*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य "संख्यातील अंक हरवला, तो कोणाला सापडला " या उपक्रमातून शिक्षण*
*तिवटग्याळ - आज दिनांक 20/1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी आज शनिवार निमित्ताने शैक्षणिक साहित्य"संख्यातील अंक हरवला, तो कोणाला सापलला" या उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी हा उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक बडगे यांनी सर्व विद्यार्थाना गोलाकार बसवुन गोलामध्ये एका ट्रे मध्ये विविध संख्या फलक ठेवले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी प्रथम डाव घेतले. मग गोलाकार फिरुन एक संख्या घेऊन "संख्यातील अंक हरवला तो कुणाला सापडला" असे म्हणत फिरत फिरत 1 मिनिटाने नकळत शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांच्या पाठीमागे ठेवले मग त्यांच्यावर डाव "सापडलेली संख्या व विद्यार्थी यांना गोलाकार वर्तुळात उभे राहुन संख्या ओळखणे, एक, दोन, तीन व चार अंकी संख्या तयार करणे, त्या संख्या वाचणे, एकक, दशक, शतक व हजार संख्या स्थान ओळखणे.अशा पध्दतीने शाळेतील सर्व विद्यार्थावर डाव देणे व गणितातील संख्या,, संख्या वाचन, संख्या अक्षरात लिहिले व अंकाची स्थानिक किमंत अशा पध्दतीने हा गणितीय खेळाच्या माध्यमातून, शैक्षणिक साहित्याच्या द्वारे मनोरंजनातून विद्यार्थी संख्या वाचन, लेखन व स्थानिक किमंत समजून घेतले. या उपक्रमांत विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले*
No comments:
Post a Comment