Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, March 8, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार*

तिवटग्याळ - तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 8/3/2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या महिला उपसरपंच आरती तवर व प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, सत्यभामा साळुंके, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले मंदाकिनी पाटील, आशा पाटील, गीता कच्छवे आदी जण उपस्थित होते.प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते   पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या गावातील कर्तुत्ववान व आदर्श महीलांचा सत्कार  करण्यात येणार आहे असे सविस्तर सांगितले.  मूख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सांगितली. तसेच आज कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे असे सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व महिलांना बालसंगोपन, शिक्षणाची गरज व आवश्यकता, स्त्रि पुरुष समानता. महिला सक्षमीकरण, नैतिक मूल्ये, संस्कार, आई म्हणून पालकांची जबाबदारी, कौंटुबिक नातेसंबंध व जिव्हाळा,कालची व आजची स्त्रि, कुटुंब पद्धती या विषयावर सविस्तर माहिती दिली. उपस्थित सर्व महिलांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले, महीला सक्षमीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच मूलांना चांगले संस्कार द्यावे असे सांगितले. तद्नंतर तिवटग्याळ गावातील कर्तुत्ववान महीलांचा सत्कार करण्यात आला या मध्ये  उपसरपंच आरती तवर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले,  आशा पाटील, गीता कच्छवे आदी कर्तुत्ववान महीलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. या कर्तुत्ववान महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.

































































No comments:

Post a Comment