Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, November 12, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा*

*तिवटग्याळ - आज दिनांक 11/11/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. परीपाठानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की आज दिनांक 11 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री तसेच भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आहे हा जन्म राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो असे शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्वांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. जयंती नंतर 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*

















No comments:

Post a Comment