“ती आहे म्हणून….
सारे विश्व आहे !
ती आहे म्हणून….
घराला घरपण आहे !
ती आहे म्हणून….
सुंदर नाती आहेत !
आणि ती आहे म्हणून….
नात्यांमध्ये प्रेम आहे” !
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों….
सर्वांना माझा नमस्कार !
सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी व लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !
दरवर्षी ८ मार्च हा दिवस आपण ‘जागतिक महिला दिन’ म्हणून उत्साहात साजरा करतो. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करने व सुरक्षितता इ. मागण्या करून निदर्शने केली. स्त्रियांनी स्वत:च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता.
हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो. स्त्री ला अनेक नाती जोपासावी लागतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती आपल्या जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.
नारी हीच शक्ती आहे नराची…
नारी हीच शोभा आहे घराची !
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. पण तरीही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्त्री ने आत्मनिर्भर बनले पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे स्त्री च्या हातात आहे. स्त्री सन्मानाची सुरवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. माझ्या आयुष्यामधील सर्व महिला वर्गाला माझे शतश: नमन !
धन्यवाद !
ती आई आहे, ती ताई आहे
ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे
ती पत्नी आहे, ती सून आहे
ती सासू आहे, ती आजी आहे
पण याआधी ती एक स्त्री आहे,
जिचा आम्हांला अभिमान आहे ….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार !
आज ८ मार्च ! जागतिक महिला दिन ! प्रथम, सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.
याच दिवशी १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ तसेच स्त्रीशक्तीचा जागर करणेसाठी महिला दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो. महिला व पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे हे मोठे उद्दिष्ट महिला दिन साजरा करण्यामागे आहे.
आज स्त्रीचे कार्यक्षेत्र फक्त ‘चूल व मूल’ इतकेच मर्यादित राहिले नाही. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्येही तिने आपली सक्षमता सिद्ध केली आहे.
स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, लहानग्याला पाठीशी बांधून रणांगणावर लढणाऱ्या बहादुर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, पहिल्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अनाथ दीनांची माय सिंधुताई सपकाळ आणि आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी झटणारी प्रत्येक स्त्री या सर्वांनी बिकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे.
आज स्त्री पुरुषाच्या खांदाला खांदा लावून कार्य करीत आहे. स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. सर्व क्षेत्रात प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. अशा या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा !
नारी तू घे अशी उंच भरारी,
गर्व करेल तुझ्यावर दुनिया सारी….
धन्यवाद ! जय हिंद !
वार नाही तलवार आहे…..
ती समशेरीची धार आहे,
स्त्री म्हणजे अबला नाही…..
ती तर धगधगता अंगार आहे !!”
आज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व तमाम महिला भगिनींनो,
सर्वांना माझा नमस्कार !
शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते.
“ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला…..
ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली,
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला…..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला…..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला ! ”
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !
दरवर्षी ८ मार्च हा दिवस आपण ‘जागतिक महिला दिन’ म्हणून उत्साहात साजरा करतो. आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे.
इतिहासाची पाने चाळली तर….. 6 मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करने व कामाच्या जागी सुरक्षितता इ. मागण्या करून निदर्शने केली. स्त्रियांनी स्वत: च्या हक्कांसाठी दिलेला हा पहिला लढा होता.
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.
नारी हीच शक्ती आहे नराची…..
नारी हीच शोभा आहे घराची !!
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. पण तरीही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्त्री ने आत्मनिर्भर बनले पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे स्त्री च्या हातात आहे.
स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. पुरुषा पेक्षा आणि पुरुषा शिवाय पण महिला समर्थपणे नाही तर त्याच्यापेक्षा उत्तमरित्तीनं कुटुंब चालवतात हे मी स्वत: बघितले आहे, खरच अशा महिलांकडे पाहिलं की ले आहे, खरच अशा महिलांकडे पाहिलं की मनात वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य झाल आहे व होत आहे. शेवटी एवढेच म्हणेन…
स्त्री म्हणजे वात्सल्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कर्तृत्व…!
धन्यवाद ! माझ्या सर्व महिला भगिनींनो….
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
No comments:
Post a Comment