Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, December 23, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विषयातील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित विषयातील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन*


*तिवटग्याळ - आज दिनांक 22/12/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शालेय परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीनिवास रामानुजन गणिती शास्त्रज्ञ यांचा जन्म दिवस आहे. या दिवशी त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तद्नंतर गणित विषयातील शैक्षणिक साहित्याची मांडणी करुन प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी गणित विषयातील भरविण्यात आलेल्या  सर्व साहित्याच्या प्रदर्शनाची माहिती सांगितली व त्या साहित्याचे दैनंदिन व्यवहारात व शालेय अभ्यासक्रमात दिलेल्या दाखले समजावून सांगितले. या राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन  पाहुन विद्यार्थी खुप आनंदी व उत्साहाने सहभागी झाले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*







































No comments:

Post a Comment