Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, November 8, 2022

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम





मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम* 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातर्गंत नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी करण्याचा व नविन मतदारांनी नाव नोंदणी करण्याचा उपक्रम तसेच मतदार यादीतील नोंदीला आधार क्रमांक जोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
एकत्रीकृत प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी ९ नोव्हेंबर, 
दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, 
मतदार नावनोंदणीसाठी चार विशेष शिबिरे - १९ व २० नोव्हेंबर तसेच शनिवार ३ व ४ डिसेंबर,
१० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा मतदार यादी वाचन व नोंदणी, 
१२ व १३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांच्यासाठी विशेष शिबीर, 
२६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबीरे, 
२६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी, 
५ जानेवारी २०२३ अंतिम मतदार यादी प्रसिद्धी.

No comments:

Post a Comment