GPF संदर्भात महाराष्ट्र शासनाची अतीशय महत्त्वाची अधिसूचना
महाराष्ट्र राज्यातील GPF खाते धारकांना मिळणार केंद्र सरकारच्या नियमानुसारच व्याजदर.
राज्यातील GPF खाते धारक कर्मचाऱ्यांना याअगोदर त्यांचे खात्यावर दर तीन महिन्यांनी राज्य शासन ठरवीत होते. परंतू दिनांक ३०/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचने नुसार केंद्र शासन जो केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या GPF खात्यावर जो व्याजदर ठरवेल तोच व्याजदर महाराष्ट्र राज्यातील GPF खाते धारक कर्मचाऱ्यांना लागू असेल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या gpf खात्यावर व्याजदर निश्चिती साठी निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही, जो व्याजदर केंद्र शासन ठरवेल तोच व्याजदर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या GPF खात्याला लागू असेल.
No comments:
Post a Comment