Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, December 13, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचे पिताश्री भाऊराव बडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक साहित्य परिक्षा पॅड व केळी वाटप











तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचे पिताश्री भाऊराव बडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक साहित्य परिक्षा पॅड व केळी वाटप*

*तिवटग्याळ - दिनांक 11/12/2023 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या  वर्गातील सर्व  विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांचे पिताश्री कै. भाऊराव बडगे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त शालेय परीपाठा नंतर शाळेत सर्व विद्यार्थ्यांना तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख मा. मधूकर मरलापल्ले यांच्या हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जणांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य परिक्षा पॅड व केळी वाटप करण्यात आले. तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले की आज माझ्या वडीलांची पाचवी पुण्यतिथीनिमित्त असल्याने शाळेतील  सर्व विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्यासाठी व अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी तो नियमित अभ्यास करावा व दिलेला अभ्यास सोडवण्यासाठी परिक्षा पॅड व केळी वाटप करण्यात आले असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. तसेच मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की मला आई वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेला गरजू वस्तू व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे मला आवडते. आपण काही समाजाचे देणे लागतो हे उदात्त हेतू ठेवून एक खारीचा वाटा म्हणून मला शैक्षणिक साहित्य वाटप करणे आवडते असे सांगितले. या पुर्वी मागील शाळेत संगणक संच, दूरदर्शन संच, डिश टी. व्ही. संच, विविध नेत्यांचे फोटो आदी गरजू वस्तू वाटप केले आहे व करत राहणार असे ईश्वर चरणी प्रार्थना करतो की  ईश्वर मला असेच नेहमी विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक साहित्य व इतर वस्तू वाटप करण्यासाठी ईश्वर मला चांगली बुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले. वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर,  शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते*

No comments:

Post a Comment