*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 13/6 /2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळा व्यवस्थापन समिती च्या सर्व सद्स्यांना पुर्व सुचना देऊन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व सद्स्यांना सन 2022 -2023 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच शाळा पुर्व तयारी, विद्यार्थी प्रवेश नियोजन, आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण, वृक्षारोपण व कोरोना आजार वाढत असल्याचे दिसून येत आपण व आपल्या कुटुंबातील सर्व सद्स्यांनी जागरुकता बाळगावी या विषयी सविस्तर माहिती दिली. तद्नंतर इयत्ता पहिली प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश आपल्या दारी अंतर्गत 100 % प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. प्रवेश पात्र नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सन 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात दिनांक 15/6/2022 रोजी करण्यात येणार आहे तसेच या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष, पाठ्यपुस्तक, शालेय पोषण आहार अंतर्गत गोड पदार्थ दिला जाणार आहे असे सर्व विद्यार्थी व पालकांना सांगण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जण उपस्थित होते.*
Subscribe to:
Post Comments (Atom)
कुमठा खु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न
*कुमठा खु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न* ------------------------------------- *कुमठा खु - कुमठा खु जिल्हा परिषद प्राथमिक ...
-
वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी लागणार अहवाल सादर करत असताना त्यामध्ये विविध प्रकरणाचा समावेश करावा लागतो. त्या शिवाय आपणास असा अहवाल सादर करता य...
-
*GPF बाबत* ---------- _*लातूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने शिक्षकांच्या gpf slip ऑनलाईन करण्याच्या निर्णय घेतला आहे. सन 2021-2 2 या आर्थि...
-
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा* *तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जि...
-
निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गट बैठक इतिवृत्त लेखन सौजन्य - नारायण शिंदे सर Download here to click⬇️ https://drive.google.com/file/d...
-
Today's #Happy Saturday activities zpps Tiwatgyal, विषय गणित, उपक्रम "दिलेल्या संख्या सर्वाधिक जास्त कोण सांगेल तो विजेता"*
-
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2025 अंतर्गत परीक्षा 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर
-
शाळा व्यवस्थापन समिती निवड gr 👇 https://drive.google.com/file/d/1DP88KyBvzQyofI2J5kOGDKTdBf3b7F6X/view?usp=drivesdk शाळा व्यवस्थापन समिती ...









No comments:
Post a Comment