Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, January 20, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जनजागृती रॅली आयोजित

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जनजागृती रॅली आयोजित*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यांनी सांगितले की, आज दिनांक 19/1/2024 रोजी गावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जनजागृती रॅली काढावयाची असे सांगितले. या नुसार शालेय परीपाठानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, प्रतिष्ठित नागरिक, उपसरपंच आरती तवर, सोनाली पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार अन्य जणांच्या उपस्थितीत तिवटग्याळ गावातील परीसरातील सर्व ठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जनजागृती रॅली काढण्यात आली.   या अभियानातील पारितोषिके व बक्षीस व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी दिली. तद्नंतर रॅली चा समारोप करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपसरपंच आरती तवर, सोनाली पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते*








































No comments:

Post a Comment