Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, June 21, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा*


























































*तिवटग्याळ - जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 21/6/2022 रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, उमाकांत पाटील, शिवाजी पाटील, सोमा पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण प्रेमी नागरिक, शाळेतील विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जणांच्या उपस्थितीत योग दिनाच्या करो योग रहो निरोग अशा विविध घोषणा देत प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. तद्नंतर शाळेत  शाळेतील योग शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी  उपस्थित सर्व पालकांना  कोविड - 19 नियमांचे महत्त्व social distance, sanitizer,, Handwash  व mask याचा वापर करावा जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील असे सांगितले योगाचे प्रात्यक्षिक व महत्त्व समजावून सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालय नवि दिल्ली यांनी ठरवून दिलेल्या योगासने व प्राणायाम यांची सर्व माहिती व कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पालकांना  सकाळी योगासने व प्राणायाम घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगाचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी व पालकांना शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी करुन दाखवले  यावेळी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, उमाकांत पाटील, शिवाजी पाटील, सोमा पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व श्रीमती भागाबाई बिरादार व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य. गावातील नागरिक उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

No comments:

Post a Comment