Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, December 17, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरविना शाळा या उपक्रमातून शिक्षण






















तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरविना शाळा या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 16/12/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आज शनिवार निमित्ताने दप्तरविना शाळा या उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना गणित या विषयातील एकक, दशक, शतक, हजार व दसहजार ही संकल्पना शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून रंगीबेरंगी वर्तुळाकार एकक साठी पांढरा रंग, दशक साठी गुलाबी रंग, शतक साठी पिवळा रंग, हजार साठी निळा रंग व दसहजार साठी जांभळा रंग या विविध रंगीबेरंगी वर्तुळाकार रकान्यात कोणत्याही वस्तू खडू चे टुकडे, गोट्या, खडे, चिंचुचे, आईस्क्रीम च्या काड्या अशा कोणत्याही एक वस्तु वापरुन या रंगीबेरंगी वर्तुळाकार मध्ये टाकणे. ज्या वस्तू रंगीबेरंगी विविध वर्तुळाकार रकान्यात  मध्ये पडल्यानंतर विद्यार्थ्यांना एकक, दशक, शतक, हजार व दसहजार या रकान्यात वस्तू मोजण्यासाठी सांगणे व त्या वस्तू अंक रुपात मांडणी करुन एकक, दशक, शतक, हजार व दसहजार या स्थानिक अंकापासून संख्या तयार करणे, संख्या अक्षरात लिहणे व अंकाची स्थानिक किमंत समजून घेणे या अशा विविध गणिती क्रिया या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थाना या दप्तरविना शाळा शैक्षणिक उपक्रमातून शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून एकक, दशक, शतक, हजार व दसहजार ही संकल्पना प्रत्यक्षात शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी समजावून सांगितले. विद्यार्थी या उपक्रमांत खूप सक्रिय सहभागी व आनंदी दिसुन आले*

No comments:

Post a Comment