमाण घटते, शिक्षणात सातत्य राहते, वैद्यकीय सेवांवरचा ताण कमी होऊन त्या अधिक कार्यक्षम होतात, मानसिक स्वास्थ्य सुधारते. परिणामी, समाज विकासाच्या वाटेवर दोन पावले अधिक टाकायला सिद्ध होतो. अर्थात, हे सगळे जुळून यायला गरज असते ती समाजाच्या सर्व स्तरात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनाची.

समाजात स्वच्छता विषयक अनुकूल वर्तन वाढावे, सामाजिक मूल्याचा स्वच्छता ही अविभाज्य भाग व्हावी आणि स्वच्छता हा प्रत्येकाचा स्वभावधर्म व्हावा म्हणून अनेक जण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. प्रभावी संवाद माध्यमातून सामुदायिक इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी हे प्रयत्न असतात. अनेकदा विषय ऐरणीवर यावा म्हणून विशेष दिन आयोजित केले जातात. आज साजरा होणारा 'जागतिक हात धुवा दिन' याच भूमिकेतून गेल्या बारा वर्षांपासून साजरा केला जात आहे. हा दिन साजरा करण्यामागे प्रेरणा आहे, आरोग्य संवर्धनातील स्वच्छ हातांची भूमिका अधोरेखित करण्याची. ज्या ज्या कामात म्हणून हातावर विषाणू, जीवाणू आणि घाण स्थिरावण्याची शक्यता असते, असे प्रत्येक काम केल्यावर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले, की अनेक जीवघेण्या संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते. अगदी करोनासारख्या संसर्गाची शक्यता आपण हात नेहमी स्वच्छ ठेवून ३६ टक्क्याने कमी करू शकतो, असे संशोधनदेखील समोर आले आहे. हा स्वच्छता विचार समाजाच्या परिचयाचा करून देणे, समाजमनात रुजवणे आणि वर्तनात आणण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे, हाच या 'जागतिक हात धुवा दिना'चा मूळ उद्देश.

या पार्श्वभूमीवर, भारतात अलीकडच्या काही दशकांपासून स्वच्छताविषयक सार्वत्रिक चर्चा होत आहे, देशव्यापी कार्यक्रम राबविले जात आहेत. पर्याप्त नसल्या, तरी भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. वर्तन बदलासाठी प्रयत्नही होत आहेत. तथापि, भारताला या संदर्भात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यातही स्वच्छता विषयक अनुकूल सामाजिक वर्तनाचा प्रश्न अजूनही काळजी करावी असाच आहे. सुविधा उपलब्ध असणे एकीकडे आणि प्रत्यक्ष अनुकूल वर्तन दुसरीकडे. स्वच्छता विषयक अनुकूल वर्तनासंबंधी ही बाजू आजही म्हणावी तितकी सशक्त नाही, हा खरा चिंतेचा विषय आहे. विविध अभ्यासातून समाजाची ही उणी बाजू वारंवार समोर आलेली आहे.

भारतातील हात स्वच्छ धुण्याच्या संदर्भात 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४'च्या निष्कर्षानुसार देशात केवळ ६० टक्के कुटुंबांकडे हात स्वच्छ धुण्यासाठी पर्याप्त पाणी आणि साबण उपलब्ध आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण केवळ ४९ टक्के इतके आहे. संसर्ग टाळण्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे २०१८' नुसार, भारतात जेवणापूर्वी हात धुणाऱ्यांचे प्रमाण ३६ टक्के असून, हे प्रमाण शहरी भागात ५६ टक्के आणि ग्रामीण भागात २५ टक्के इतकेच आहे. हातांच्या स्वच्छतेसंदर्भात, शौचाहून आल्यावर हात न धुणे अत्यंत घातक ठरते. या संदर्भात 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे'च्या याच अभ्यासात असे समोर आले आहे, की भारतातील २६ टक्के लोक अजूनही शौचाहून आल्यावर हात धुवत नाहीत. शौचाहून आल्यावर हात न धुणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील ३३ टक्के लोकांचा सहभाग आहे. 'नॅशनल अॅनिवल रुरल सॅनीटरी सर्व्हे २०१८-१९'च्या अहवालानुसार देशातील केवळ ४० टक्के शाळा आणि ४२ टक्के अंगणवाड्यांमधून हात धुण्यासाठी साबण आणि पाणी उपलब्ध आहे. या दोन्ही ठिकाणी येणारी मुले माध्यान्ह भोजन घेतात, हे या संदर्भात लक्षात घ्यावे लागेल.

एकूणच स्वच्छता, त्यातही हातांची स्वच्छता अपेक्षित स्तरावर येण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. र नियमित वापर होण्यासाठी तशी मानसिकता विकसित करणे, हे या संदर्भातील मोठे आव्हान आहे. एकट्या शासन व्यवस्थेचे हे काम असू शकत नाही. स्वच्छतेला सामाजिक मूल्याचे परिमाण द्यायचे, तर त्यासाठी समाजाच्या व्यापक सहभागाची गरज असणार आहे. अनेक व्यवस्था आणि माणसे पुढे येण्याची गरज आहे.

यंदाच्या 'जागतिक हात धुवा दिना'च्या निमित्ताने, स्वास्थ्य निर्देशांकाला उसळी घेण्याची संधी देण्यासाठी, देशातील एकशे पस्तीस कोटी लोक आपल्या दोनशे सत्तर कोटी स्वच्छ हातांचे सामर्थ्य सोबत घेऊन पुढे येतील, ही अपेक्षा.

Tuesday, October 12, 2021

राज्य कर्मचारी/शिक्षक यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.

*राज्य कर्मचारी/शिक्षक यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.*

राज्य शासकीय कर्मच्यार्‍यांचा महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात आला. | DA INCREASED FROM 17 % TO 28 %


दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा.


सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२० दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% इतकाच राहील.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी.
दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.


त्याचप्रमाणे मागील 5 महीन्यांची म्हणजेच 1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019  या कालावधीतील 5 टक्के ची थकबाकी अदा करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे.
👇👇👇👇👇
५ महिन्यांच्या कालावधीतील ५% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम देखील मिळणार
ऑक्टोबर 2021 च्या पगारात घरभाडे भत्ता देखील वाढीव दराने मिळणार ?

1) *माहे- ऑक्टोबर 2021पासून महागाई भत्ता(DA) 17% वरुन  28% करणे..* 
(वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-2019/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021(शासन निर्णय संकेतांक 202110071550585405)


2) *1जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर2019 या 5 महिन्यांचा 5% महागाई भत्ता वाढी चा फरक माहे ऑक्टोबर च्या वेतना सोबत रोखीने अदा करणे..*
(संदर्भ- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-1319/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021 (शासन निर्णय संकेतांक 202110071602270505 )

*3)घरभाड़े भत्ता दरात वाढ करणे* 
●  8 % वरुन 9 % (ग्रामीण भाग/ Z कैटेगरी)
● 16 % वरुन 18% (Y कैटेगरी शहरी क्षेत्र )
●24 % वरुन 27% (X कैटेगरी महानगर क्षेत्र)

(संदर्भ :- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- घभाभ-2019 / प्र. क्र. 2 /सेवा-5 , दिनांक- 5 फेब्रुवारी 2019)

5फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेले आहे की, जेव्हा प्रचलित महगाई भत्ता DA- दर 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाड़े भत्ता(HRA) दरात X, Y, Z या प्रकारा नूसार अनुक्रमे 3% , 2% व 1% ची वाढ होईल..
त्यामुळे ज्या अर्थी आज महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% झाला आहे, म्हणजे महागाई भत्त्याची 25% मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या अर्थी ऑक्टोबर महिन्या पासून घरभाड़े भत्ता (HRA) दरात देखील वरील प्रमाणे आपोआपच वाढ होईल..


https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*तरि सर्व शाळा/ कार्यालय यांनी शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलात या प्रमाणे बदल करून सुधारित बिले तयार करणे आवश्यक आहे, व त्यासाठी लागणारा आवश्यक निधि वरिष्ठ स्तरावर मागणी करणे देखील आवश्यक आहे...*

घरभाड़े भत्ता वाढ  5फेब्रूवारी2019शासन निर्णयात नमूद असल्याने आता त्यासाठी स्वतंत्र परिपत्र किंवा निर्णय निघण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून कळाले आहे, तथापि जर शासना कडे निधि ची अनुपलब्धता असेल तर शासन घरभाड़े भत्ता वाढ थांबवणे बाबत स्वतंत्र पत्र काढू शकते...
परंतु जर तसे पत्र निघाले नाही तर पूर्वीच्याच शासन निर्णयांनूसार सुधारित बदल करून घरभाड़े भत्ता मागणी नोंदवणे आवश्यक आहे..

माहितीस्तव...

Thursday, October 7, 2021

राज्य शासकीय कर्मच्यार्‍यांचा महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात आला . | DA INCREASED FROM 17 % TO 28 % दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा. सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२० दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% इतकाच राहील. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी. दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. ➖