Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, May 30, 2023

शालार्थ आय.डी नसलेल्या उमेदवारांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे


*⛔शालार्थ आय.डी नसलेल्या उमेदवारांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.*

*⭕नोंदणी लिंक*

*⭕पात्रता निकष*

*⛔मार्गदर्शक व्हिडीओ*

*⭕३१ मार्च २०२४ रोजी १२ व २४ वर्ष सेवा पूर्ण झालेले शिक्षक हे प्रशिक्षण करू शकतील*

*⭕प्रशिक्षण नोंदणी २९ मे २०२३ ते १२ जून २०२३*
*अधिक माहितीसाठी* 
👇


वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४.५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे-

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या 
या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.


३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले

प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. ४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०१३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक

नोंदणी दिनांक २९ मे, २०१३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल. ५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर


या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील. ६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत


गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)

गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)

गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)

गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)

७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.


८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.

९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या


प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.


११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.

१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय.डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.

१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “माहितीत बदल करा” या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in/
 या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण. मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.

१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.

१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२१. नोंदणी केलेल्या शिक्षकाचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.

२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in/
हे संकेतस्थळ पहावे.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा..

१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४ २.

श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९६



Monday, May 29, 2023

वरीष्ठवेतनश्रेणी व निवडश्रेणी नियमावलीसाठी प्रशिक्षण लिंक भरणे सविस्तर माहिती



प्रशिक्षण रजिस्ट्रेशन लिंक 
⬇️⬇️



वरीष्ठवेतनश्रेणी व नियमावलीसाठी प्रशिक्षण लिंक भरणे सविस्तर माहिती 
Download here to click 
⬇️⬇️

https://drive.google.com/file/d/1v8Og8N5X8vBNJeLMztyI1-PzM6uHmt77/view?usp=drivesdk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*विषय:- ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी करणेबाबत....*


उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४, ५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे-

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://raining sceramaha.ac.in या संकेतस्थळास

भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.raa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले
प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले

प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे, २०१३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल..

५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर

या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे) 

गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)

गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे) गट

 क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)

७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन
पोर्टलवर "शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी" हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.

९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा. १०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर येतील. ११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची

पडताळणी केली जाईल.

१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल

आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल

आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.

१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल. १४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ

https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. १५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील- इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट/ डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क - ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.

१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.

१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

२२.शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ/ निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.

२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

वरीष्ठवेतनश्रेणी व नियमावलीसाठी प्रशिक्षण लिंक भरणे सविस्तर माहिती





वरीष्ठवेतनश्रेणी व नियमावलीसाठी प्रशिक्षण लिंक भरणे सविस्तर माहिती 
Download here to click 
⬇️⬇️

https://drive.google.com/file/d/1v8Og8N5X8vBNJeLMztyI1-PzM6uHmt77/view?usp=drivesdk

Sunday, May 28, 2023

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत.


शालेय विद्यार्थ्यास एका जिल्ह्यातून अथवा राज्यातून, दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यातील शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास तसेच CBSE / ICSE / IGCSE / IB या मंडळातील शाळांतील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा झाल्यास अथवा राज्य मंडळाशी संलग्नित शाळेतून अन्य मंडळाशी संलग्नित शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास, सध्या प्रचलित असलेल्या कार्यपध्दतीनुसार, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (प्रमाणपत्रावर ) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक आहे. ही पध्दत केवळ ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना दाखले दिले आहेत, ती शाळा अधिकृत व मान्यताप्राप्त आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी होती.

शासन निर्णय दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ अन्वये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नमुना सुधारित करण्यात आला असून यामध्ये शाळा मान्यता क्रमांक तसेच युडायस क्रमांक यांचा उल्लेख असल्यामुळे शाळांच्या अनधिकृततेचा प्रश्न निकालात निघाला आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला हा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केला असल्यामुळे त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरीची गरज नाही. हे लक्षात घेवून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची उपरोक्त नमूद पध्दत बंद करण्यात येत आहे. हा शासन निर्णय सर्व माध्यम व सर्व • व्यवस्थापनांच्या शाळांना लागू राहील.




Saturday, May 27, 2023

बारावी पुरवणी परीक्षा अर्ज 29 मे 2023 पासून सुरुवात | 12th Supplementary Exam Application Start 29 May 2023

बारावी पुरवणी परीक्षा अर्ज 29 मे 2023 पासून सुरुवात | 12th Supplementary Exam Application Start 29 May 2023





*बारावी पुरवणी परीक्षा अर्ज सुरुवात | 12th Supplementary Exam Application Start*

•  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे- ४ जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने २९ मे २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.

परीक्षा अर्ज-खालील दिलेल्या बोर्डाच्या वेबसाईटवर शाळा मार्फत आवेदनपत्र भरावे

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 अपडेट

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 अपडेट.

शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.

सदर प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर तसेच पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रासाठी होणार आहे. 

विद्यार्थ्यांना मॉक डेमो रजिस्ट्रेशन म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक डमी फॉर्म भरणे बाबत सराव करण्यासाठी दिनांक 20 मे 24 मे 2023 पर्यंत मुदत असणारा आहे.

विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक भरणे अर्ज प्रमाणित करणे व्हेरिफाय करून घेणे यासाठी दिनांक 25 मे 2023 पासून राज्य मंडळ इयत्ता दहावीचा निकाल लागेपर्यंत मुदत असणार आहे.विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणे म्हणजेच प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी राज्य मंडळ इयत्ता दहावीचा निकालानंतर सुरू होणार आहे त्यासाठी साधारणपणे पाच दिवस वेळ दिला जाईल.

संपूर्ण माहितीसाठी पुढील परिपत्रक वाचावे.
Download here to click
⬇️⬇️



Wednesday, May 24, 2023

HSC Results 2023 today at 2 pm.

HSC  Results 2023 today at 2 pm. 




आज दिनांक 25/5/2023 रोजी दुपारी दोन वाजता जाहीर होणार इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल! 

 जाहीर झाल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. 
खालील दिलेल्या वेबसाईटला निकाल पहा 
⬇️⬇️




➖➖➖➖➖➖➖➖➖

आंतर जिल्हा बदली 2023 बदली धोरण G. R. 23/5/2023


Download here to click G. R. 
⬇️⬇️


क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्रस्ताव सन 2022 - 2023 आनलाईन सादर करणे बाबत





क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुण गौरव पुरस्कार प्रस्ताव सन 2022 - 2023 आनलाईन सादर करणे बाबत
Download here to click 
⬇️⬇️


Monday, May 22, 2023

वरिष्ठ वेतनश्रेणी/निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण 2023 नोंदणी अपडेट



वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रसिद्ध संदर्भात शिक्षण अधिकारी माध्यमिक नागपूर यांनी दिनांक 19 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्रामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे.सदर पत्रात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या 2021 मधील परिपत्रकाचा संदर्भ देऊन सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांनी निर्गमित केले आहे.सदर परिपत्रकानुसार या अगोदर प्रशिक्षण पूर्ण झालेली आहेत. परंतु यावर्षीच्या प्रशिक्षणा संदर्भात अद्याप विद्या परिषदेने कोणत्याही सूचना निर्गमित केलेल्या नाही. फक्त एका परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे की या आठवड्यात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.2023 मधील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अद्याप कोणतीही यावर्षीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याबाबत अधिकृत असे पत्र निर्गमित केलेले नाही.जर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिपत्रक निर्गमित केले तर आपल्याला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून लगेच सुचित करण्यात येईल.


Download here to click 
⬇️⬇️





HSC and SSC Results 2023 Update

 HSC and SSC Results 2023 Update 

या दिवशी जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल! 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना व पालकांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून आता सर्वांना महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. परंतु आता लवकरच दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याचे संकेत खुद्द अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून इयत्ता बारावीचा निकाल येत्या 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, दुसरीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर र्बोर्डाकडून निकालाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. 
खालील दिलेल्या वेबसाईटला निकाल पहा 
⬇️⬇️




➖➖➖➖➖➖➖➖➖


इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना बालभारती पुस्तके download link

इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना बालभारती पुस्तके 


*आपल्याकडे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत ची बालभारती पुस्तके नाहीत? मग आपल्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात वर्ग पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके डाऊनलोड करा ई-बालभारती वरून.*👇🏻

Download here to click 
⬇️⬇️







Saturday, May 20, 2023

अनुकंप तत्त्वावर नोकरी या विषयावर सविस्तर माहिती G. R.


अनुकंप तत्त्वावर नोकरी या विषयावर सविस्तर माहिती G. R. 
Download here to click 
⬇️⬇️





दिव्यांगाचे(अपंगत्व) 21 प्रकार कोणते ते पहा सविस्तर माहिती

दिव्यांगाचे 21 प्रकार 




*दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार*

*(१) पूर्णतः अंध - (Blindness)*
• दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे,
• डोळे जन्मतः बंद असणे.
• हालचाल करताना अडचणी येतात.

*(२) अंशतः अंध - (Low Vision)*
• सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे.
• दूरचे/जवळचे कमी दिसणे.
• पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात.
• उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे.

*(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)*
• कोणताही आवाज ऐकू न येणे,
• कमी ऐकू येणे,

*(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)*
• अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे.
बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात.
• जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे.
टाळूला छिद्र असणे.
• clept palete.

*(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)*
• ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे
म्हणतात.
हालचाल करण्यास अक्षम.
सहज दिसणारे अपगत्व,

*(६) मानसिक आजार - (Mental Illness)*
• असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन,
• खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे.
भयानक स्वप्न पडणे.
भ्रम आभास असतो.
• कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.

*(७) अध्ययन अक्षमता -(Learning Disability)*
• वाचन, लेखन, गणितीय क्रियांत अडचण .
आकलन करण्यास अवघड जाते.
| अंक ओळखण्यात गोंधळ, अक्षर उलटे लिहणे, शब्द गाळून वाचणे.
काही मुलांमध्ये वर्तन समस्या असतात.
• कमी संभाषण दिसून येते.
• बुध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो.
• विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात.

*(८) मेंदूचा पक्षाघात - (Cerebral Palsy)*
• हालचालींवर नियंत्रण नसते.
• अवयवांमध्ये ताठरता असते.
मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
• हालचालीची क्षमता कमी असते.

*(९) स्वमग्न - (Autism)*
स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
बदल न आवडणे, त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
खेळणी, वस्तू यांसोबत अधिक रमतात.

*(१०) बहुविकलांग - (Multiple Disability)*
• एक किंवा जास्त अपंगत्व असते.
• अशा ब-याच मुलांना चालताना, बोलताना, उभे राहताना, शि- श असे दैनंदिन कार्य करताना
समस्या असतात. (ADL)

*(११) कुष्ठरोग - (Leprosy Cured Persons)*
• हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.
• त्वचेवर चट्टे, काळे डाग असतात.
• हात, पाय, बोटे सुन्न पडतात.

*(१२) बुटकेपणा - (Dwarfism)*
• सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असते.

*(१३) बौधिक अक्षमता - (Intellectual Disability)*
• बौद्धिक क्षमता(IQ) ७० पेक्षा कमी असते.
• दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण जाते.
• तार्किक प्रश्न सोडवताना अडचणी येतात.
• नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी येतात.
• काही मुलांना वर्तन समस्या असतात.

*(१४) मांसपेशीय क्षरण - (Mascular Disability)*
• गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
• उभे होताना हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
० मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .

*(१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार - (Chronic Neurological Conditions)*
• मेंदूमध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.

*(१६) मल्टिपल स्क्ले रोसिस - (Multiple sclerosis)*
. हातापायातील स्नायूमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
• स्नायूमध्ये शिथिलता येते व स्नायू काम करणे कमी करतात.
• मलमूत्र क्रियांवरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.

*(१७) बॅलॅसेमिया - (Thalassemia)*
• रक्ताची कमतरता
वारंवार रक्त पुरवावे लागते.
• चेहरा सुकलेला असतो.
• वजन वाढत नाही.
• श्वास घेण्यात त्रास होतो.
• वारंवार आजारी पडतात.

*(१८) अधिक रक्तस्राव - (Hemophilia)*
० हा आनुवांशिक रक्तविकार आहे.
• रक्त वाहिन्यांतील बिघाडामुळे हा रोग होतो.
• यामध्ये रक्तस्राव होतो.
• जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो .
• कधी कधी रक्तस्राव थांबत नाही.
• रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.

*(१९) सिकल सेल - (Sickle Cell Disease)*
• रक्ताचे प्रमाण कमी असणे.
रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात.
• शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो.
• हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.

*(२०) अॅसिड अॅटॅक - (Acid Attack Victim)*
• अॅसिड अॅटॅकमुळे चेहरा, हात, डोळे यांवर परिणाम होतो.
• त्वचा भाजल्यासारखी दिसते.
• चेहरा विद्रुप होतो.

*(२१) कंपवात रोग - (Parkinson's Disease)*
• डोपामिन रेणूच्या अभावामुळे रोग्याला कंप सुटतो.
• हालचाली संथ होतात, स्नायू ताठर होतात .
• वजन कमी होत जाते.
• ५० ते ६० वयाच्या दरम्यान होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖

तिरुपती, पंढरपूर, अक्कलकोट व तुळजापूर देवदर्शन दौरा