Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, February 2, 2023

शिक्षण क्षेत्रातील तंत्रस्नेही मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे- रामराव टाळीकोटे संपादक अग्रो इंडिया देवणी जि.लातूर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लिहलेला लेख

शिक्षण क्षेत्रातील तंत्रस्नेही मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे

-----------------------
ज्या देशाची शिक्षण व्यवस्था उत्कृष्ट त्या देशाचा विकास भरघोस..!! आसतो कारण विकासाचा दर तेथील साक्षरतेवर मोठ्या प्रमाणावर आवलंबून आसतो.तर शिक्षणाची मदार ज्यांच्या खांद्यावर आसते तो घटक म्हणजे शिक्षक होय.. शिक्षक हा देशाची ख-या आर्थानी उभारणी करत आसतो म्हणजेच रियल हिरो आसतो परंतु हाच हिरो शासणाच्या अनेक योजनांमध्ये आडकत चाललाय परंतु याला आज ही काही शिक्षक व मुख्याध्यापक काही ही झाले तरी आपल्यातील शिक्षक कायम जागा ठेवण्याचे काम या शिक्षकी पेशाने केले आसल्याचे जाणवत आसते त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हंटले तर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे हे शिस्तप्रिय व्यक्तीमत्व आहेत. शिस्त,क्षमा,कर्तव्य असा काहीसा अर्थ लावला जातो. 
       आज शिक्षकी पेशाचा विचार केले आसता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचे दिसते. तरीपण काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक आजही त्या अर्थाला अनुरूप राहून आपली सेवा बजावताना दिसतात.त्यापैकीच  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे हे एक होत. विद्यार्थी हेच आपले दैवत आणि शाळा हेच आपले मंदिर समजून गेल्या २५ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे ते कार्य करीत आहेत. 
आदर्श शिक्षक व उत्कृष्ट मुख्याध्यापक आसलेले ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी उदगीर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. बी.ए.डी. एड.पर्यंत शिक्षण घेतलेले ज्ञानेश्वर बडगे हे प्रथम दि.२१ जुलै १९९७ रोजी परभणी जिल्ह्यातील कसर  ता. जिंतूर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर लातूर जिल्ह्यातील अंबानगर ता. देवणी येथील जि.प.प्रा.शाळेवर शिक्षक तद्नंतर मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनतर जि.प.प्रा.शाळा संगम ता.देवणी, रावणगाव नवीन वसाहत ता.उदगीर, बोळेगाव ता.शिरूर अनंतपाळ त्यांनतर दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ येथे शिक्षक तद्नंतर मुख्याध्यापक म्हणून सेवेत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून श्री.बडगे सर हे विद्यार्थी हेच आपले दैवत मानून प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.नियोजन बध्द अभ्यासक्रम भिंतीवर लिहून भिंती बोलक्या केल्या.अनेक ठिकाणच्या शाळा रंगरंगोटी केल्या. सध्या लातूर जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनवजी गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रमाची निर्मिती हा प्रयोग चालू आहे तो प्रयोग मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यापूर्वीपासून अंबानगर, संगम, रावणगाव नविन वसाहत या शाळांवर बाला उपक्रमांतर्गत सर्व उपक्रम राबविले. विद्यार्थी संस्कारित होण्यासाठी नितीमुल्याचे शिक्षण परिपाठातून देणे, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेची वर्ग शाळेत घेवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनविले. निसर्ग शाळा, सहल, महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजऱ्या करणे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणे, महिला मेळावा, आदर्श मातांचा सत्कार, किशोरी मेळावा, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळा अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी घडविले.कोरोना काळातही ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.

     सदगुणी माणूस सतकार्य करीत राहिला की त्याची कोणी ना कोणी नोंद घेतो. त्या प्ररमाणे श्री.ज्ञानेश्वर बडगे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक संस्थांनी सन्मानीत केले.आसून लातूर जिल्हा परिषेदेचा २०१९ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे येथील राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, नाशिक येथील राष्ट्रीय समता फेलोशिप पुरस्कार, औरंगाबाद येथील राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. ना.य. डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्राच्या वतीने मुंबई च्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार, काव्यमित्र संस्था पुणेचा राष्ट्रीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि.उस्मानाबादचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री.जयभवाणी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझनी ता.पंढरपूर जि.सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, मानव विकास सेवा राज्यस्तरीय पुरस्कार लातूर, संत गाडगेबाबा आदर्श शिक्षक पुरस्कार ओतूर पुणे असे एकूण ३० पेक्षा जास्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. जीवनात आई-वडीलांना आदर्श मानणाऱ्या मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर बडगे याना भविष्यात संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचा मानस आहे.सुसंस्कृत समाज निर्मिती मध्ये मोठे योगदान देणारे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना सहज व दर्जेदार शिक्षण देऊन ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांचा मुलगा मोठा साहेब झाला पाहिजे.. हजारो वर्षापासून शिक्षणाची दारे बंद आसलेल्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे.. जिवनामध्ये कधीच हार न माननारे विज्ञानावर भर देऊन जिवनन्नौती घडवण्यासाठी सदा सर्वदा परिश्रमाला महत्त्व देणारे प्रगतशील भारताच्या इतिहासातील प्रगतीची चाहूल पहानारे  हरहुन्नरी व्यक्तीमत्व आसले विद्यार्थी प्रिय शिक्षक,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे आज त्यांचा वाढदिवस आसून या ज्ञानवंतास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


          - बालाजी रामराव टाळीकोटे
               संपादक अग्रो इंडिया
                 देवणी जि.लातूर


No comments:

Post a Comment