जम्मू आणि काश्मीर च्या सिमेवर तैनात असलेले जवान सिध्देश्वर पाटील यांचा सत्कार
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 21 आॅगस्ट 2025 रोजी तिवटग्याळ गावचे नागरिक तथा जम्मू आणि काश्मीर च्या सिमेवर तैनात असलेले जवान सिध्देश्वर पाटील महिन्याच्या सुट्टीवर आले असता आज शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, सैनिकांची किती कठोर व अवघड कामे, परीश्रम, जवाबदारी या विषयावर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. जे विद्यार्थी सैनिक होणार आहेत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सिमेवर तैनात असताना सुध्दा पुढील शैक्षणिक प्रगती व रॅंक पदोन्नती साठी अभ्यास चालू आहे असे सांगितले व त्यांनी कोण कोणते पाठ्यपुस्तके वापरत आहेत तेही सांगितले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या व तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व विद्यार्थांनी सैनिक सिध्देश्वर पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला*


No comments:
Post a Comment