Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, December 30, 2022

जिल्हाधिकारी लातूर घोषित सुट्टी सन 2023

जिल्हाधिकारी लातूर घोषित सुट्टी सन 2023





दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार बोर्डाची परीक्षा


*दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार बोर्डाची परीक्षा*

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.

राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी-बारावीची परीक्षा घेतली जाते. मंडळाने याआधी 19 सप्टेंबर 2022 रोजी लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करुन त्यावर 15 दिवसांत सूचना करण्याचे आवाहन केले होते. या सूचनांनुसार दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
येथे पाहा अंतिम वेळापत्रक –


HSC exam time table(general side) 
⬇️

HSC exam time table (vocational side) 
⬇️


दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक दिले जाणार आहे. मंडळाकडून शाळांना दिल्या जाणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच पेपरच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
-----------------------------

Sunday, December 25, 2022

दर्शवेळा अमावस्या म्हणजे ओलघे ओलघे सालम पोलगे गर्जना देत काळ्या आईचा वनमहोत्सव













*दर्शवेळा अमावस्या म्हणजे ओलघे ओलघे सालम पोलगे गर्जना देत काळ्या आईचा वनमहोत्सव*


शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी दर्शवेळा अमावस्या आहे या निमित्ताने लातूर, बीड, उस्मानाबाद व खास लेख. सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात   रोजी दर्शवेळा अमावस्या सर्व शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना, मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात आमंत्रणे देऊन जेवायला बोलावतात असा हा एक सण आहे; या सणाला *‘येळ अमावस्या’* अस म्हणायची पद्धत आहे.

मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात "वेळा अमावस्या" हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो. हा सण शेजारील कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे.
ही आमावस्या *दर्शवेळा अमावस्या* म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.वेळ अमावस्या काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या पवित्र भावनं कर्नाटक आणि लगतच्या मराठवाड्यातील लातूर,बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत दर्श
अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे अपभ्रंश हे 'वेळ अमावस्या' झाले. या सणांची ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते.  इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणताः डिसेंबर-जानेवारी या दिवसात ही अमावस्या असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो. आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात. आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते. केवळ आंबिलावर हा बेट थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावरण पदार्थ! या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो. 
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर या सणादिवशी शेतात एक खोप बनवून तेथे निसर्गदेवतेची विविध धान्यांची रास मांडून तेथे फुले, आंब्याची पाने, ज्वारीच्या धाटांची सजावट केली जाते.  ‘ओलघे, ओलघे सालम पोलगे’ असे म्हणत प्रदक्षिणा घातली जाते. शिवारातील पक्ष्यांनो, प्राण्यांनो आपणा सर्वांना माणसाप्रमाणेच जेवणाचे आमंत्रण आहे. तुमच्या आशीर्वादाने चारी बाजूंनी आमचे शिवार फुलू दे, अशी प्रार्थना बळिराजा जणू काही करत असतो. एवढंच नाही तर काही भागात ज्वारीचा खिचडा करतात तर काही भागात कोंदीच्या पोळ्या (तिळाच्या पोळ्या), धपाटे, गव्हाची खीर, बाजरीच्या भाकरी केल्या जातात. ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व दिसून येते. या वेळी पाणी आणि अंबिल ठेवण्यासाठी बिंदगी व झाकणी त्याचबरोबर सांजमोरवे आणि झाकणीचा उपयोग केला जातो. कदाचित हे नव्या पिढीसाठी अपरिचित शब्द असतील परंतु याचा वापर आजही ब-याच ठिकाणी केला जातो. आणले जाते.नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं. जमा झालेल्या स्त्रिया येणार्‍या-जाणार्‍याच्या जेवनाच बघतात तर जेवण झाल्यावर पुरुष मंडळी, बाळ गोपाळ, तरूण तरणी काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
भारतात अनेक सण, परंपरा अन प्रथा आहेत. त्यातील काही आता कालबाह्य झाल्या आहेत, काहींना आपण विसरत आहोत तर काहींना अंधश्रद्धा म्हणून हिणवल जात. वेळ अमावास्या ही एका परंपरेचा भाग आहे ज्यात अर्थशास्त्र आणि आरोग्यशास्त्र सुद्धा लपलेल आहे. अनेक लोक जुन्या गोष्टी विसरून एकत्र येतात, नव्या ओळखी होतात आणि मनाला प्रसन्नताही लाभते. अशा प्रकारे वेळ अमावस्या हा सण लहाना पासून ते मोठ्या पर्यंत अतिशय आनंददाने व उत्साहाने साजरा करतात.
--------------------------
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक* 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
--------------------------


Tuesday, December 20, 2022

जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदलीबाबत नविन वेळा दिनांक 20/12/2022 पत्रक

*📣जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदलीबाबत नविन वेळापत्रक⏰दिनांक 20/12/2022 👇





Version Conflict: जिल्हातंर्गत बदली संदर्भात* *विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरणेसंदर्भात आजचा मार्गदर्शक व्हिडीओ पहा...


❇️ *जिल्हातंर्गत बदली संदर्भात*
*विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरणेसंदर्भात आजचा मार्गदर्शक व्हिडीओ पहा....👇*

जिल्हातंर्गत बदली संदर्भात* *विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरणेसंदर्भात आजचा मार्गदर्शक व्हिडीओ पहा...


❇️ *जिल्हातंर्गत बदली संदर्भात*
*विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरणेसंदर्भात आजचा मार्गदर्शक व्हिडीओ पहा....👇*

Monday, December 19, 2022

मी उदगीरकर, उदगीरकर असल्याचा सार्थ अभिमान. बालपणातील उदगीर च्या आठवणी






मी उदगीरकर , उदगीरकर असल्याचा सार्थ अभिमान. बालपणातील उदगीर च्या आठवणीमी

*दोस्तांनो आपला गावच बरा* 

किल्ला वेस ओलांडून पुढे गेल्यावर शारवाल्याचं जाळीच्या खिडकीतून डोकावून सामान देणार दुकान, शेटकारच घर ओलांडून पुढे मार्गस्थ झालो की नजरेत भरणारा भुईकोट किल्ला म्हणजे जिवंत इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेला उदगीरचा भक्कम आधार.. किल्ल्यात प्रवेश करुन उदागीर बाबांचं दर्शन घेऊन एक फेरफटका मारत बाहेर पडलो की १७६० मध्ये सदाशिवरावानी निजामाला दिलेली शिकस्त आठवून मान ताठ होऊन जाते.. परत किल्ला वेस ओलांडून पुढे दिसणारा अष्टकोनी चौबारा.. उजव्या बाजूला ढेप्याचं किराणा दुकान आणि डाव्या बाजूला रंगवाळचं औषधी दुकान.. रंगवाळच दुकान निडेबन रोडने पुढे मार्गस्थ झालो की उजव्या हाताला गल्लीत हावगीस्वामी महाराज मठ.. सरळ पुढे गेल्यास अगी बसण्णा... जानेवारी महिना जत्रा भरली की दिवसभर तिकडे धुळीत भटकत उंडे खाण्यासाठी घरी किराणा आणतांना वेगळे काढलेल्या ५ पैसे १० पैसे चाराणे अशी नाणी उपयोगी पडायची.. शंकर ढेप्याच्या दुकानासमोरुन पुढे मार्गस्थ झालो की डाव्या हाताला शंकरेप्पा महाराज मठ... मग सराफ लाईनचे दिवसभर तुडुंब गर्दी असलेले व रात्री आमची वाट पहात असणारे कट्टे.. चिल्लरगे गल्लीतून येताजाता केव्हातरी आमाटे असे ओरडत धूम ठोकण्याचा आनंद काही औरच होता.. 
     आर्य समाज उदगीर मध्ये जवळून पाहता आला.. हनुमान कट्टा, लक्ष्मी नारायण मंदिर, साईबाबा मंदिर, बोधनची आई, रोकडे हनुमान,जुने बालाजी मंदिर आणि शहरालगत असलेल्या सोमनाथपूर मधील सोमनाथ मंदिर, भवानी माता मंदिर, कुंड हे सगळे वैभव आपल्या उदगीरचे.. 
     बंगाली कोणी पाहीला नाही पण त्याची चर्चा आणि भय सगळ्यांना होते.. मखमल बावडी, पेठ वेशीच्या बाहेरील विहीर, किल्ल्यातील विहीर, घोडदरा हे मनसोक्त अनुभवलेले ऐश्वर्य.. अंजय्याच्या पेढीवर होणाऱ्या गर्दीची चर्चा, उषा टाॅकीज बांधकाम सुरू असताना मारलेल्या चकरा आणि पहीला पिक्चर जय संतोषी माॅं पाहील्याच आवर्जून सांगतात ते उदगीरकर.. फडकर लाईनला जाऊन निकृष्ट दर्जाचे सामान आणून सुध्दा खूप चांगले आहे हे सांगायला न विसरणारे आपण.. उदय टाॅकीज, उषा टाॅकीज च्या दरवाज्याच्या फटीतून चोरुन पिक्चर बघायला मिळणार याचा आनंद.. इंटरव्हल मधला पास घेऊन निघून जायचे आणि दुसऱ्या दिवशी येणारा नवीन पिक्चर इंटरव्हल नंतर तो पास वापरून बघण्याचा आनंद.. आहाहा... नवीन पिक्चर येणार म्हणून आगामी आकर्षण असं लिहून लावलेल्या काचेतील प्रिंट तासनतास बघत बसण्याची झुंबड.. आनंदभुवनचा कच्चा चिवडा, अजिंठा मधील गुलाबजाम, लकी मधील काॅफी, राजेश्वरी हाॅटेलमधील थाटमाट, काॅर्नर ची केटी,पस्तापुरेच्या हाॅटेलमधली पुरी भाजी, अंजय्याच्या शेजारी दाळवं विकणारी म्हातारी, छछैंछैंछैं म्हणत चिवडा विकणारा मठातील माणूस, तोडमोडीवर बर्फी विकणारा काळा माणूस,चौबाऱ्याला सेकड्याच्या मापाने आंबे विकणारे डाल घेऊन बसणारे शेतकरी हे वैभव अनुभवणारे आपण उदगीरकर.. डॉ. मुंगीकर, मध्वरे, घनपाठी, लोहारकर,कोटलवार, वैद्य हे तत्कालीन जिवनदाते.. रिगल टेलर,जुगनू टेलर, हाशमी टेलर, बाॅबी टेलर हे मान्यवर कपडे शिवून देणारे व्यक्तिमत्त्व... त्यात जुगनू टेलरच्या मालकाचे बेल बाॅटम आणि दुकानात असलेली घार, लैला मजनू मधील ऋषी कपूर सारखी वेशभूषा करून थाटात वावरणारा बाॅबी टेलर.. बारीक आवाजात बोलत साड्या रंगवून देणारा व्यावसायिक..
     चौबारा ते पेठ वेस .. तळवेस.. निडेबन वेस... पोलिस ठाण्याच्या अलिकडील वेस.. या मुळ उदगीरचे रहिवासी आणि देगलूर रोड,नयी आबादी,बिदर रोड, शाहू काॅलनी, नांदेड रोड या भागातील रहिवासी यांच्यात बराच फरक होता.. नयी आबादी भागातील रहिवासी उच्चभ्रू वर्गातील आहेत असे समजले जायचे.. पण जे जुन्या उदगीरला उदगीर कळले ते आजही बाहेर राहणाऱ्या लोकांना समजले नाही.. 
     भगवान सिंह गुरुजींचं इंग्रजी जेवढं भिंतीला कळले तेवढं आम्हाला अजूनही स्पष्ट झाले नाही.. पटणे सरांनी सतत काॅलर धरुन शिकवलेल्या गणीताची सर साखरे सरांच्या ट्यूशन मध्ये आली नाही कधीच... आपल्याकडे संग्राम शाळेचे तज्ञ, श्यामलालचे आर्य समाजी, विद्यावर्धिनीचे पाटलं आणि लाल बहादूरचे चाकोरीबद्ध सोवळ्या आविर्भावात जगणारे सर्वमान्य उदगीरकर भरपूर आहेत.. शिवाजी काॅलेजमधून राजकारण शिकलेले, उदयगिरी मधून उच्च शिक्षण घेऊन पुढे नामवंत झालेले, हावगीस्वामी मधून बाहेर पडून वाणिज्य तज्ञ म्हणून नावारूपाला आलेले आणि श्यामलाल चा टेंभा मिरवत जगणारे भरपूर मान्यवर आहेत.. 
     पण मित्रांनो त्या वेळी जे शैक्षणिक कौशल्य उदगीर मध्ये होते ते महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण होते.. विलासराव बाभळगाव ऐवजी उदगीर तालुक्यातील असते तर उदगीर जिल्ह्यातील लातूर हा एक तालुका म्हणून ओळखला गेला असता.. रेल्वे स्टेशन,बसस्टॅन्ड हे फिरायला जायचे महत्वपूर्ण ठिकाण होते.. अखिल भारतीय पशु प्रदर्शन हे पशुंसाठी नव्हतेच मुळी, ते दैनंदिन उत्सवाचं ठिकाण होतं.. काॅलेजमध्ये दांडी मारायची अन् पशुप्रदर्शन स्थळी घाणेरड्या वासाचा आस्वाद घेत उत्साहात भटकत रहायचे.. प्रगती टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन टायपिंग शिकणारी मंडळी साधारण समजले जायचे.. 
     पाडव्याला किल्ल्यात, श्रावणी सोमवार सोमनाथपूरात, नवरात्र सोमनाथपूर आणि बोधनच्या आईला असे अगदी वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जपणारी माणसे उदगीरची.. आंध्र कर्नाटक मधून रेल्वेने आलेल्या तांदूळाची वाहतूक आणि त्यांना पकडून मांडवली करणारे रक्षक मन लावून पहात होतो तेव्हा.. उधारी खात्यावर चालणारे सगळे व्यवहार.. अगदी सराफ ते चर्मकार बांधवापर्यंत... किरकोळ खरेदी करताना अंगावर खेकसणारे नामवंत सावकार... आहाहा सगळं लय भारी... (क्रमशः)
    .... उदगीरचा मी

Sunday, December 18, 2022

वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रिक कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय. दिनांक 10 जून 2019

वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रिक कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन  सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय. दिनांक 10 जून 2019
⬇️

Saturday, December 17, 2022

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अतित्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतन वाढीची रक्कम अदा करण्याबाबत शासन आदेश दिनांक -१५/१२/२०२२👇

*शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अतित्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतन वाढीची रक्कम अदा करण्याबाबत शासन आदेश दिनांक -१५/१२/२०२२👇*



शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अतित्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतन वाढीची रक्कम अदा करण्याबाबत शासन आदेश दिनांक -१५/१२/२०२२👇

*शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अतित्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतन वाढीची रक्कम अदा करण्याबाबत शासन आदेश दिनांक -१५/१२/२०२२👇*



निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान बाबत

निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान बाबत
⬇️

Thursday, December 15, 2022

15( पंधरा) डिसेंबर 2022 पासून जेईई मेन्स चे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. काही महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे




विद्यार्थी मित्रांनो 

अपेक्षित वेळेनुसार आज  पंधरा डिसेंबर पासून जेईई मेन्स चे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. काही महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे

ऑनलाइन अर्ज भरणे - *15  December ते 12 January2023*

 परीक्षा शुल्क भरणे  - *15  December ते 12 January 2023*


ऍडमिट कार्ड डाउनलोड करणे - *जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात*


परीक्षेच्या तारखा- *24 ते 31 जानेवारी 23* 

जेईई ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक खालील प्रमाणे

https://examinationservices.nic.in/jeemain23/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFVj34FesvYg1WX45sPjGXBr0Q5J+bY568shjFzDVpD98

➖➖➖➖➖➖➖➖➖

Saturday, December 10, 2022

Astronomy Club संदर्भात सविस्तर माहिती

Astronomy Club संदर्भात माहिती



अॅस्ट्रानाॅमी क्लब समिती 




अॅस्ट्रानाॅमी क्लब खोलीची रचना 
विविध उपयुक्त पोस्टर्स  










































अॅस्ट्रानाॅमी क्लब खोलीतील साहित्य व घ्यावयाचे विविध उपक्रम 



















अॅस्ट्रानाॅमी क्लब खोलीतील साहित्य व उपयुक्त website व विविध पुस्तके 






विविध उपयुक्त पुस्तके