Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, December 30, 2022

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार बोर्डाची परीक्षा


*दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार बोर्डाची परीक्षा*

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.

राज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी-बारावीची परीक्षा घेतली जाते. मंडळाने याआधी 19 सप्टेंबर 2022 रोजी लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करुन त्यावर 15 दिवसांत सूचना करण्याचे आवाहन केले होते. या सूचनांनुसार दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
येथे पाहा अंतिम वेळापत्रक –


HSC exam time table(general side) 
⬇️

HSC exam time table (vocational side) 
⬇️


दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक दिले जाणार आहे. मंडळाकडून शाळांना दिल्या जाणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच पेपरच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
-----------------------------

No comments:

Post a Comment