तिवटग्याळ गावात विकसीत भारत अभियान रथयात्रेचे जंगी स्वागत*
*तिवटग्याळ - तिवटग्याळ येथे दिनांक 11/12/2023 रोजी सकाळी गावातील ग्रामपंचायत चावडी ठिकाणी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत राबविण्यात आलेल्या एकूण 29 लोक कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी विकसीत भारत रथ तयार केले असून या रथात डिजिटल स्क्रिनवर सर्व योजना दाखवले जात आहे तसेच या विकसित भारत रथासोबत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहुन गावातील सर्व नागरिकांना योजनांची माहिती दिली जात आहे. तिवटग्याळ गावात प्रथम विकसित भारत अभियान रथाचे स्वागत व उद्घाटन गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेब व गावचे सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्व नागरिकांना गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेबांनी या विकसित भारत अभियान रथाचे स्वागत करुन या अभियाना विषयावर सविस्तर माहिती दिली. तद्नंतर सर्व विभागाचे आरोग्य, कृषी, बॅंक, बचत गट, गॅस इत्यादी विभागांनी केंद्र सरकारने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. शिक्षण विभाग शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील केंद्र सरकारने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी गटविकास अधिकारी मा. प्रविण सुरडकर साहेब, सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर, ग्राम पंचायत सदस्य जनार्दन पाटील, जयशिंग पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मधुकर मरलापल्ले, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लहान थोर मंडळी, गावातील महिला आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment