सौजन्य - HINDi And MARATHI G. K.
रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.
⬇️⬇️
दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 3
दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह
01. Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा.
02. I'm sleepy! मला झोप आली आहे!
03. Look there. तिथे बघ. तिथे बघा.
04. Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा.
05. I can do it. मी करू शकतो. मी करू शकते.
06. How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?
07. I am taller. मी जास्त उंच आहे.
08. I eat here. मी इथे खातो.
09. I'm so fat. मी किती लठ्ठ आहे.
10. Is that so? असं का ? असं आहे का?
11. I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.
12. I never cry. मी कधीच रडत नाही.
13. Is Satish big ? सतिष मोठा आहे का?
14. Let's chat. चला गप्पा मारूया.
15. Turn right. उजवीकडे वळ. उजवीकडे वळा.
16. Is he tall ? तो उंच आहे का ?
17. I'm coming. मी येतोय. मी येतेय.
18. Is it done ? झालंय का ? केले आहे का ?
19. I see them. मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो.
20. Is it free ? ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ?
21. I need time. मला वेळेची गरज आहे.
22. Is it true ? खरं आहे का ?
23. I saved you. मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं.
24. It's alive. ते जिवंत आहे.
25. It's night. रात्र आहे.
26. Is this it ? हेच आहे का ? एवढच आहे का ?
27. Let go Dinesh . दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या.
28. Step aside. बाजूला व्हा ! बाजूला हो !
29. Look ahead. पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा.
30. She is old. ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.
31. Let him go ! सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या !
32. Stand back ! मागे रहा !
33. Time is up. वेळ समाप्त. वेळ संपली.
34. Stay alert. जागृत रहा.
35. I am ready. मी तयार आहे.
36. Study hard. मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.
37. Smell this. याचा वास घे. याचा वास घ्या.
38. Take a bus. एखादी बस पकड.
39. Breathe out. श्वास सोड. श्वास सोडा.
40. That's wet. ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे.
41. Eat with us. आमच्याबरोबर खा.
42. They tried. त्यांनी प्रयत्न केला.
43. It's ready. ते तयार आहे.
44. We'll help. आम्ही मदत करू. आपण मदत करू.
45. Talk to me.माझ्याशी बोल.
46. Watch this. हे बघ. हे बघा.
47. I left home. मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले.
48. We had fun. आम्ही मजा केली. आपण मजा केली.
49. Who did it ? हे कोणी केले ?
50. We laughed. आम्ही हसलो. आपण हसलो.
51. We like it. आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं.
52. I felt that. मला जाणवलं ते.
53. We want it. आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे.
54. Divya yawned. दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली.
55. We'll wait. आम्ही थांबू. आपण थांबू.
56. Look again. परत बघ. परत बघा.
57. I can swim. मी पोहू शकतो. मी पोहू शकते.
58. We're back. आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत.
59. This is me. हा मी. ही मी.
60. Where am I ? मी कुठे आहे ?
61. Anyone home ? घरी कोणी आहे का ?
62. I can't say. मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही.
63. Who has it? कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ?
64. Who talked ? कोण बोललं ?
65. Who are we ? आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ?
66. Who was it ?कोण होतं ?
67. They stood. ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या.
68. You decide. तू ठरव. तुम्ही ठरवा.
69. Don't leave. सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस.
70. You've won. तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात.
71. I'm a liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.
72. Anyone hurt ? कोणाला लागलं का ?
73. Be prepared. तयार रहा !
74. Who phoned ? कोणी फोन केला ?
75. Come inside. आत ये. आत या.
76. Let me see. मला बघू दे. मला बघू द्या.
77. He is happy. तो आनंदी आहे.
78. Did Dipa eat ? दीपाने खाल्लं का ?
79. Mina’s ugly. मीना कुरूप आहे.
80. Ramesh bit me. रमेशने मला चावलं.
81. Girish saw me. गिरीशने मला पाहिलं.
82. Talk to us. आमच्याबरोबर बोल.
83. Sadashiv yelled. सदशीव ओरडला.
84. He resigned. त्याने राजीनामा दिला.
85. Don't argue. भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका.
86. I exercised. मी व्यायाम केला.
87. Go help Rina. जाऊन रीनाची मदत कर.
88. Get changed. कपडे बदल. कपडे बदला.
89. Have a seat. बस. बसा.
90. I have time. माझ्याकडे वेळ आहे.
91. He can come. तो येऊ शकतो.
92. I feel fine. मला बरं वाटतंय.
93. He found it. त्याला सापडलं.
94. Don't shout. ओरडू नकोस. ओरडू नका.
95. I can't fly. मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही.
96. He stood up. तो उभा राहिला.
97. I came back. मी परत आलो. मी परत आले.
98. I made that. ते मी बनवलं. मी बनवलं ते.
99. I don't eat. मी खात नाही.
100. How strange! किती विचित्र !
रोज बोलले जाणारे १०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग
1. Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?
2. Welcome. स्वागत ! सुस्वागतम !
3. Get ready. तयार हो.
4. Sit here. इथे बस. इथे बसा.
5. Who? कोण?
6. Well done! शाब्बास ! चांगले केले.
7. He fell.तो पडला.
8. Hold this. हे धर. हे धरा.
9. Leave it. ते सोड.
10. Run! पळ.
11. Sit down! खाली बस ! खाली बसा.
12. Wait here. इथे थांब. इथे थांबा.
13. Go inside. आत जा.
14. We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.
15. I won . मी जिंकलो.
16. Who am I ? मी कोण आहे ?
17. Wow ! वाह !
18. What's up ? काय चाललंय ?
19. Stand up ! ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.
20. We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.
21. They won. ते जिंकले.
22. We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.
23. We talked. आम्ही बोललो.
24. Who is it ? कोण आहे ?
25. Use this. हे वापर. हे वापरा.
26. No way ! शक्यच नाही !
27. Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?
28. Get up ! ऊठ !
29. Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.
30. I know. मला माहीत आहे.
31. Who is he ? तो कोण आहे ?
32. I want it. मला ते हवं आहे.
33. I'm OK. मी ठीक आहे.
34. Listen. ऐक.
35. Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.
36. We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.
37. Really ? खरंच का ?
38. Try it on. घालून बघ. घालून बघा.
39. Thanks. धन्यवाद.
40. Why me ? मीच का ?
41. I lost. मी हरलो.
42. I saw you. मी तुला बघितलं.
43. They lied. ते खोटं बोलले.
44. That's it. बरोबर.
45. Ask him त्याला विचार.त्याला विचारा.
46. Take mine. माझे घे. माझा घे.
47. It's new. ते नवीन आहे.
48. Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.
49. What for ? कशासाठी ?
50. I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.
51. Don't cry. रडू नकोस. रडू नका.
52. They left. ते निघाले.
53. Who came ? कोण आलं ?
54. Take care ! काळजी घे. काळजी घ्या.
55. Dogs bark. कुत्रे भुंकतात.
56. They lost. ते हरले.
57. Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?
58. He knits. तो विणतो.
59. Thank you. धन्यवाद.
60. Call me. मला फोन करा. मला बोलवा.
61. Forget me. मला विसरून जा.
62. He came. तो आला.
63. Sign here. इथे सही करा.इथे सही कर.
64. Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.
65. Come on ! चल ! चला !
66. Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.
67. He knows. त्याला माहीत आहे.
68. Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.
69. Come in. आत ये.
70. Forget it. विसरून जा.
71. Take this. हे घे. हे घ्या.
72. Fold it. घडी घाल.
73. He left. तो निघाला.
74. Stay back. मागे राहा.
75. She walks. ती चालते.
76. I'm right. मी बरोबर आहे.
77. Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.
78. I'm young. मी तरूण आहे.
79. Call Dipak.दिपकला बोलव.
80. Get down. खाली हो.
81. Go home. घरी जा.
82. Have fun. मजा कर.
83. I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.
84. Sit there. तिथे बस.तिथे बसा.
85. He runs. तो पळतो.
86. He spoke. तो बोलला.
87. Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.
88. I'm ill. मी आजारी आहे.
89. It's here. इथे आहे.
90. Stay away. दूर रहा.
91. It's me ! मी आहे !
92. Let me go. मला जाऊ द्या.
93. Let's ask. विचारू या.
94. I’m Santosh.मी संतोष आहे.
95. Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !
96. She cried. ती रडली.
97. It's OK. ठीक आहे.
98. She tried. तिने प्रयत्न केला.
99. Me, too. मी पण. मला पण.
100. See below. खाली पाहा.
इंग्रजी वाक्ये – English Sentences Used In Daily Life
मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवणात संभाषण करत असताना नेहमी वापरत असतो.
चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया Daily Life मध्ये Conversation करताना आपण कोणते English Sentence Use करतो आणि त्यांचा मराठीत काय अर्थ होतो.
आपण आपल्या दैनंदिन जीवणात वापरत असलेली काही महत्वाचे English Sentence कोणते आहेत?-English Sentences Used In Daily Life.
आपण आपल्या दैनंदिन जीवणात वापरत असलेली काही महत्वाचे English Sentence पुढीलप्रमाणे आहेत
1. मुळीच नाही Absolutely Not.
2. तु माझ्यासोबत येतो आहेस का Are U Coming With Me.
3. तुला नक्की खात्री आहे? Are U Really Sure.
4. तु काळजी करू नको You Don’t Worry.
5. हे तुझे आहे का?-Is It Yours.
6. तो तुझ्या वयाचा आहे-He Is Your Age.
7. याबत कोणालाही माहीती नाही. Nobody Knows About It.
8. अजुन काही-Anything Else.
9. कृपया माझ्यावर एक उपकार करा-Please Do Me A Favour.
10. किती वाजले?-What Time Is It?.
11. मला पाहु द्या-Let Me See.
12. अंदाज लावा-Take A Guess.
13. चुप राहाShut Up.
14. मी जवळ जवळ तिथे आहोत-We Are Almost There.
15. माझ्यावर विश्वास ठेवा-Belive Me.
16. उद्या मला काँल करा-Call Me Tomorrow.
17. तुम्हाला समजले का?-Do You Understand.
18. तुला ते पाहिजे आहे का?-Do You Want It.
19. ते करू नका-Dont Do It.
20. अति करू नको-Dont Exaggerate.
21. तुम्ही काम पुर्ण केले का-Have You Finished The Work.
22. तो त्याच्या मार्गावर आहे-He Is On His Way.
23. किती झाले?-How Much.
24. मी ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही.-I Cant Belive It.
25. मी वाट पाहु शकत नाही.-I Cant Wait.
26. माझ्याकडे वेळ नाही-I Don’t Have Time.
27. मी कोणालाही ओळखत नाही.-I Don’t Know Anybody.
28. मला असे वाटत नाही.-I Don’t Think So.
29. मला खुप चांगले जाणवते आहे-I Fell Much Better.
30. मला ते सापडले-I Found It.
31. मला आशा आहे-I Hope So.
32. मला ते माहीत होते.-I Knew It.
33. मी ते लक्षात घेतले-I Noticed That.
34. मला त्याच्याशी बोलायचे आहे-I Want To Speak With Him.
35. मला एक कप काँफी आवडेल-I Would Like A Cup Of Coffee.
36. मी भुकेला आहे- I Am Hungry.
37. मी जात आहे-I Am Leaving.
38. मला त्याची सवय झाली आहे-I Am Used To It.
39. मी प्रयत्न करेन-I Ll Try.
40. मी मजा करीत आहे-I Am Having Fun.
41. मी तयार आहे-I Am Ready.
42. हे अदभुत आहे-It S Incredible.
43. हे दुर आहे का?-Is It Far.
44. काही फरक पडत नाही.-It Doesnt Matter.
45. याचा वास चांगला आहे.-It Sells Good.
46. हे सोप्पे आहे.-It Is Easy.
47. जाण्याची वेळ झाली-It Is Time To Go.
48. ते वेगळे आहे-It Is Diffrent.
49. ते मजेशीर आहे-It Is Funny.
50. हे अशक्य आहे-It Is Impossible.
51. हे कठिण नाही-It Is Not Difficult.
52. हे स्पष्ट आहे-It Is Obvious.
53. आता तुझी पाळी-Its Your Turn.
54. आराम करा-Relax.
55. उद्या भेटुया-See You Tomorrow.
56. ती माझी चांगली मैत्रीण आहे-She Is My Best Friend.
57. ती खुप हुशार आहे-She Is So Smart.
58. हळु जरा-Slow Down.
59. तु पुरेसे आहे-Thats Enough.
60. ते मनोरंजक आहे.-Thats Interesting.
61. येथे बरेच लोक आहेत.-They Are Too Many People Here.
62. ते एकमेकांना आवडतात-They Like Each Other.
63. त्याबददल विचार कर-Think About It.
64. माझ्यासाठी थांब-Wait For Me.
65. तु काय बोललास?-What Did You Say?.
66. तुला काय वाटते?-What Do You Think?.
67. तो कशाबददल बोलत आहे-What Is He Talking About?.
68. काय चालु आहे-What’s Going On.
69. आजची तारीख काय आहे?-What The Date Today.
70. तु कुठे जात आहेस?-Where Are U Going?.
71. तो कुठे आहे?-Where Is He?.
72. तु थकलेला दिसतो आहे?-You Are Look Tired.
73. तु वेडा आहेस-You Are Crazzy.
74. तुमचे स्वागत आहे-You R Welcome.
75. तु खोटे बोलतो आहे-You Are Lying.
76. समजुन घेण्याचा प्रयत्न कर-Try To Understand.
77. अंधार होत आहे-It Is Getting Dark.
78. मला थंडी वाजते आहे-I Am Felling Cold.
79. मशिन चालु कर-Switch On The Machine.
80. एसी बंद कर-Switch Off The Ac.
81. झाकण उघड-Open The Lid.
82. नळ बंद कर-Turn Off The Tap.
83. पलंगावर चादर पसर-Spread The Bed Sheet On Bed.
84. कारणे देऊ नको-Dont Make Execuse.
85. केस विचर-Comb Your Hair.
86. व्यर्थ बोलू नको-Dont Talk Nonsense.
87. पीठ मळुन घे-Knead The Flour.
88. बुट घाल-Put On The Shoes.
89. बुट काढ-Take Of The Shoes.
90. टी शर्ट घाल-Wear The T Shirt.
91. शर्ट काढ-Take Off The Shirt.
92. त्याला बघु नको-Dont Look At Him.
93. तु डरपोक आहेस-You Are Coward.
94. आपण पुन्हा कधी भेटायच?-When Wiil We Meet Again.
95. मी शामकडुन ऐकले-I Heard It From Ram.
96. मी तुझ्यासाठी हे केले-I Did It For You.
97. मी मालेगावला राहतो-I Live In Malegaon.
98. मी एका बँकेत काम करतो-I Work In A Bank.
99. मी बसने प्रवास करतो-I Travel By Bus.
100. कपामध्ये चहा ओत-Pour The Tea Into The Cup.
101. ही ट्रेन वेळेच्या आधी पोहचेल-This Train Will Reach Before Time.
102. तु निघण्याच्या अगोदर मी येईन-I Will Come Before You Leave.
103. मी दहा वाजेनंतर तुला भेटेल-I Will Meet You After 10.
104. तिला काय आवडते-What Does She Like?.
105. मी सकाळपासुन अभ्यास करतो आहे-I Have Been Studying Since Morning.
106. मी सर्वोपरी प्रयत्न करेन-I Will Try My Best.
107. मी लवकर परत येईन-I Will Be Back Soon.
108. मी तुमचा पेन वापरू शकतो का?-May I Use Your Pen.
109. तुला ते कोणी सांगितले-Who Told You That.
110. मला निराश करू नको-Dont Let Me Down.
111. मी तुझ्या बाजुने आहे-I Am On Your Side.
112. तु पुन्हा तिथे जाशील का?-Would You Go There Again.
113. तुम्ही परत कधी येणार-When Are U Coming Back.
114. आपण तयार आहात का?-Are You Ready.
115. तुला घरी चालत जायचे आहे का?-Do You Want To Walk Home.
116. आपण आता लगेच निघत आहात-Are U Leaving Now.
117. आज रात्री मी तुला काँल करू का-Shoul I Call You Tonight.
118. तुझ्याकडे कार आहे का?-Do You Have A Car.
119. आपण माझ्यासाठी ते लिहु शकता-Can You Write It Down For Me.
120. ते लोक कोण आहेत?-Who Are Those People.
121. मी तुमच्याशी कसा संपर्क साधु?-How Can I Contact You.
122. तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का?-Are You Here For First Time.
123. चित्रपट कसा होता?-How Was The Movie.
124. तु मला स्पष्टपणे ऐकु शकतो का?-Can You Here Me Clearly.
125. होय.मी तुला अगदी स्पष्टपणे ऐकु शकतो-Yes I Can Here You Very Clerly.
126. आपण मला पाहु शकता?-Can You See Me.
127. नाही मी तुला पाहु शकत नाही-No I Cant See You.
128. आपण काल काही खरेदी केली का?-Did You Buy Anything Yesterday.
129. होय मी केली-Yes,I Did.
130. मी प्रयत्न करू का?-Can I Try?.
131. आज संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काही करत आहात का-Are You Doing Anything This Evening.
132. होय,मी काही मित्रांसोबत बाहेर जातो आहे-Yes I Am Going Out With Some Friends.
133. तु तुझ्या रिकाम्या वेळात काय करतो?-What Do You Do In Your Free Time.
134. मला घरी बसुन वाचन करायला आवडते-I Like Reading At Home.
135. हवामान कसे आहे-What Is The Whether Like.
136. ह्या क्षणी जोरात पाऊस पडतो आहे-Its Raining Heavily At Movement.
137. आपण माझा मोबाईल पाहिला का?-Have You See My Mobile.
138. नाही,मी नाही पाहिला-No I Have Nt See.
139. मी इथे बसु शकतो का?-May I Sit Here.
140. हे बरोबर आहे का?-Is This Correct.
141. किमान एकदा प्रयत्न तरी कर-Try At Least Once.
142. शनिवारी संध्याकाळी आपण काय केले?-What Did You Do On Saturday Evening.
143. आम्ही एक चित्रपट बघायला गेलो-We Went To See A Film.
144. तो पार्टीमध्ये आला होता का?-Did He Come To The Party?.
145. सर्व काही ठिक आहे ना?-Is Everything Ok.
146. होय,सर्व काही ठिक आहे-Yes Everything Is Fine.
147. आपण तिला काँल केला का?-Did You Call Her.
148. अरे नाही मी विसरलो मी आत्ता तिला काँल करेन-Oh No I Forgot I Will Call Her Now.
149. आपण जात आहात हे त्याला माहीत आहे का?-Does He Know Rhat You Are Going.
150. नाही मी अजुन त्याला सांगितले नाही-No,I Havent Told Him Yet.
151. इथुन स्टेशनकडे जायला बस आहे का?-Is There A Bus From Here To The Station.
152. होय आहे दर 10 मिनिटांनी-Yes Every 10 Minutes.
153. तुम्हाला पार्टीत जायचे नाहीये का?-Dont You Want To Go To The Party.
154. इथून किती दुर आहे?-How Far Is It From Here.
155. आपण हे पुस्तक वाचले आहे का?-Have You Read This Book.
156. आपण घरी कसे जात आहात?-How Are You Going Home.
157. अफवा पसरवु नको-Dont Spread Rumours.
158. तो काय म्हणाला?-What Did He Say.
159. आपण थोडा चहा घ्याल का?-Would You Like Some Tea.
160. मला माफ करा-Execuse Me.
161. तुम्ही ते कसे करता?-How Do You Do That.
💁♀️दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 15 .
👉https://www.hindiandmarathigk.com/2023/01/daily-use-500-english-sentences-with-marathi-meaning-15.html
💁♀️रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.
👉https://www.hindiandmarathigk.com/p/marathi-gk-pdf.html
1401.These are fresh. हे ताजे आहेत.
1402.Ram isn't there.राम तिथे नाही.
1403.We eat raw mango. आम्ही कच्चा आंबा खातो.
1404.Who's after you? तुझ्यामागे कोण लागलं आहे?
1405.Are they sisters? त्या बहिणी आहेत का?
1406.Have some tea. थोडा चहा घे.थोडा चहा घ्या.
1407.I just said that. मी आत्ता तेच म्हटलं.
1408.I must have this. मला हे मिळालंच पाहिजे.माझ्याकडे हे असलेच पाहिजे.
1409.I'm really tired. मी खरोखर थकलो आहे. मी खरोखर थकले आहे.
1410.Is your cat deaf? तुमची मांजर बाहिरी आहे का?
1411.Did you call the police? तू पोलिसांना फोन केलास का? तुम्ही पोलिसांना फोन केला होता का?
1412.The wire has burned out.वायर जळून खाक झाली आहे.
1413.Nobody wants to help you. कोणालाच तुझी मदत करायची नाही आहे. कोणीही तुम्हाला मदत करू इच्छित नाही.
1414.I want to stretch my legs.मला माझे पाय मोकळे करायचे आहेत.मला माझे पाय ताणायचे आहेत.
1415.He turned off the lights. त्याने लाईट बंद केले.
1416.The mouse is under the table. उंदीर टेबलाखाली आहे.
1417.Keep your environment clean. आपले पर्यावरण स्वच्छ ठेवा.
1418.You have three books. तुझ्याकडे तीन पुस्तके आहेत. तुमच्याकडे तीन पुस्तके आहेत.
1419.Shall we add a bit more salt? थोडं जास्त मीठ घालू या का?
1420.She likes to work in the garden. तिला बागेत काम करायला आवडतं.
1421.I have no idea why Ram did that. रामने तसं का केलं याची मला काही कल्पना नाहीये.रामने असे का केले हे मला कळेना.
1422.I asked each girl five questions. मी प्रत्येक मुलीला पाच प्रश्न विचारले.
1423.I will play cricket this afternoon. मी आज दुपारी क्रिकेट खेळेन. मी आज दुपारी क्रिकेट खेळणार आहे.
1424.I like talking to my dog in Hindi. मला माझ्या कुत्र्याशी हिंदीत बोलायला आवडतं.
1425.My neighbor was arrested last night. काल रात्री माझ्या शेजाऱ्याला अटक करण्यात आली.
1426.Ram is leaving for India next Sunday. राम पुढच्या रविवारी भारताला रवाना होत आहे.
1427.Is Hindi taught in elementary schools? प्राथमिक शाळांमध्ये हिन्दी शिकवली जाते का?
1428.They were responsible for the accident. आपघाताला ते जबाबदार होते.
1429.What did Ram want to talk to Radha about? रामला राधाशी कशाबद्दल बोलायचं होतं?
1430.I'm having lunch with my mother right now. मी आत्ता माझ्या आईसोबत जेवत आहे.
1431.He is ready to learn anything from anybody.तो कोणाकडूनही काहीही शिकायला तयार असतो.
1432.I took it for granted that he would succeed. तो यशस्वी होईल हे मी गृहीत धरले.
1433.They look bored. ते कंटाळलेले दिसताहेत.
1434.Open the windows. खिडक्या उघड. खिडक्या उघडा.
1435.You should sleep. तुला झोपायला पाहिजे. तुम्हाला झोपायला पाहिजे.
1436.Ram never changed. राम कधीही बदलला नाही.
1437.She can play a flute. तिला बासरी वाजवता येते. ती बासरी वाजवू शकते.
1438.It was hot outside. बाहेर गरमी होती.
1439.Is Ram at school now? राम आता शाळेत आहे का?
1440.We live together now. आम्ही आता एकत्र राहतो. आपण आता एकत्र राहतो.
1441.How did you feel then? तेव्हा तुम्हाला कसे वाटले? तेव्हा तुला कसं वाटलं?
1442.What's the cat's name? मांजरीचे नाव काय आहे?
1443.Ram isn't a bit scared. राम जराही घाबरला नाही.
1444.Ram is used to hard work.रामला मेहनतीची/कष्टायची सवय आहे.
1445.I don't feel like dancing. मला नाचायला आवडत नाही.
1446.How many students are here? येथे किती विद्यार्थी आहेत?
1447.Ram didn't buy the tickets.रामने तिकिटे घेतली नाहीत.
1448.I grew these radish myself. हे मुळे मी स्वतः उगवली आहेत.
1449.What year was your house made? तुमचे घर कोणत्या वर्षी बनवले होते?
1450.Everything is OK. Don't worry. सर्वकाही ठीक आहे.काळजी करू नकोस. सर्वकाही ठीक आहे. काळजी करू नका.
1451.The dog saved the cow's life. कुत्र्याने गायीचा जीव वाचवला.
1452.My daughter likes to play with dolls. माझ्या मुलीला बाहुल्यांसोबत खेळायला आवडतं.
1453.I never thought I'd get married. माझं लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी लग्न करेन असं कधीच वाटलं नव्हतं.
1454.Lots of people make that mistake. अशी चूक भरपूर लोकं करतात.
1455.I will finish my homework by seven. मी सात वाजेपर्यंत माझा गृहपाठ संपवेन.
1456.Ram watched his granddaughters dance. रामने आपल्या नातींना नाचताना पाहिलं. रामने आपल्या नातींचा नाच पाहिला.
1457.I always give something to the beggars. मी भिकार्यांना नेहमीच काहीतरी देतो. मी भिकार्यांना नेहमीच काहीतरी देते.
1458.Is it true that Ram can't read or write? रामला लिहिता-वाचता येत नाही हे खरे आहे का?
1459.I've fallen asleep in class several times. मी वर्गात अनेक वेळा झोपलो आहे. मी वर्गात अनेक वेळा झोपून गेले आहे.
1460.To begin with, you have no right to be here. पहिलं तर,तुला इथे असायचा काहीही अधिकार नाहीये.
1461.Ram sold the necklace to Radha for a very low price.रामने हार राधाला अगदी कमी किमतीत विकला.
1462.This is foolish. हा मूर्खपणा आहे.
1463.Are you a parent? तुम्ही पालक आहात का? आपण पालक आहात का?
1464.You were fifth. तू पाचवा होतास. तू पाचवी होतीस.
1465.Ram became calm. राम शांत झाला.
1466.Ram insulted me. रामने माझा अपमान केला.
1467.Ram is confused.राम गोंधळलेला आहे.
1468.Ram knows a lot. रामला खूप माहिती आहे.
1469.We all know Ram. आपण सर्व रामला जाणतो.आम्ही सर्व रामला ओळखतो.
1470.Where is my bag? माझी बॅग कुठे आहे?
1471.All of them died. त्या सर्वांचा मृत्यू झाला.त्यातले सर्व वारले. त्यातले सर्व मेले.
1472.Give me one hour. मला एक तास द्या. मला एक तास दे.
1473.How was the game? कसा होता खेळ? खेळ कसा होता?
1474.I waited a while. मी थोडा वेळ वाट पाहिली.
1475.Is this a puzzle? हे कोडे आहे का?
1476.The baby's awake. बाळ जागे आहे.
1477.We need medicine. आम्हाला औषध हवे आहे. आपल्याला औषधांची गरज आहे.
1478.Where's my plate? माझं ताट कुठे आहे?
1479.You're very open. तू खूप मोकळा आहेस. तू खूप मोकळी आहेस.तुम्ही खूप मोकळे आहात.
1480.Didn't you see it? तू बघितलं नाहीस का ? तुम्ही बघितलं नाही का?
1481.Give me the pen. मला पेन दे. मला पेन द्या.
1482.He's already left. तो आधिच निघून गेला आहे.
1483.I have a computer. माझ्याकडे संगणक आहे.माझ्याकडे एक संगणक आहे.
1484.I need some paper. मला काही कागद हवे आहेत.मला काही कागदाची गरज आहे.
1485.I was very afraid. मला खूप भिती वाटत होती.
1486.I'm doing my duty. मी माझं कर्तव्य करत आहे. मी माझं कर्तव्य करतेय.
1487.Is your car red? तुझी गाडी लाल आहे का? तुमची गाडी लाल आहे का?
1488.Now start singing. आता गायला सुरुवात कर.आता गायला सुरुवात करा.
1489.Someone's calling. कोणीतरी बोलवतंय.
1490.The rent is cheap. भाडे स्वस्त आहे.
1491.This is real easy. हे एकदम सोपं आहे.
1492.They were laughing. ते हसत होते.त्या हसत होत्या.
1493.Ram didn't go there. राम तेथे गेला नाही.
1494.Whose phone is that? तो कोणाचा फोन आहे?
1495.Didn't you get hungry? तुला भूक लागली नाही का? तुम्हाला भूक लागली नाही का?
1496.Help me move this stone. मला हा दगड हलवायला मदत कर.
1497.This isn't hard. हे कठीण नाही.
1498.Ram is an actor.राम एक अभिनेता आहे.
1499.Ram has left us. राम आपल्याला सोडून गेला आहे. राम आम्हाला सोडून गेला आहे.
1500.Ram lost weight.रामने वजन कमी केलं.
No comments:
Post a Comment