Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 23, 2023

Income tax Deduction 2023-24 Update* - केंद्रिय अर्थसंकल्प २०२३ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी आकारणी वर्ष २०२४-२५ (३१.०३.२०२४)



Income tax Deduction 2023-24 Update* - केंद्रिय अर्थसंकल्प २०२३ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी आकारणी वर्ष २०२४-२५ (३१.०३.२०२४)

👉 *पगारी उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी*

*०१) घरभाडे भत्ता :* फलम १० (१३ ए) स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त परभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा परभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे पावती लागेल, तसेच घरमालकाचे पॅन क्रमांक ही यावा लागेल.

*०२) प्रमाणित वजावट :* कलम १६: प्रमाणित वजावट ₹ ५०,०००/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रकम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये बजावटीस पात्र आहे.

*०३) व्यवसाय कर:* कलम १६ (iii): प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.

*०४) घरबांधणी/खरेदीसाठी* घेतलेल्या कर्जावरील व्याजः कलम २४ (१) (vi): बँका/को-ऑप. बँका यांचेकडून घेतलेल्या दोन परासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला र २ लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्ज घरासाठी घेतले असल्यास र ३०,०००/- ची वजावट मिळेल.

*०५) गुंतवणूकीवरील वजावट (कलम ८० सी)* प्रॉ. फंड, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाबार्ड बाँड, शैक्षणिक फिज्, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, शेडयूल्ड / नॅशनल बँकेत ५ वर्षांकरिता केलेली मुदत ठेव. इ. मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याची उत्पन्नातून वजावट मिळते. ही मर्यादा र १.५ लाख आहे.
गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये ₹ १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक / खर्च करुन वजावट मिळवता येईल. ०५अ) (कलम ८० सीसीडी): कलम ८० सीसीडी (२) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या १४% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे, तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे १०% अंशदान हे कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.

*०६) वैद्यकीय विमा योजना (कलम ८० डी)* या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी 'मेडिक्लेम पॉलिसी' आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च (₹ ५,०००/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले / आई / वडिलांसाठी केलेली असेल तर ₹ २५,०००/- ची सुट मिळेल. 
तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तींचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर ₹ ५०,०००/- ची वजावट मिळेल. वरील दोन्ही प्रकारातील खर्च / हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत.

*०७) नॅशनल पेन्शन स्कीम:* कलम ८० सीसीडी (आयची) या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या ₹ ५०,०००/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.

*०८) उच्च शिक्षणासाठी* घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सुट (फलम ८० ई) स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल.

*०९) अवलंबून असणाऱ्या अपंग* व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक (कलम ८० डीडी) या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची यजावटीची मर्यादा र ७५,०००/- पर्यंत वाढविणेत आली आहे. अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर ए १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.

 *१०) अपंगत्व :* (कलम ८० यु): करदाता स्वतः ४०% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट र ७५,०००/- एवढी आहे. वरील कलमांतर्गत अपंगत्व है जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर र ७५,०००/- चे ऐवजी र १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.

*११) दीर्घ औषधोपचार लागणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी वजावट (कलम ८० डी.डी.बी.)* काही ठराविक रोगाच्या (मेंदूचे आजार, कैंसर, एडस्, हिमोफिलीया इ.) उपचारासाठी /पुनर्वसनासाठी करदात्याच्या उत्पन्नातून झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा र ४०,०००/- यापैकी जी रकम कमी असेल ती वजावटीस पात्र राहिल व ही सवलत मिळणेसाठी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या सज्जा डॉक्टरांचे सर्टिफिकेट व खर्चाचे पुरावे दरवर्षी यावे लागतील. विम्यापोटी किंवा मालकाकडून औषधोपचाराच्या खर्चापोटी काही रकम भरपाई म्हणून मिळाली असेल तर तेवढवाने ह्या कलमाखालील बजावट कमी होईल, आजारी व्यक्ती ६० वर्षावरील असेल तर ₹ १,००,०००/- वजावट मिळेल.

*१२) देणगीवरील सुट :* (फलम ८० जी): मान्यताप्राप्त सार्वजनिक / सामाजिक संस्था अथवा संघटना यांना दिलेल्या देणगीच्या ५०% रकम वजावटीस पात्र राहिल. देणगी एकूण पगाराचे (गुंतवणूक, पजा जाता) १०% पर्यंतच ग्राह्य धरली जाईल, तसेच र २,०००/- वरील देणगी ही रोखीने दिलेली असल्यास मान्य होणार नाही.

*१३) विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांवर मिळणारी सुट (८० इ.इ.बी.)* विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांसाठी करपात्र व्यक्तीनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्या व्यक्तीस आयकरात त्याने भरलेल्या व्याजाची ₹१,५०,०००/- पर्यंत सुट मिळेल. (कर्ज है १/४/२०१९ ते ३१/३/२०२३ या कालावधीत घेतलेले असावे.

*१४) बँक व्याज :* (कलम ८० टी.टी.ए.): सर्व बँकेतील बचत खातेवरील करदात्याला मिळणारे व्याज र १०,०००/- पर्यंत करमाफ केले असून ₹ १०,०००/- पेक्षा जास्त मिळणारे असे व्याज व सर्व बँकामधील ठेवींवर मिळणारे सर्व व्याज पगारात मिसळून आयकर गणना करावी लागणार आहे. १.४.२०२० पासून बँका / कंपन्यांकडून मिळणारा लाभांश (डिव्हीडंड) करपात्र करणेत आला आहे. (बँकेतील ठेवींवरील व्याज हे आपले पॅनवर ऑनलाईन दिसत आहे)

*१५) (कलम ८७ ए):* नवीन स्किममध्ये करपात्र उत्पन्न ७,००,०००/- चे आत असेल तर बसणारा आयकर किंवा ₹ २५,०००/- यापैकी कमी असलेली रकम सुट मिळेल, तसेच जुन्या स्किममध्ये करपात्र उत्पन्न ५,००,०००/- चे आत असेल तर र १२,५००/- पर्यंत आयकरामध्ये सूट मिळेल.

*१६) वेतन थकबाकी (Arrears)* मिळाली असेल तर सुट (Relief): कलम ८९ (१) : फॉर्म १० ई भरुन वरील कलमाखाली आयकर कमी होऊ शकतो,

*१७) आयकर फायम खाते क्रमांक (PAN)* (कलम १३९ ए) सुधारीत आयकर कायद्याप्रमाणे एकूण मासिक पगार र २०,८३३/- किंवा अधिक असेल व आयकर क्रमांक (पॅन) पेतला नसेल तर आयकर क्रमांक (पॅन) प्यावा लागेल. सदरचे सर्व काम आता युनिट ट्रस्ट/एन. एस. डी. एल. या खाजगी संस्थेकडे दिले असून त्यासाठी आता रंगीत फोटो २, आधार कार्ड व इतर माहिती लागेल. विवरण पत्र दाखल करणे बाबत कलम १३९ ए (१ ए): आकारणी वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०३३/२४) या ) १८ वर्षाकरिता ए २,५०,०००/- पेक्षा जास्ती उत्पन्न असणान्या सर्व व्यक्तींना (आयकर कपात असो वा नसो) विवरणपत्र आय. टी. आर.-१ फॉर्म मध्ये ३१ जुले पर्यंत सादर करावे लागेल. उशीरा विवरणपत्र दाखल केलेस (३१ जुलै नंतर) दंड र ५०००/- पर्यंत लागू शकतो. ५ लाखाचे वर उत्पन्न असाणाऱ्यांना विवरणपत्र ऑनलाईन (E-Filling) भरणे सक्तीचे केले आहे.

*१८) उद्गम कर कपात :* कलम १९२: सदर कलमान्वये मालकाने (Employer) प्रत्येक करपात्र व्यक्तीला वार्षिक आयकर किती बसतो ते काढून सदर बसलेला आयकर हा दरमहा सरासरीने १२ महिन्यामध्ये कपात करुन पगार झालेवर ७ दिवसांचे आत बँकेत चलनाने भरणेचा आहे. न भरलेस किंवा कमी भरणा झालेस उशीरासाठी दरमहा १.२५% व्याज भरावे लागेल, तसेच दरवर्षी अखेरीस एकूण कापलेल्या करासंबंधीचे प्रमाणपत्र फॉर्म नं १६ मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईनवर काढून प्रत्येक कर्मचाऱ्यास द्यावयाचे आहे.

*१९) तिमाही वेतन विवरणपत्र* (फॉर्म नं. २४ क्यू) पगारातून कपात केलेल्या आयकर कपातीचे विवरणपत्र त्रैमासिक करण्यात आलेले असून दर तिमाही विवरणपत्र फॉर्म नं. २४ फ्यू मध्ये तिमाही संपल्यावर ३० दिवसांचे आत म्हणजे दरवर्षी ३१ जुलै, ३१ ऑक्टोबर व ३१ जानेवारी पर्यंत दाखल करावे लागेल व शेवटचे तिमाही विवरणपत्र दाखल करणेसाठी अंतीम मुदत ३१ मे पर्यंतच राहिल. वरील सर्व विवरणपत्र दाखल करणेस उशीर झालेस विवरणपत्र दाखल करेपर्यंत कलमं २७२ ए प्रमाणे प्रतिदिन २००/- प्रमाणे फीज् भरुन विवरणपत्र सादर करावे लागेल.

*२०) शेअर्स व म्युच्युअल फंड* यांच्या विक्रीवरील भांडवली नफा हा आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून करपात्र केलेला असून असे झालेले सर्व व्यवहार आपल्या पॅनवर ऑनलाईन दिसत आहेत.

*वरील प्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता पगारदारांकरीता आयकराचे सर्वसाधारण नियम आहेत. वरील नियमांचा विचार करुन नियोजनबद्ध गुंतवणूक आताच केली तर बचत होऊन प्राप्तिकरही वाचेल व पुढे ऐनवेळेस होणारी धावपळही कमी होईल.*

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विषयातील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विषयातील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन*


*तिवटग्याळ - आज दिनांक 22/12/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शालेय परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीनिवास रामानुजन गणिती शास्त्रज्ञ यांचा जन्म दिवस आहे. या दिवशी त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तद्नंतर गणित विषयातील शैक्षणिक साहित्याची मांडणी करुन प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी गणित विषयातील भरविण्यात आलेल्या  सर्व साहित्याच्या प्रदर्शनाची माहिती सांगितली व त्या साहित्याचे दैनंदिन व्यवहारात व शालेय अभ्यासक्रमात दिलेल्या दाखले समजावून सांगितले. या राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन  पाहुन विद्यार्थी खुप आनंदी व उत्साहाने सहभागी झाले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*







































केंद्र प्रमुख मधुकर मरलापल्ले यांचा तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार

*केंद्र प्रमुख मधुकर मरलापल्ले यांचा तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार*

*तिवटग्याळ - तोंडार ता. उदगीर केंद्राचे केंद्र प्रमुख मा. मधुकर मरलापल्ले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे दिनांक 11/12/2023 रोजी अचानक शाळा भेट दिली. सर्व प्रथम केंद्र प्रमुख मा. मधूकर मरलापल्ले यांचा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील विद्यार्थाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर शालेय परीपाठ विद्यार्थ्यांनी  सादरीकरण इंग्रजी मध्ये पाहुन केंद्र प्रमुख मा. मधूकर मरलापल्ले यांनी विद्यार्थाचे कौतुक केले. परीपाठ इंग्रजी मध्ये सादर केला. परीपाठ सादर केलेल्या कु. रितीका पाटील, स्नेहा तोमर पाटील, गंगासागर बिरादार, प्रांजली कांबळे, मंदिरा साळुंके, गंगा बिरादार यांचे केंद्र प्रमुख मा. मधूकर मरलापल्ले यांनी अभिनंदन केले. भेटीत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तपासणी केली. शाळा परीसर, शौचालय, किचन शेड या बाबतीत स्वच्छता पाहुन  तसेच सर्व इयत्तेच्या विद्यार्थाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. या वेळी केंद्र प्रमुख मा. मधूकर मरलापल्ले यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या. एकंदरीत शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले*




Thursday, December 21, 2023

अंतिम निकाल पदवीधर/विषय शिक्षकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश

पदवीधर/विषय शिक्षकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश..!*✌️👍🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🙏
◆ *शासन निर्णय 13/10/2016 नुसार वेतनश्रेणी काढून घेण्याचे जालना, बीड व नगर जिल्हा परिषदचे सर्व आदेश औरंगाबाद (छ.संभाजीनगर) हायकोर्टाकडून रद्द. अन्यायकारक ऑर्डर पूर्वीची स्थिती पूर्वतत प्रदान करण्याचे दिले आदेश.*

कोर्टाने खालील मुद्दे मान्य केले...
◆ एकाच दिवशी नियुक्ती दिलेल्या पैकी केवळ सेवाजेष्ठ 33% शिक्षकांना वेतनश्रेणी देणे समान काम समान वेतन न्यायाशी सुसंगत नाही. त्यामुळे सर्व पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात काही गैर नाही. (Order Para 4)

◆ सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडण्याचा बराच प्रयत्न केला मात्र ते 33% शिक्षकांना वेतनश्रेणी देणे बाबतचा बचाव करण्यात कमी पडले. मात्र शेवटी शासनाने 27/6/2022 रोजी नेमलेल्या अभ्यास गटाचा मुद्दा त्यांनी पुढे आणला. तो मुद्दा कोर्टाने ग्राह्य धरून कोर्टाने अभ्यास गटाच्या अहवाल सादर करण्यासाठी मे 2024 पर्यंत मुदत दिली. ★ *( अर्थात हा मुद्दा आपल्यासाठी अडचणीचा नाही. कारण आपण केलेल्या पाठपुराव्याने अभ्यास गटाने आपला अहवाल शासनाकडे यापूर्वीच सादर केलेला आहे. फक्त शासनाने तो अद्याप स्वीकारलेला नाही.)*

◆ _सर्वात शेवटी कोर्टाने जिल्हा परिषदांनी काढलेले सर्व आदेश रद्द करत असल्याचे स्पष्ट केले व त्यापूर्वीची स्थिती कायम ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले. याचाच अर्थ अन्याय करणारे आदेश रद्द केल्यामुळे पूर्वीची स्थिती म्हणजे वेतनश्रेणी पूर्ववत बहाल करण्यात याव्यात असे कोर्टाने स्पष्ट केले._

एकंदरीत मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी संघर्ष समितीचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. 33% शिक्षकांना वेतनश्रेणी देण्याचा निर्णय कोर्टाने रद्द केलेला आहे. म्हणजे शासनाने नेमलेल्या समितीला राज्यातील सर्व पदवीधर विषय शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करावा लागेल हे स्पष्ट आहे. अर्थात हा लढा आपणास पुढील काळात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून मार्गी लावावा लागेल. त्यासाठी आमदार कपिल पाटील साहेब यांची आपणास मदत होईलच मात्र इतरही वेगवेगळ्या पद्धतीने आपणास शासनावर दबाव वाढवून शासन निर्णय पारित करून घ्यावा लागेल. मागील अनेक वर्षापासून आपण सर्व या विषयासाठी प्रयत्न करत आहोत. त्या सर्वांचे अभिनंदन..!
हा लढा असाच पुढे सुरू ठेवूया. निश्चितच आपणास यश मिळेल यात शंका नाही.
*लढेंगे.... जितेंगे*
धन्यवाद...! 

आपले 🙏

*देवेंद्र बारगजे (जालना)* 
*शिवाजी खुडे (बीड)*
राज्य समन्वयक  प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी संघर्ष समिती




Download here to click 
⬇️⬇️


https://drive.google.com/file/d/1321YNqyeiBwlop68kbl6-XIoBQLX1Xwf/view?usp=drivesdk

Sunday, December 17, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरविना शाळा या उपक्रमातून शिक्षण






















तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरविना शाळा या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 16/12/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आज शनिवार निमित्ताने दप्तरविना शाळा या उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना गणित या विषयातील एकक, दशक, शतक, हजार व दसहजार ही संकल्पना शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून रंगीबेरंगी वर्तुळाकार एकक साठी पांढरा रंग, दशक साठी गुलाबी रंग, शतक साठी पिवळा रंग, हजार साठी निळा रंग व दसहजार साठी जांभळा रंग या विविध रंगीबेरंगी वर्तुळाकार रकान्यात कोणत्याही वस्तू खडू चे टुकडे, गोट्या, खडे, चिंचुचे, आईस्क्रीम च्या काड्या अशा कोणत्याही एक वस्तु वापरुन या रंगीबेरंगी वर्तुळाकार मध्ये टाकणे. ज्या वस्तू रंगीबेरंगी विविध वर्तुळाकार रकान्यात  मध्ये पडल्यानंतर विद्यार्थ्यांना एकक, दशक, शतक, हजार व दसहजार या रकान्यात वस्तू मोजण्यासाठी सांगणे व त्या वस्तू अंक रुपात मांडणी करुन एकक, दशक, शतक, हजार व दसहजार या स्थानिक अंकापासून संख्या तयार करणे, संख्या अक्षरात लिहणे व अंकाची स्थानिक किमंत समजून घेणे या अशा विविध गणिती क्रिया या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थाना या दप्तरविना शाळा शैक्षणिक उपक्रमातून शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून एकक, दशक, शतक, हजार व दसहजार ही संकल्पना प्रत्यक्षात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी समजावून सांगितले. विद्यार्थी या उपक्रमांत खूप सक्रिय सहभागी व आनंदी दिसुन आले*

Thursday, December 14, 2023

केंद्रप्रमुख परीक्षे संदर्भात अजुन एक याचिका सेवा 3 वर्ष ग्राह्य धरावी

*केंद्रप्रमुख परीक्षे संदर्भात अजुन एक याचिका*
*सेवा 3 वर्ष ग्राह्य धरावी..
⬇️



लातूर जिल्हा परिषद अंतर्गत *गणित विज्ञान प्राथमिक पदवीधर पदोन्नती 19 डिसेंबर 2023 रोजी समुपदेशनाद्वारे संपन्न होणार आहे

लातूर जिल्हा परिषद अंतर्गत *गणित विज्ञान प्राथमिक पदवीधर पदोन्नती 19 डिसेंबर 2023 रोजी समुपदेशनाद्वारे संपन्न होणार आहे
Download here to click 
⬇️






Wednesday, December 13, 2023

तिवटग्याळ गावात विकसीत भारत अभियान रथयात्रेचे जंगी स्वागत


































तिवटग्याळ गावात विकसीत भारत अभियान रथयात्रेचे जंगी स्वागत*

*तिवटग्याळ - तिवटग्याळ येथे दिनांक 11/12/2023 रोजी सकाळी गावातील ग्रामपंचायत चावडी ठिकाणी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत राबविण्यात आलेल्या एकूण 29 लोक कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी विकसीत भारत रथ तयार केले असून या रथात डिजिटल स्क्रिनवर सर्व योजना दाखवले जात आहे तसेच या विकसित भारत रथासोबत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहुन गावातील सर्व नागरिकांना योजनांची माहिती दिली जात आहे. तिवटग्याळ गावात प्रथम विकसित भारत अभियान रथाचे स्वागत व उद्घाटन गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेब व गावचे सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्व नागरिकांना गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेबांनी या विकसित भारत अभियान रथाचे स्वागत करुन या अभियाना विषयावर सविस्तर माहिती दिली. तद्नंतर सर्व विभागाचे आरोग्य, कृषी, बॅंक, बचत गट, गॅस इत्यादी विभागांनी केंद्र सरकारने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. शिक्षण विभाग शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील केंद्र सरकारने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेब, सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर, ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, जयशिंग पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मधुकर मरलापल्ले, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लहान थोर मंडळी, गावातील महिला आदी जण उपस्थित होते*