Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, November 23, 2021

पुरस्कार निमित्ताने लिहलेला शैक्षणिक लेख

*विविध उपक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थी घडवीणारे:*
*उपक्रमशील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे*


उदगीर तालूक्यातील तिवटग्याळ जि.प.प्रा.शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांना नुकताच  लातूर येथे दयानंद सभागृहात मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार मा. पद्मश्री पुरस्कार विजेते महान तीन व्यक्ती मा. तात्या साहेब लहाने, मा. पोपटराव पवार व मा. शब्बीर मामू या प्रसिद्ध हस्ती व मा. राज्यमंत्री संजय जी बनसोडे, मा. मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम जी काळे, प्रसिध्द साहित्यिक व कवी इंद्रजित भालेराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले त्यानिमित्त त्यांचा परिचय देणारा हा लेख...
     श्री.ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी उदगीर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विध्यावर्धिनी प्राथमिक शाळा उदगीर , माध्यमिक शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर ,उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर , त्यानंतर चार्वाक अध्यापक महाविद्यालय अहमदपूर येथे अध्यापन पदविका प्राप्त केली .शिक्षण संपल्यावर श्री.ज्ञानेश्वर बडगे हे  जि. प. प्रा. शाळा कसर येथे दि. २१ जुलै १९९७ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले.परभणी जिल्ह्यातील कसर येथे एक वर्ष सेवा दिल्यानंतर दि. १ ऑगस्ट१९९८ रोजी लातूर जिल्ह्यातील आंबानगर येथील शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाले.येथे त्यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर दि.१३ जून २००६ रोजी जि. प.प्रा.शा. संगम ता.देवणी जि. लातूर येथे बदली झाली. येथे बरीच वर्षे सेवा झाल्यानंतर उदगीर तालुक्यातील रावणगाव नवीन वसाहत येथे विविध उपक्रम राबविले व तालुक्यातील एक आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणून विविध अधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तद्नंतर त्यांची बोळेगाव बु. ता.शिरूर अनंतपाळ येथे जि. प.शाळेवर 22 जुन 2019  रोजी विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले. तद्नंतर २६ फेब्रुवारी 2021 रोजी उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू झाले. उपस्थित झाल्यावर या कोरोना कालावधीत सुध्दा आनलाईन व आॅफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. अतिशय सुंदर व उत्कृष्ट उपक्रम राबविले जातात आपल्या २४ वर्षा च्या सेवेत श्री.बडगे सरानी विद्यार्थी हेच आपले दैवत मानून प्रामाणिकपणे विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.नियोजनबद्ध अभ्यासक्रम भिंतीवर लिहून भिंती बोलक्या करणे ,शाळा सजावट केले आहेत, सध्या लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिनव जी गोयल साहेब यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रमांचे निर्मिती हे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी पुर्वी पासून सन १९९८ पासून ज्या ज्या शाळेत उपस्थित झाले त्या सर्व शाळा बाला उपक्रमांतर्गत सर्व उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थी संस्कारीत होण्यासाठी नितीमूल्याचे शिक्षण परिपाठातुन देणे, नवोदय,शिष्यवृत्तीचे वर्ग शाळेत घेवून विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनविणे,निसर्ग शाळा,सहल,महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजरे करणे अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विध्यार्थी घडविले. श्री.ज्ञानेश्वर बडगे सरांच्या विविध उपक्रमशील कार्याची व शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. जिल्हा परिषद लातूर सन 2019 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, नाशिक येथील राष्ट्रीय समता फेलोशिप पुरस्कार, औरंगाबाद येथील राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. ना.य.डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ,उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे हस्ते सत्कार ,जिल्हा पोलीस अधीक्षक बी.जी.गायकर यांच्या हस्ते सन्मान , गोंधळी समाजाच्या वतीने शिक्षणतज्ञ भगवान सिंह बायस यांचे हस्ते सन्मान,एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने २०११ चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मुंबई येथे आझाद मैदानावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे हस्ते प्रदान , काव्यमित्र संस्था पुणे चा राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि. उस्मानाबादचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार ,श्री.जयभवाणी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता.पंढरपूर जि. सोलापूर चा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित आहेत .जीवनात आई वडील याना आदर्श मानणारे श्री.ज्ञानेश्वर बडगे याना भविष्यात संस्कारक्षम विदयार्थी घडवायचे आहेत.आज त्यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार यानिमित्त त्यांना खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया !

            *शंकर बोइनवाड*
             *उदगीर* 
  


No comments:

Post a Comment