Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, August 1, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी



*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*तिवटग्याळ . - आज  दिनांक 1/8/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी  तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी व जयंती साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती  दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे ,शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले  व शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*



















































No comments:

Post a Comment