Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, January 25, 2024

तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

*तिवटग्याळ येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीचे आयोजन*

*तिवटग्याळ - आज दिनांक 25/1/2024 रोजी तिवटग्याळ येथे BLO केंद्रस्तरीय मतदान अधिकारी ज्ञानेश्वर बडगे, सरपंच मा. प्रशांत पाटील, कैलास तवर, पोलीस पाटील मा. धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, अण्णाराव साळुंके, रावसाहेब पाटील व अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण व शाळेतील सर्व विद्यार्थी यांना घेऊन गावात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार विषयक विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली तद्नंतर ग्रामपंचायत कार्यालयात सामुदायिक शपथ घेण्यात आली. आम्ही भारताचे नागरीक, लोकशाही वर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांतता पुर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु. ही शपथ प्रतिज्ञा घेण्यात आली. तद्नंतर BLO केंद्रस्तरीय मतदान अधिकारी ज्ञानेश्वर बडगे उपस्थित सर्व नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली. या वेळी  BLO केंद्रस्तरीय मतदान अधिकारी ज्ञानेश्वर बडगे, सरपंच मा. प्रशांत पाटील, कैलास तवर, पोलीस पाटील मा. धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, अण्णाराव साळुंके, रावसाहेब पाटील व अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते*















































No comments:

Post a Comment